kolhapur famous for in marathi – कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पश्चिम भारतातले प्राचीन व्यापारी आणि धार्मिक केंद्र म्हणून या जिल्ह्याकडे पहिले जाते. कोल्हापूर जिल्ह्याला दक्षिण काशी किंवा दक्षिणेतील बनारस म्हणून ओळखले जाते.
कोल्हापूर शहराचे जुने नाव करवीर होते. तसेच कोल्हापूर शहर हे कुस्तीपटूची जननी म्हणून ओळखले जाते. यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपसृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरला ओळखले जाते.
कुस्तीचे माहेरघर असलेल्या या जिल्ह्यात भारताचे पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे याच मातीतले आहेत. असे अनेक कुस्तीपटू, खेळाडू तसेच गायक, अभिनेता, दिग्दर्शक, वैज्ञानिक, लेखक, उद्योगपती या मातीत जन्मले.
या लेखात आपण कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी – kolhapur famous for in marathi जाणून घेणार आहोत. यात आपण प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पाहण्यासारखी ठिकाणे यात कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे, कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले आणि इतर कोल्हापूर माहिती मराठी जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी – kolhapur information in marathi
- कोल्हापूर जिल्हा इतिहास माहिती मराठी (kolhapur history information in marathi)
- कोल्हापूर जिल्ह्यावर राज्य करणारे राज्यकर्ते (kolhapur in marathi)
- कोल्हापूर जिल्हा हवामान माहिती मराठी (kolhapur chi mahiti in marathi)
- कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी – kolhapur famous for in marathi
- कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांची नावे माहिती मराठी (kolhapur taluka list in marathi)
- कोल्हापूर मधील प्रसिध्द असलेल्या गोष्टी माहिती मराठी – kolhapur famous for in marathi
- कोल्हापूर पाहाण्यासारखी ठिकाणे (kolhapur tourism Places information in marathi)
- कोल्हापुरात असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती – kolhapur famous for in marathi
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी – kolhapur information in marathi

नाव | कोल्हापूर |
इतर नावे | करवीर |
राज्य | महाराष्ट्र |
देश | भारत |
स्थानिक भाषा | मराठी |
पाहण्यासारखी ठिकाणे | ऐतिहासिक धार्मिक थंड हवेचे ठिकाण अभयारण्ये धरण आणि धबधबे |
प्रसिद्ध | कोल्हापुरी साज कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी फेटा कोल्हापुरी लवंगी मिरची कोल्हापुरी गूळ चपलाहार लक्ष्मीहार |
ओळख | मराठी चित्रपट सृष्टीचे, कुस्तीपटू आणि खाद्य प्रेमींचे माहेरघर |
आरटीओ कोड | MH 09 |
कोल्हापुर जिल्हा पंचगंगा नदीवर वसलेले आहे. ही नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. ही नदी कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, सरस्वती या पाच नद्या मिळून तयार झाली आहे. त्यामुळे हिला पंचगंगा असे नाव पडले आहे.
कोल्हापूरची मिसळ आणि कोल्हपूरची लवंगी मिरची जगभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरातला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मटणाचे लोणचे, खिमा राईस बॉल्स, दावणगिरी लोणी डोसा असे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. खाद्यपदार्थ बरोबरच येथील मसाले भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे.
कोल्हापुरात दुधात सोडा घालून पिण्याची पद्धत आहे, असे केल्याने दुधाचे निर्जंतुकीकरण होते अशी मान्यता आहे.
इसवी सन 600 ते 700 या काळातील महालक्ष्मीचे मंदिर या ठिकाणी पहावयास मिळते. या मंदिरात असणारे महालक्ष्मीची मूर्ती 40 किलो ग्रॅमची आहे. दरवर्षी लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
कोल्हापूर जिल्हा इतिहास माहिती मराठी (kolhapur history information in marathi)

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले.
हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला.
त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते.
कोल्हापूर जिल्ह्यावर राज्य करणारे राज्यकर्ते (kolhapur in marathi)
- इसवी सन 225 ते 550 पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक आणि मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते.
- इसवी सन 550 ते 753 या काळात कोल्हापूर जिल्ह्यावर चालुक्य घराण्याची सत्ता होती.
- इसवी सन 12 व्या शतकात शिलाहारांचे राज्य होते.
- इसवी सन 1210 मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याची कोल्हापूरवर सत्ता होती.
- इसवी सन 1306-07 या काळात मुसलमानी मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळा हा किल्ला जिंकला आणि कोल्हापूर संस्थानवर ताबा मिळवला.
- इसवी सन 1707 साली महाराणी ताराबाई यांचे राज्य होते.
- इसवी सन 1884 ते 1922 या काळात कोल्हापूर जिल्ह्यावर छत्रपती शाहू महाराज यांची सत्ता होती.
- 15 ऑगस्ट 1947 रोजी कोल्हापूर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
कोल्हापूर जिल्हा हवामान माहिती मराठी (kolhapur chi mahiti in marathi)
कोल्हापूर जिल्ह्याचे सरासरी तापमान 10 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस इतके असते. उन्हाळा सुरू झाला की हे तापमान 36 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत वाढते.
कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी – kolhapur famous for in marathi
कोल्हापूर जिल्ह्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी रंकाळा, आणि कोटीतीर्थ हे तलाव सध्या अस्तित्वात आहेत. पूर्वी फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर इत्यादी तलाव या ठिकाणी होती.
कोल्हापूरची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. या ठिकाणी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच कोल्हापूरचा गूळ जगप्रसिद्ध आहे.
दुग्धसंस्था | औद्योगिक वसाहती |
---|---|
गोकुळ | शिवाजी उद्यमनगर |
वारणा | वाय.पी.पोवारनगर |
शाहू | पांजरपोळ |
मयूर | |
स्वाभिमानी |
वरील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे कोल्हापुरात दुग्ध व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे जवळपास 400 कारखाने कोल्हापुरात आहेत.
पैलवानाची कुस्ती आणि मराठी चित्रपटांची निर्मिती ही कोल्हापूरची संस्कृतीची ओळख करून देते. या ठिकाणी भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचा जन्म झाला. कोल्हापूरचा लोकप्रिय खेळ म्हणजे कुस्ती.
शाहू महाराजांनी बांधलेले खासबाग हे भारतातील एकमेव कुस्तीचे मैदान आहे, ज्याठिकाणी मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ 60,000 लोक पाहू शकतात.
- कसबा बावडा कुस्ती केंद्र
- खासबाग
- नवी मोतीबाग तालीम
- पंत बावडेकर आखाडा
- मोतीबाग तालीम
- शाहू आखाडा, चंबूखडी
- शाहू आखाडा
- शाहूपुरी आखाडा
- शाहू विजयी गंगावेस
- कालाईमाम तालीम
वरील कुस्तीचे आखाडे आहेत, ज्या ठिकाणी आजही मोठ्या जोशात कुस्ती खेळली जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांची नावे माहिती मराठी (kolhapur taluka list in marathi)
कोल्हापुरातील तालुके – आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले इत्यादी.
हा लेख जरूर वाचा – महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे (maharashtra division in marathi)
कोल्हापूर मधील प्रसिध्द असलेल्या गोष्टी माहिती मराठी – kolhapur famous for in marathi
कोल्हापूरला शुद्ध चामड्याची चप्पल बनवली जाते. हि चप्पल बनवताना खिळ्यांचा केला जात नाही. हि चप्पल टिकाऊपणासाठी अख्या जगभर प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणचे कोल्हापुरी साज, चपलाहार आणि लक्ष्मीहार प्रसिद्ध आहेत.
कोल्हापूरची शान असलेले आई अंबाबाईचे मंदिर या ठिकाणी आहे. तसेच कोल्हापूर पासून 22 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक भक्त येत असतात.
कोल्हापूर पाहाण्यासारखी ठिकाणे (kolhapur tourism Places information in marathi)
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ज्यामध्ये तुम्ही अभयारण्ये, थंड हवेचे ठिकाण, धबधबे आणि तलाव, किल्ले, घाट अश्या बऱ्याच ठिकाणी भेट देऊ शकता.
कोल्हापूरमधील धार्मिक पर्यटन स्थळे – अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, खिद्रापूर मंदिर ही धार्मिक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात.
महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिले अभयारण्य या ठिकाणी आहे. राधानगरी अभयारण्य हे रानगव्यांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी एकूण 35 प्रकारचे वन्यप्राणी आणि 235 प्रकाराचे पक्षी आढळतात. तसेच या ठिकाणी 1800 प्रकारच्या वनस्पती आहेत. यापैकी 1500 पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहे आणि 300 वनस्पती या औषधी आहेत.
हा लेख जरूर वाचा – राधानगरी वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती (radhanagari wildlife sanctuary information)
रंकाळा तलाव – या तलावाला कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणून ओळखले जाते. प्राचिन काळी या ठिकाणी दगडाची खाण होती. आठव्या ते नवव्या शतकात या ठिकाणी भूकंप होऊन खाण संपून तलावाची निर्मिती झाली. अभयारण्यापासून रंकाळा तलाव 53 किलोमीटर अंतरावर आहे.
शालिनी पॅलेस – हा पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडे आहे. या ठिकाणी पाम झाडे पाहायला मिळतात, तसेच हिरव्यागार आणि सुंदर बाग येथे पाहायला मिळतात. या पॅलेसचे नाव राजकुमारी शालिनी राजे यांच्यावरून ठेवले आहे. हा पॅलेस राधानगरी अभयारण्यापासून 48 किलोमीटर अंतरावर आहे.
पन्हाळा किल्ला – पन्हाळ्याला पर्णालदुर्ग म्हणून ओळखले जाते. भारत सरकारने या किल्ल्याला 2 जानेवारी 1954 या दिवशी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हा किल्ला राधानगरी अभयारण्यापासून 66 किलोमीटर अंतरावर आहे.
गगनबावडा – गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याचे मुख्य गाव म्हणूूून ओळखले जाते. या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या गडाची निर्मिती भोजराजाच्या काळात झाली आहे. गगनबावडा या परिसरात पळसंबे गावाजवळ डॉ. डी.वाय.पाटील साखर कारखाना आहे.
तसेच पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड या ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी होत असते.
kolhapur famous for in marathi – काळ्या कातीव दगडांनी बांधलेले छत्रपती शहाजी म्युझियम येथील खास आकर्षण आहे. यामध्ये राजघराण्यातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रासाद घड्याळाचा मनोरा पाहायला मिळतात.
ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती टाऊन हॉल म्युझियममध्ये पाहायला मिळतो.
नरसोबाची वाडी हे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य या ठिकाणी राहणारे असंख्य भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
हा लेख जरूर वाचा – नरसोबाची वाडी माहिती मराठी (narsobachi wadi information in marathi)
भुदरगड हा महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यापैकी एक आहे. हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या जिल्ह्यात आहे.किल्ल्याच्या चारही बाजूला घनदाट झाडी आहे, सध्या अगदी मोजक्याच किल्ल्यांची व्यवस्थित तटबंदी पाहायला मिळते.गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अशी अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला हा भुदरगड किल्ला आहे.
हा लेख जरूर वाचा – भुदरगड किल्ला माहिती (bhudargad fort information in marathi)
कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे – रामतीर्थ धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात असणारे निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी पर्यटनासाठी राऊतवाडी, बर्की, मानोली (आंबा) हे धबधबे आहेत.
कोल्हापुरात असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती – kolhapur famous for in marathi
- शाहू महाराज
- वीर शीवा काशीद
- रत्नाप्पा कुंभार
- रणजित देसाई
- सूर्यकांत मांडरे
- चंद्रकांत मांडरे
- कुलदीप पवार
- भालजी पेंढारकर
- व्ही. शांताराम
- शिरीष बांदारकर
- आशुतोष गोवारीकर
- जयंत नारळीकर
- सुधीर फडके
- जगदीश खेबूडकर
- उमा भेंडे
- राम कदम
- राजशेखर
- वसंत शिंदे
- शिवाजी सावंतबाबा कदम
- डॉ. बापूजी साळुंखे
- सुरेश वाडकर
- विश्वास नांगरे पाटील
- दादू चौगुले
- विनोद चौगुले
- राही सरनोबत
- तेजस्विनी सावंत
- सिद्धार्थ देसाई
- वीरधवल खाडे
- राजन गवस
- गणपत पाटील
- प्रसेन कोसंबीकर
- उत्तम कांबळे
- रमेश पोवार
हा लेख जरूर वाचा – कलामहर्षी बाबूराव पेंटर मराठी माहिती (baburao painter information in marathi)
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी – kolhapur famous for in marathi जाणून घेतली.
कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी – kolhapur famous for in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला ?
कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा 1877–1884 वर्षी बांधला.
खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे ?
खिद्रापूर देवस्थान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील एक लहान शहर कोणते आहे ?
कोल्हापूर जिल्ह्यातील एक लहान शहर आजरा आहे.
कोल्हापूर शहर हे कशाची जननी म्हणून ओळखले जाते ?
कोल्हापूर शहर हे कुस्तीपटुंची जननी म्हणून ओळखले जाते.
छान माहिती सर