konkan division districts in marathi – निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे कोकण विभाग सर्वपरिचित आहे. कोकण किनारपट्टीवर 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. या भूमीवर असणारी सागरी किल्ले, बेटे, खाड्या आणि बंदरे तसेच थंड हवेची ठिकाणे आहेत.
या लेखातून आपण कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे (konkan division districts in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे (konkan division districts in marathi)
- #1 पालघर जिल्ह्यातील तालुके व माहिती (palghar district taluka list in marathi)
- #2 ठाणे जिल्ह्यातील तालुके यादी (thane district taluka list in marathi)
- #3 मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुके (mumbai upnagar district taluka list in marathi)
- #4 मुंबई शहर जिल्ह्यातील तालुके (mumbai city district taluka list in marathi)
- #5 रायगड जिल्ह्यातील तालुके किती आणि कोणते आहेत (raigad district taluka list in marathi)
- #6 रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके मराठी (ratnagiri district taluka list in marathi)
- #7 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (sindhudurg district taluka list in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे (konkan division districts in marathi)

विषय | कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे |
प्रकार | महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग |
क्षेत्रफळ | 30,746 चौ. किमी |
स्थानिक भाषा | कोकणी, मराठी |
विभागाचे मुख्यालय | मुंबई शहर |
विभागातील एकूण जिल्हे | 07 |
विभागातील एकूण तालुके | 50 |
महाराष्ट्र राज्यातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक कोकण विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्हे आहेत.
भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई शहर या जिल्ह्याचा समावेश कोकण प्रशासकीय विभागात होतो. अनेक थंड हवेची ठिकाणे, सागरी किल्ले आणि धबधबे कोकण विभागात आहेत.
कोकण प्रशासकीय विभागात पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे एकूण सात जिल्हे आहेत.
#1 पालघर जिल्ह्यातील तालुके व माहिती (palghar district taluka list in marathi)
पालघर जिल्हा महाराष्ट्रातील 36वा नवीन जिल्हा आहे. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याची विभाजन करून पालघर हा स्वतंत्र जिल्हा तयार करण्यात आला. जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. ती पुढीलप्रमाणे,
- पालघर
- वाडा
- विक्रमगड
- जव्हार
- मोखाडा
- डहाणू
- तलासरी
- वसई विरार
पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,533 चौ. किमी इतके आहे. वैतरणा ही पालघर जिल्ह्यातील मुख्य नदी असून, पिंजल, सूर्या, दहेर्जा, तानसा या नद्या आहेत. जिल्ह्यात वांद्री धरण व मनोर धरण आहे.
इसवी सन 1739 मध्ये पोर्तुगिजांकडून चिमाजी अप्पांनी जिंकलेला वसईचा किल्ला आहे. यासोबतच अर्नाळा किल्ला, कळवा बीच, माहीम बीच, वाघोबा धबधबा, हिरडपाडा धबधबा, शितलादेवी मंदिर, विराराची जीवदानी देवी ही प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहे.
चिंचोटी, दाभोसा, विहिगाव हे धबधबे पालघर जिल्ह्यात आहेत. पालघरचे महाबळेश्वर म्हणून जव्हारला ओळखले जाते.
#2 ठाणे जिल्ह्यातील तालुके यादी (thane district taluka list in marathi)
उत्तर कोकणात पश्चिम किनाऱ्यावर ठाणे जिल्हा आहे. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 4,214 चौ. किमी इतके असून भारतातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या महानगरांपैकी ठाणे हे एक असून जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत, ते पुढीलप्रमाणे
- ठाणे
- भिवंडी
- शहापूर
- मुरबाड
- कल्याण
- उल्हासनगर
- अंबरनाथ
श्रीस्थानक हे ठाणे जिल्ह्याचे प्राचीन नाव होते. महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहेत.
ठाणे | उल्हासनगर |
नवी मुंबई | भिवंडी निजामपूर |
कल्याण डोंबिवली | मिरा भाईंदर |
वैतरणा व उल्हास या ठाण्यातील प्रमुख नद्या असून बारावी, भातसा, तानसा आणि पिंजळ या अन्य नद्या आहेत.
ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्रातील तलावांचे शहर (city of lakes in maharashtra) म्हणून ओळखले जाते. तर धरणांचा तालुका म्हणून शहापुरला ओळखले जाते.
तलाव | धरण |
---|---|
मसुंदा तलाव | मोडकसागर |
कचरीली तलाव | तानसा धरण |
सिद्धेश्वर तलाव | भातसा धरण |
उपवन तलाव | बारवी धरण |
धामणी धरण |
महाराष्ट्रातील सर्वाधिक धरण असल्यामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते.
ठाणे जिल्ह्यात तांदूळ, वरी, नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. याव्यतिरिक्त केळी आणि चिक्कुचे फळपीक मोठ्या संख्येने घेतले जाते.
अंबरनाथ येथे संरक्षण मंत्रालयाचा दारूगोळा आणि शस्त्रनिर्मिती करणारा कारखाना आहे. अभियांत्रिकी, लोह पोलाद, औषधे आणि रसायने निर्मितीची अनेक कारखाने ठाणे औद्योगिक संस्थेत आहेत.
उल्हास नदीवरील प्रमुख बंदर जिल्ह्यातील आकर्षणाचे केंद्र आहे.
कोंडेश्वर धबधबा, मासुंदा तलाव, बाबा हाजीमलंग दर्गा, वज्रेश्वरी देवीचे मंदिर, अकलोली, गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे, सिद्धिविनायक गणपती मंदिर (टिटवाळा), शिवमंदिर (अंबरनाथ) ही ठाण्याची प्रेक्षणीय स्थळे आहेत.
#3 मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुके (mumbai upnagar district taluka list in marathi)
साष्टी बेटांवर मुंबई उपनगर जिल्हा स्थित आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 446 चौ. किमी इथे असून वांद्रे हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली अशी तीन तालुके आहेत. माहीम, मालाड आणि मनोरी अश्या तीन खाड्या या उपनगरात स्थित आहेत. शिवाय दहिसर, ओशिवरा, पोईसर, मिठी या मुंबई उपनगर जिल्ह्यातील नद्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कान्हेरी गुंफा लेणी, जोगेश्वरी लेणी, जुहू चौपाटी, रोमन कॅथोलिक माउंट मेरी चर्च ही मुंबई उपनगरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
#4 मुंबई शहर जिल्ह्यातील तालुके (mumbai city district taluka list in marathi)
भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर आहे. देशातील सर्वात जास्त प्रमुख कार्यालय मुंबई शहरात स्थित आहेत.
पूर्वी मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम, मोठा कुलाबा आणि धाकला कुलाबा ही सात बेटे असल्याने मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला व क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा म्हणून मुंबई शहर ओळखले जाते.
इसवी सन 1990 मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांची निर्मिती झाली.
मुंबई शहराचे क्षेत्रफळ 157 चौ. किमी इतके आहे. मुंबईला पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या तिन्ही बाजूंनी अरबी समुद्रकिनारा असून उत्तरेला मुंबई उपनगर आहे. मुंबई शहरात दक्षिण मुंबई, जुनी मुंबई तसेच Island city नावाने ओळखले जाते.
मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहारा विमानतळ, फिरोजशहा मेहता उद्यान, तारापोरवाला मत्स्यालय, छ. शिवाजी महाराज संग्रहालय, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, जहागीर आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान भवन, सिद्धिविनायक मंदिर, जिजामाता उद्यान, भायखळा इत्यादी जगप्रसिद्ध स्थळे मुंबई शहरात आहेत.
#5 रायगड जिल्ह्यातील तालुके किती आणि कोणते आहेत (raigad district taluka list in marathi)
महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते. इसवी सन 1981 साली कुलाबा हे नाव बदलून रायगड असे केले गेले.
राजगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,152 किमी इतके आहे. या जिल्ह्याला 112 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. उल्हास, पाताळगंगा, कुंडलिका, काळ आणि सावित्री या प्रमुख नद्या हेर. अलिबाग तालुक्यातील साबरकुंड नदीवर एक धरण बांधण्यात आले आहे.
या जिल्ह्यात 15 तालुके असून प्रत्येक तालुक्यात पर्यटन स्थळे आहे. यामध्ये सागरी किल्ले, लेणी, किनारे यांचा समावेश होतो.
अलिबाग | उरण |
रोहा | पनवेल |
पेण | कर्जत |
खालापूर | महाड |
सुधागड (पाली) | माणगाव |
पोलादपूर | म्हासळे |
श्रीवर्धन | मुरुड |
तळा (तळे) |
या जिल्ह्यामध्ये रायगड, कर्नाळा, लिंगाणा, रेवदंडा, खांदेरी उंदेरी, मुरुड जंजिरा, सुधागड आणि सरसगड हे प्रमुख किल्ले आहेत. रायगड या किल्ल्यावर शिवाजी महाराज यांची समाधी आहे.
घारापुरी, तळे, कुंडाळ, अंबिवली, कोंडाणे, खडसांबळे, पालेल, कोल आणि रामधरण या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध लेणी आहेत. माणगड, खारघर आणि भिवपुरी हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबे आहेत. खोपोलीला धबधब्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.
जगप्रसिद्ध गणेशमूर्ती पेण येथे असून पाली तालुक्यात बल्लाळेश्वर आणि महाड तालुक्यात वरदविनायक ही अष्टविनायक गणपती आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कर्जत तालुक्यात आहे.
#6 रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके मराठी (ratnagiri district taluka list in marathi)
मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेला पश्चिम किनाऱ्यावरील जिल्हा म्हणजे रत्नागिरी. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 8,208 चौ. किमी इतके आहे. या जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत, ती पुढील
रत्नागिरी | गुहागर |
खेळ | दापोली |
मंडणगड | चिपळूण |
राजापूर | संगमेश्वर |
लांजा |
रत्नागिरी जिल्ह्याला 237 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. वशिष्टी, शास्त्री, जगबुडी, सावित्री, मुचकुंदी या प्रमुख नद्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंबे, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि फणस ही फळे पिकवली जातात. भात, नाचणी आणि वरी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात पिकवले जाते.
#7 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (sindhudurg district taluka list in marathi)
महाराष्ट्राचे सर्वात दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,207 चौ. किमी इतके आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय ओरस बुद्रुक हे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी आणि दोडामार्ग असे एकूण आठ तालुके आहेत.
इसवी सन 2006 साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. या जिल्ह्यात आंबोली धबधबा हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. यासोबतच सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे सागरी किल्ले देखील आहेत.
मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची भरादिदेविची यात्रा प्रसिद्ध आहे, याला कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. तसेच मालवण तालुक्यातील तारकर्ली हे स्नॉर्कलिंग व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्युबा ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे.
सारांश
या लेखातून आपण कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके (konkan division districts in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ?
कोकण प्रशासकीय विभागात एकूण सात जिल्हे आहेत. ते पुढीलप्रमाणे,
1. पालघर
2. ठाणे
3. मुंबई उपनगर
4. मुंबई शहर
5. रायगड
6. रत्नागिरी
7. सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील कोकण विभाग कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे ?
महाराष्ट्रातील कोकण विभाग तांदूळ, वरी, नाचणी, चिक्कू, केळी, नारळ, सुपारी, पोफळी, हापूस आंबे, कोकम आणि फणस या पिकासाठी प्रसिद्ध आहे.
कोकणात कोणती वने आढळतात ?
कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात.
कोकणात कोणत्या पिकाचा अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो ?
कोकणात भात आणि नाचणी या पिकाचा अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो.
किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्य पीक घेतात ?
किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात ज्वारी हे खाद्य पीक घेतात.
पुढील वाचन :