कोटक 811 खाते कसे उघडायचे ?

kotak zero balance account open marathi – मित्रांनो, भारतातील प्रत्येक बँक बचत खाते सुरू ठेवण्यासाठी ठराविक रक्कम दर महिन्याच्या अखेरीस जमा करायला लावतात. जर तुमच्याकडून काही ही बचत खात्यात रक्कम शक्य झाले नाही, तर तुम्हाला बँकेचा दंड भरावा लागतो.

जर तुम्ही या समस्येवर उपाय शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण या लेखातून मी झिरो बलेन्स खात्याविषयी (zero balance account) माहिती देणार आहे. या बचत खात्यात तुम्हाला कोणतीही रक्कम जमा करण्याची आवश्यकता नाही.

चला तर मग सुरू करूया, घरबसल्या कोटक 811 डिजिटल बँक खाते (Kotak Zero Balance Account Open Marathi) कसे उघडायचे ?

कोटक डिजिटल बँक बचत खाते (811 kotak zero balance account marathi)

kotak zero balance account open marathi

इसवी सन 2003 साली स्थापन झालेली कोटक महिंद्रा बँक (kotak mahindra bank) ही भारतातील खाजगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. ही बँक वैयक्तिक वित्त, गुंतवणूक बँकिंग, जीवन विमा आणि संपत्ती व्यवस्थापन इ. बँकिंग सेवा पुरविते. तसेच ही बँक बचत खाते, चालू खाते, क्रेडिट आणि डेबिट कार्ड सबंधित सेवा पुरविते.

8 नोव्हेंबर 2016 रोजी कोटक बँकेने झिरो डिजिटल बँक बचत खात्याची सुरुवात केली. या बचत खात्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कसलीही रक्कम जमा करण्याची गरज नाही.

कोटक 811 बचत खाते उघडल्यानंतर, तुम्ही ताबडतोब ऑनलाइन व्यवहार करू शकता. जसे की, फंड ट्रान्स्फर, मोबाइलला रिचार्ज, बिल पेमेंट इत्यादी.

Kotak 811 account opening documents required – कोटक डिजिटल अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व पॅन कार्डची आवश्यकता लागेल. लक्षात ठेवा, आधार कार्डनुसार तुमचे वय 18+ पाहिजे, तरच तुम्ही डिजिटल अकाउंट उघण्यासाठी अर्ज करू शकता.

कोटक 811 खाते कसे उघडायचे (kotak zero balance account open marathi)

Step 1 – कोटक बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, आणि वेबसाइट वरील बचत खाते पर्यायावर क्लिक करा किंवा Kotak 811 Account Opening Online Zero Balance हा पर्याय निवडा.

Step 2 – यानंतर कोटक 811 डिजिटल बँक बचत खाते हा पर्याय निवडा. आता अर्ज करण्यासाठी आता अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.

Step 3 – आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, त्यात तुमचे नाव, जन्मतारीख, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आणि पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक अचूकतेने भरा.

Step 4 – यानंतर तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड यापैकी एक लागेल. योग्य कागदपत्र निवडून सबमिट या बटनावर क्लिक करा.

Step 5 – अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला खाते क्रमांक आणि व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळेल. याचा वापर करून तुम्ही लगेचच ऑनलाईन व्यवहार करू शकता.

कोटक महिंद्रा बँक 811 फायदे मराठी (kotak 811 zero balance account features)

  1. कोणतेही किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच वार्षिक देखभाल शुल्क द्यावे लागत नाही.
  2. अमर्यादित ऑनलाइन व्यवहार करता येतात. तसेच मोफत व्हर्च्युअल डेबिट कार्ड देखील मिळते.
  3. NEFT, RTGS आणि IMPS वापरून मोफत ऑनलाइन फंड ट्रान्सफर करता येतो.
  4. बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 4% वार्षिक व्याज दर मिळतो.
  5. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे खाते कधीही व कुठेही वापरता येते.
  6. जर तुम्ही किमान शिल्लक ठेऊ शकत असाल तर तर तुम्ही 811 डिजिटल खात्यातून नॉर्मल खात्यात रूपांतर करू शकता.

सारांश

मित्रांनो, आशा करतो की हा लेख तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला कोटक 811 खाते उघडण्यास काही अडचण येत असेल, तर आम्हाला नक्की कळवा. तुमची मदत करण्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कोटक 811 डिजिटल बँक बचत खात्याची प्रतिदिन व्यवहार मर्यादा किती आहे ?

कोटक 811 खात्यासाठी दैनंदिन व्यवहार मर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
1. ऑनलाइन व्यवहारांसाठी 10,000 रूपये
2. POS किंवा ई-कॉमर्स – 25,000 रुपये

कोटक 811 बँक खाते सुरक्षित आहे का ?

होय, कोटक 811 बँक खाते सुरक्षित आहे. कोटक महिंद्रा बँक ही भारतातील मोठ्या बँकांपैकी एक असून कोटक 811 ची सुविधा पुरविते.

पुढील वाचन :

  1. स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन तयार कसा करायचा ?
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज माहिती

2 thoughts on “कोटक 811 खाते कसे उघडायचे ?”

    • हो, कोटक बँक kyc पूर्ण झाल्यानंतर चेक बुक देतो, त्यासाठी बँकेत अर्ज द्यावा लागतो.

      Reply

Leave a Comment