कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

By | October 8, 2022

kojagiri purnima 2022 wishes marathi – कोजागिरी पौर्णिमेला आपण शरद पौर्णिमा किंवा माडी पौर्णिमा म्हणतो. या पौर्णिमेला अनेक नावे आहेत, बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर काही जण कौमुदी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा भारतातील सर्व राज्यात साजरी केली जाते.

गुजरात राज्यात ही पौर्णिमा रास आणि गरबा खेळून साजरी करण्यात येते. शरद पुनम या नावाने हा सण साजरा करण्यात येतो.

तुम्ही जर कोजागिरी पौर्णिमा SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर कोजागिरी पौर्णिमा संदेश (kojagiri purnima 2022 wishes marathi) देणार आहोत.

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (kojagiri purnima 2022 wishes marathi)

kojagiri purnima 2022 wishes marathi

रात्र पौर्णिमेची सजली ही अशी, नववधू रुपेरी साजात जशी..

दूध आटवूया चंद्र प्रकाशात, प्रतिबिंब पाहुया चंद्राचे त्यात..

कोजागिरी करू साजरी हर्षाने, आश्विनाची पौर्णिमा आली वर्षाने..

शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

दूध पिता नष्ट होई रोगराई..

शक्ती येई अंगी सुचे नव्या वाटचाली..

सौंदर्य वाढायला आहे भरपाई..

औषधीच दिव्य आहे चंद्रकिरणावली

।।शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे, गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,

असतो नभात रोज तो एकटाच रात्रीपण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,

चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे, पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…

कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा..!

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,

परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,

निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ

आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ..

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

पूर्ण चंद्रमा उगवला आज उंच अंबरी..

स्वागत त्याचे करण्या सजली अवघी नगरी..

पाहूनिया प्रतिबिंब तयाचे करु त्यासी वंदनशक्ती, बुद्धी आरोग्य मिळविण्या करु दुग्धप्राशन..

Happy Kojagiri purnima 2022

कोजागिरीच्या मध्यरात्री, माता लक्ष्मी भूतलावर येई..

कोण असे जागा कटाक्षाने पाही, तयावर संतुष्ट होऊन कॄपाशिर्वाद देई..

Happy Sharad Purnima 2022

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद दुधाचा,

विश्वास वाढु द्या नात्याचा, त्यात असु दे गोडवा साखरेचा

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा!

आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक व आनंदाची उधळणकरणारा जावो हीच सदिच्छा…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचे चांदणे,आणि कोजागिरीची रात्र..

चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र..

दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे..

आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे…आपल्या सर्वांना शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यघेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…

कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (sharad purnima wishes 2022 in marathi)

sharad purnima wishes 2022 in marathi

कितीही रात्री जागल्या तरी,

पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही

आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी

कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही.

!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

कोजागिरी म्हणजे उल्हासाचा

आणि आनंदाचा उत्सव शीतलता

आणि सुंदरता यांच्या शांती रूप

समन्वयाची अनुभूती कोजागिरी

पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….

हे दूध केशरी कोजागिरीचे खास वेलची बदाम

आणि पिस्ते सारे एक साथ

अशीच कायम राहो आपल्या सर्वांची साथ

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा….

कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते

दुधात देखणे रूप चंद्राचे दिसतेया

शरद पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा….

मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा ,

विश्वास वाढू द्या नात्यांचा व त्यात गोडवा असू द्या साखरेचा

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात,, सौख्य मांगल्य समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा….

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवान

कोजागिरीच्या रात्रीने लिहली जागरणाची कहाणी

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

आज कोजागिरी पौर्णिमा आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जाऊ जावो.

हीच सदिच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या

तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा….

आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन..

कोण कोण जागे हे पाहते,लक्ष्मी दाराशी येऊन..

आजची कोजागिरीची रात्र सुखकारक व आनंदाची उधळण करणारी जावो हीच सदिच्छा…!

सारांश

या लेखातून आपण निवडक कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (kojagiri purnima 2022 wishes marathi) पाहिले. हे संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना, प्रियजनांना पाठवू शुभेच्छा देऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कोजागिरी पौर्णिमा कधी आहे ?

9 ऑक्टोंबर 2022 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.

शरद पौर्णिमा म्हणजे काय ?

शरद पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतातील महत्त्वाचा सण आहे. या सणाला बौद्ध व हिंदू धर्मात विशेष महत्व दिले जाते.

पुढील वाचन :

  1. कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी
  2. महर्षि वाल्मीकि जयंती शुभेच्छा संदेश मराठी
  3. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश
  4. गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *