केशवा माधवा प्रार्थना मराठी

By | November 30, 2022

keshava madhava prarthana lyrics in marathi – रमेश अणावकर हे मराठीतील नावजलेले गीतकार होते. मराठी भाषेत त्यांनी अनेक गीत रचले, यातीलच केशवा माधवा हे त्यांचे आवडीचे आणि प्रसिद्ध गीत आहे. हे गीत प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर या यांनी म्हंटले आहे.

या लेखातून आपण केशवा माधवा प्रार्थना मराठी (keshava madhava prarthana lyrics marathi) जाणून घेणार आहोत.

केशवा माधवा प्रार्थना मराठी (keshava madhava prarthana lyrics marathi)

keshava madhava prarthana lyrics marathi
नावकेशवा माधवा गीत
प्रकारभक्तीगीत
गीतरमेश अणावकर
संगीतदशरथ पुजारी
स्वरसुमन कल्याणपूर

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा

वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुना काठी

नंदाघरच्या गायी हाकिशी गोकुळी यादवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती

रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

पुढील वाचन :

  1. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी गीत
  2. जय जय महाराष्ट्र माझा कविता
  3. भारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी
  4. बाबा वर कविता
  5. कुसुमाग्रज प्रेम कविता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *