कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी

By | October 3, 2022

Kojagiri purnima in marathi – कोजागिरी पौर्णिमा ज्याला आपण शरद पौर्णिमा किंवा माडी पौर्णिमा देखील म्हणतो. या पौर्णिमेला अनेक नावे आहेत, बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर काही जण कौमुदी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा भारतातील सर्व राज्यात साजरी केली जाते.

ही पौर्णिमा साजरी करण्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत. तसेच आरोग्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस अतिशय आनंदात साजरा केला जातो.

या पौर्णिमेच्या चांदण्यात ताजमहाल पाहण्याची एक सुवर्ण संधी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादिवशी लाखो पर्यटक ताजमहाल या ठिकाणी गर्दी जमते.

या लेखात आपण कोजागिरीबद्दल माहिती मराठी – kojagiri purnima in marathi जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण या पौर्णिमेचे महत्व आणि ही पौर्णिमा कशी साजरी केली जाते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी (kojagiri purnima in marathi)

kojagiri purnima in marathi
नावकोजागिरी पौर्णिमा
इतर नावेशरद पौर्णिमा
माडी पौर्णिमा
लोख्खी पुजो
कौमुदी पौर्णिमा
साजरा करण्याचे ठिकाण आणि काळअश्विन पौर्णिमेला संपूर्ण भारतात
साजरा करणारेभारतीय

गुजरात राज्यात ही पौर्णिमा रास आणि गरबा खेळून साजरी करण्यात येते. शरद पुनम या नावाने हा सण साजरा करण्यात येतो.

बिहार आणि झारखंड राज्यातील मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा करण्यात येते. या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीच्या माहेरकडून जावयास भेटवस्तू पाठवली जाते. या सणानिमित्त हिमाचल प्रदेश मध्ये मोठी यात्रा भरत असते.

राजस्थानी स्त्रिया शरद पौर्णिमा साजरी करताना शुभ्र वस्त्र आणि चांदीचे दागिने परिधान करतात. या रात्री चंद्राचे पूजन करून गोड दूध पिण्याची प्रथा आहे.

हरियाणा या ठिकाणी आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवतात. त्यानंतर रात्रभर चंद्र आणि चांदण्यांच्या उजेडात ठेवून सकाळी खातात.

ओडिशा राज्यात शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने गजलक्ष्मी देवीची पूजा करण्यात येते.

कोजागरी पौर्णिमा बंगाली लोकांमध्ये लोख्खी पुजो या नावाने साजरी करण्यात येते. हाऊस तो साजरा करताना बंगाली लोक नारळाचा वापर करतात. ते नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालतात. त्यानंतर हा नैवेद्य लक्ष्मीला अर्पण करण्यात येतो.

बनारस या ठिकाणी वैष्णव संप्रदायाचे भक्त शरद पौर्णिमेचा सण साजरा करतात.

शरद पौर्णिमा मराठी माहिती (sharad purnima information in marathi)

sharad purnima in marathi

शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. ही पौर्णिमा मराठी महिन्यानुसार शरद ऋतूमध्ये येते. हा ऋतू मराठी महिन्यानुसार श्रावण आणि भाद्रपद या महिन्यामध्ये असतो. हा सण दरवर्षी साजरा करण्यात येतो. या पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला.

या पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे विचारते.

या पौर्णिमेला वैज्ञानिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या महत्त्व लाभले आहे.

हा लेख जरूर वाचामराठी सण आणि उत्सव माहिती

कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात (How to celebrate kojagiri purnima in maharashtra)

या दिवशी महालक्ष्मी देवीची पूजा करण्याची पद्धत आहे. ही पूजा करण्यापूर्वी सकाळी सर्वप्रथम स्नान करून घ्यावे लागते. या दिवशी गुप्त उपवास ठेवावा.

तांब्याच्या किंवा चांदीच्या नसेल तर मातीचा एक कलश आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी. या लक्ष्मीच्या मूर्तीची मनपूर्वक पूजा करावी. यासाठी लक्ष्मी देवीचे श्लोक म्हणावे.

सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।

परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।

त्यानंतर रात्री कलशावर तुपाचे दिवे लावावे. दूध,तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून खीर बनवावी. ही खीर चांदण्यांच्या उजळा ठेवावी.

या पौर्णिमेच्या दिवशी घरातील जेष्ठ पुत्राला ओवाळून हा उत्सव साजरा करण्यात जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे कोजागिरी पौर्णिमा ला मसाला दूध पिण्याची परंपरा आहे.

हे मसाला दूध सुकामेव्याचे आठवून गोड बनवले त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात गरम केले जाते आणि त्यानंतर ते सर्वजण मिळून पितात.

हे दूध पिल्यानंतर काहीजण रास-गरबा करून ही रात्र आनंदात साजरी करतात.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय आहे (importance of kojagiri purnima in marathi)

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर अधिक प्रमाणात दिसतात. हे चांदणे शुद्ध आणि सात्विक असते अशी मान्यता आहे. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.

प्राचीन काळापासूनच या दिवसाला अधिक महत्त्व दिले ही पौर्णिमा येण्याअगोदर नवरात्र हा उत्सव असतो. या उत्सवात शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वतीची पूजा करण्यात येते.

त्यानंतर दसरा साजरा करण्यात दसऱ्याला विजयादशमी असेदेखील नाव यावेळी शेतातील कामे बहुतांश पूर्ण होत आलेली असतात.

नुकताच पावसाळा संपून शेतकऱ्याला हे नवीन पिके काढण्याची वेळ येते. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित होतो. हा आनंद शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने साजरा करतो. हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक दिसून येते.

याव्यतिरिक्त दमा आणि अस्थमा या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो. दमा असणाऱ्यांनी त्यांचा वैद्यकीय डोस या मसालेदार दुधामध्ये टाकून चंद्राच्या प्रकाशात ठेवावा आणि त्यानंतर ते दूध द्यावे. हे दूध चंद्राच्या प्रकाशात असल्याने त्याचे गुणधर्म काही प्रमाणात बदलते. याचा फायदा निश्चित होतो.

सारांश

या लेखात आपण कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी (kojagiri purnima in marathi) पाहिली आहे. यामध्ये आपण या पौर्णिमेचे महत्व काय आहे ? ही पौर्णिमा कशी साजरी करावी ? आणि आपल्या भारतामध्ये आश्विन पौर्णिमा विविध राज्यात कशा प्रकारे साजरी केली जाते (how to celebrate kojagiri purnima in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा. जर तुम्हाला कोजागिरी मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पौर्णिमा म्हणजे काय मराठी माहिती ?

चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात.

अमावस्या नंतर पौर्णिमा किती दिवसांनी येते ?

अमावस्या नंतर पौर्णिमा पंधरा दिवसांनी येते.

अमावस्या म्हणजे काय ?

ज्या रात्री पृथ्वीवरून, चंद्र दिसत नाही, त्या तिथीला अमावस्या म्हणतात.

विषुववृत्त म्हणजे काय ?

पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त म्हणतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय (kojagiri purnima meaning in marathi)

कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतातील महत्त्वाचा सण आहे. या सणाला बौद्ध व हिंदू धर्मात विशेष महत्व दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *