खेचर प्राणी म्हणजे काय?

Khechar Animal In Marathi – नर गाढव व घोडी यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या संकरजाला खेचर म्हणतात. तसेच घोडा व गाढवी यांच्या संकरातून निपजणार्‍या प्राण्याला हिनी म्हणतात.

हिनी खेचरापेक्षा लहान आणि पुष्कळ बाबतींत त्याच्यापेक्षा कनिष्ठ प्रतीचा असतो. या लेखातून आपण खेचर प्राण्याची (Khechar animal in marathi) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

खेचर प्राणी माहिती मराठी (Khechar Animal In Marathi)

Khechar animal in marathi
नावखेचर
प्रकारसंकरित जात
उंची 1.3 मी – 1.9 मी
वजन275 ते 750 किग्रॅ.
रंगतांबूस व काळपट तपकिरी
वापरभारवाहू कामासाठी

नर गाढव व घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या प्रजातीला खेचर म्हणतात. घोडा व गाढवी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या प्रजातीला हिनी असे म्हणतात. हिनी खेचरापेक्षा लहान आणि पुष्कळ बाबतींत त्याच्यापेक्षा कनिष्ठ प्रतीचा असतो. खेचर व हिनी ही दोन्हीही सामान्यतः वांझ असतात.

खेचरे साधारणपणे 1.3 – 1.9 मी उंचीची असतात तर 275 ते 750 किग्रॅ. इतके वजन असते. यांचा रंग तांबूस, काळपट तपकिरी असते. खेचर तहानभूक सहन करू शकतात. तसेच यांचे ओरडणे गाढवांच्या ओरडण्यासारखे असते.

खेचरात घोडी व गाढव या दोघांसारखी गुणधर्म असतात. उंची, मानेचा व नितंबांचा आकार आणि शरीरावरील केस घोडीसारखे असतात. तर आखूड डोके, लांब कान, आखूड आयाळ, बारीक पाय, लहानसर खूर, घोट्याच्या आतील बाजूला शृंगीचा अभाव तसेच शेपटाच्या बुडाजवळ थोडे केस गाढवासारखे असतात.

कणखरपणा, सोशिकता, चिकाटी, रुक्षता व दृढपादता हे गुण गाढवाकडून त्याला मिळत असतात तर वेग, जोम व शक्ती हे गुण घोडिकडून खेचराला मिळतात.

खेचर हवामानातील कोणताही बदल सहजपणे सहन करू शकतात. विशेषत: अति-उष्ण हवामानाचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. खेचर वयाच्या पाचव्या वर्षापासून अवघड कामे करण्यास सक्षम असतात.

खेचर पाण्यात पोहण्यात अगदी कुशल असतात. त्यामुळे यांचा वापर नद्या-नाले ओलांडण्यास आणि डोंगराच्या चढणीवर किंवा अरुंद रस्त्यावरून सामान वाहून नेण्यासाठी केला जातो.

आशिया मायनरमध्ये 3000 वर्षांपूर्वी खेचरांची उत्पती होत असे. यांचा वापर ओझी वाहण्याकरिता तसेच स्वारी करण्यासाठी केला जात असे.

शेतीच्या आणि खाणीवरच्या कामांसाठी खेचर फार उपयुक्त ठरते. भारतीय सैन्यात खेचरांचा फार उपयोग होऊ. दुर्गम भागात तोफा व इतर अवजड सामान वाहून नेण्यासाठी अत्यंत मजबूत खेचरांची गरज असते. भारतीय सैन्यातील मजबूत खेचर 150 किग्रॅ. वजन वाहून नेते.

खेचर काटक असून खाण्याच्या बाबतीत ते चोखंदळ नसतात. ते तहान व भूक खूप वेळापर्यंत सहन करू शकतात. ते निकृष्ट प्रतीचे व अपुरे अन्न खाऊनही वेळ काढतात. भारतीय लष्करातील खेचरांना घोड्याप्रमाणे खाद्य दिले जाते.

अमेरिकेत वेगवेगळ्या कामांसाठी खेचरांचा वापर करतात. काही खेचरे केवळ जड ओझी वाहण्याकरिता उपयोगात आणली जातात. काही शेतीच्या कामांकरिता तर काही उसाच्या व कापसाच्या शेतांवर काम करणारी खेचरे असतात.

खाणीत काम करण्यासाठी देखील यांचा वापर केला जातो. इसवी सन 1785 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी खेचरांची पैदास सुरू केली.

भारतातील खेचरांची संख्या सध्या वाढत असून सन 1961 मध्ये यांची संख्या नऊ लाख इतकी होती. आता ती 30 टक्क्यांनी जास्त वाढलेली आहे.

Related – महाराष्ट्रातील जंगली प्राण्यांची माहिती

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण खेचर प्राणी माहिती मराठी (Khechar animal in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

खेचर प्राणी म्हणजे काय ?

खेचर हा एक संकरित प्राणी असून याची उत्पत्ती नर गाढव व घोडी यापासून होते. कणखरपणा, सोशिकता, चिकाटी, रुक्षता व दृढपादता हे गुण गाढवाकडून त्याला मिळत असतात तर वेग, जोम व शक्ती हे गुण घोडिकडून खेचराला मिळतात.

खेचर हा प्राणी कोणत्या प्राण्याचे संकर आहे?

खेचर हा प्राणी नर गाढव व घोडी या प्राण्याचे संकर आहे.

खेचर हा प्राणी कशासाठी उपयोगी पडतो ?

खेचर हा प्राणी अवजड सामान वाहण्यासाठी उपयोगी पडतो. अतिशय कठीण वाटणाऱ्या परिस्थितीत काम करण्याची त्यांची शक्ती आणि सर्व प्रकारच्या कष्टांना टक्कर देण्याचे त्यांचे सामर्थ्य यासाठी खेचर ओळखला जातो.

1 thought on “खेचर प्राणी म्हणजे काय?”

Leave a Comment