खंडेराव होळकर यांची माहिती मराठी

khanderao holkar information in marathi – खंडेराव मल्हारराव होळकर हे मराठी साम्राज्यातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. यांना मराठा साम्राज्यातील महान योद्धा म्हणून ओळखले जाते. खंडेरावांची दहशत प्रचंड होती की, मुघल साम्राज्यात असणारी राजे-महाराजे देखील त्यांना घाबरत असे.

एकतीस वर्षाच्या आयुष्यात आपल्या प्रजेसाठी आणि साम्राज्याची लढलेले होळकर घराणे इतिहासात अजरामर आहे. होळकर घराण्यातील मल्हारराव, अहिल्याबाई , यशवंतराव आणि खंडेराव ही काही महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

या लेखात आपण खंडेराव होळकर यांची माहिती मराठी (khanderao holkar information in marathi) जाणून घेणार आहोत.

खंडेराव मल्हारराव होळकर यांची माहिती मराठी (khanderao holkar information in marathi)

khanderao holkar information in marathi
खंडेराव होळकर यांची माहिती मराठी
नावखंडेराव मल्हारराव होळकर
आईचे नाव गौतमबाई
वडिलांचे नावमल्हारराव होळकर
जन्म आणि ठिकाणइसवी सन 1723 (पुणे महाराष्ट्र)
मृत्यू आणि ठिकाणइसवी सन 1754
(कुम्हेर, राजस्थान)
संस्थानिकइंदोर पण मूळचे महाराष्ट्रातील

1. मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचे पाहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व असावे म्हणून मल्हाररावांना इंदूरची जहागिरी दिली होती.

2. मल्हारराव आणि गौतमबाई यांच्या पोटी खंडेराव यांचा जन्म झाला. खंडेराव यांना तीन बहिणी होत्या.

3. वडीलांच्या कामकाजात खंडेराव नेहमीच लक्ष देत असायचे. खंडेराव यांचा स्वभाव रागीट होता पण त्याचबरोबर ते साहसी आणि वीर योद्धा देखील होते.

4. अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्या शिंदे यांच्याबरोबर खंडेराव यांचा विवाह झाला. अहिल्या होळकर या खंडेरावांच्या मृत्युनंतर माळवा प्रांताचा कारभार सांभाळला. तसेच त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत असायच्या.

5. अहिल्याबाईंना यांना उचित न्यायदानासाठी ओळखले जाते. तसेच त्यांना होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून ओळखले जाते.

6. खंडेराव होळकर 10 बायकांची नावे याबद्दल पुरेशी माहिती नाही. अहिल्याबाई होळकर या खंडेराव यांच्या प्रथम पत्नी असून त्यांना इतर 9 पत्नी होत्या.

7. खंडेराव यांना मालेराव मुलगा आणि मुक्ताबाई मुलगी होती.

खंडेराव मल्हारराव होळकर इतिहास मराठी माहिती

8. मल्हारराव होळकर यांच्याकडून खंडेराव यांनी युद्धाची कला अवगत करून घेतली. त्यानंतर त्यांनी काही युद्ध केले.

9. इसवी सन 1737 मध्ये निजाम आणि मराठ्यांमध्ये युद्ध सुरू झाले, या युद्धात खंडेरावाने युद्ध जिंकले आणि निजामावर विजय मिळवला.

10. यानंतर शाजापूरमध्ये माळव्यात मुघलांनी लुटले, वस्त्या जाळल्या यात अनेक लोक मारले गेले. ही बातमी होळकर सैनिकांना मिळताच खंडेराव होळकरांनी मीरमानी खानावर हल्ला केला आणि त्याचा वध केला.

11. इसवी सन 1739 मध्ये पोर्तुगीजांशी मराठ्यांचे युद्ध चालू होते. तेव्हा खंडेरावाने तरापुरचा किल्ला जिंकला.

12. इसवी सन 1747 मध्ये देवळीचे युद्ध झाले, या युद्धाला 1748 चे बागरू युद्ध म्हणून ओळखले जाते. यामध्ये खंडेराव होळकरांचे वर्णन येते, कारण त्यांनी प्रत्येक युद्धात भाग घेतला होता.

13. 17 मार्च 1754 रोजी खंडेराव होळकर युद्ध करत होते, त्याचवेळी घातपाती झालेल्या जाट सैनिकांनी किल्ल्यात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात खंडेराव होळकर यांना एक गोळी लागली.

14. या हल्ल्यात खंडेराव यांना एक गोळी लागली. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी खंडेराव याचे वय वर्षे 31 होते.

15. खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 10 पैकी 9 पत्नी खंडेराव यांच्या मृत्यूनंतर सती गेल्या. परंतु अहिल्या बाईंनी सती गेल्या नाही.

16. पतीच्या निधनानंतरही ती आपल्या हक्कांसाठी लढत राहिली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांचाही मृत्यू झाला.

17. त्यानंतर खंडेराव होळकरांच्या एकुलत्या एक मुलाने लहान वयातच आई अहिल्याबाई होळकर यांच्या अधिपत्याखाली राहून इंदूरची गादी स्वीकारली आणि राज्याचा कारभार सांभाळला.

Related – शिवराज्याभिषेक सोहळा माहिती

सारांश

आशा करतो की, तुम्हाला खंडेराव मल्हारराव होळकर यांची माहिती मराठी (khanderao holkar information in marathi) नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते ?

होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर हे होते.

खंडेराव होळकर यांच्या मृत्यूचे कारण काय होते ?

राजस्थानात जाटांविरोधात लढाईसाठी गेले असताना कुंभेरी वेढ्यात खंडेराव यांना मरण आले. कुंभेरगडावरून पडलेल्या तोफेच्या गोळ्याने त्यांचा जीव घेतला.

अहिल्याबाई कोणाच्या पत्नी होत्या ?

अहिल्याबाई या खंडेराव होळकर यांच्या पत्नी होत्या.