lakshmi puja 2022 vidhi marathi – दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण असा दिव्यांचा सण आहे. लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते.
आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला खूप महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा एक सण असून या दिवशी लक्ष्मीपूजन करून एक आनंदाचा क्षण साजरा करतात.
या लेखातून आपण लक्ष्मी पूजन कसे करायचे , लक्ष्मी पूजन करण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि लक्ष्मी पूजन विधी मराठीमध्ये (lakshmi puja 2022 vidhi marathi) जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- लक्ष्मी पूजन साहित्य मराठी (lakshmi pujan sahitya in marathi 2022)
- लक्ष्मी पूजन करण्याचे नियम मराठी (laxmi puja rules in marathi 2022)
- लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त माहिती (Laxmi Pujan Shubh Muhurt 2022 in marathi)
- लक्ष्मी पूजन विधी माहिती मराठी (lakshmi puja 2022 vidhi marathi)
- श्री गणेशाची पूजा विधी (lakshmi puja 2022 vidhi marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
लक्ष्मी पूजन साहित्य मराठी (lakshmi pujan sahitya in marathi 2022)
लक्ष्मीपूजनासाठी देवी आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती किंवा तसबिरीसह हळद-कुंकू, अक्षता, विड्याचे पान, सुपारी, श्रीफळ, लवंग, वेलची, धूप, कापूर, अगरबत्ती, दीपक, कापूस, धागा, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) आवश्यकच आहे.
यासोबतच गंगाजल, गुळ, धने, ऋतुकालोद्भव फळे, फुले, जव, गहू, दूर्वा, चंदर, शेंदूर, सुकामेवा, लाह्या, बत्तासे, यज्ञोपवीत, वस्त्र, अत्तर, चौरंग, कलश, कमल पुष्प माला, शंख, आसन, पूजाथाळी, चांदीची नाणी, आंब्याची डहाळी, नैवेद्य, असे पूजा साहित्य लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक मानले गेले आहे.
लक्ष्मी पूजन करण्याचे नियम मराठी (laxmi puja rules in marathi 2022)
- लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या ठेवू नये. तसेच लक्ष्मीपूजनावेळी फक्त लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करू नये.
- लक्ष्मी देवी सोबत नेहमी गणपती किंवा सरस्वती देवीची पूजा करावी.
- लक्ष्मी देवीची मूर्ती हसमुख स्वरुपाची असावी.
- पूजन करताना लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती उत्तर दिशेला स्थापन करावी.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले असलेले तोरण आवर्जुन लावावे. तसेच प्रवेशद्वारावर गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून शिंपडावे असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
दिवाळीतील लक्ष्मीपूजन करताना देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख, समृद्धीत वृद्धी होते, अशी मान्यता आहे.
लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त माहिती (Laxmi Pujan Shubh Muhurt 2022 in marathi)
लक्ष्मी पूजन मुहूर्त मराठी (lakshmi puja 2022 muhurat marathi) – या वर्षी लक्ष्मी पूजन सोमवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सायंकाळी 06:53 ते रात्री0 8:16 मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त आहे.
हा लेख जरूर वाचा – धनतेरस पूजा मुहूर्त मराठी (dhanteras puja shubh muhurat 2022 marathi)
लक्ष्मी पूजन विधी माहिती मराठी (lakshmi puja 2022 vidhi marathi)

पूजा सुरू करण्यापूर्वी श्री महालक्ष्मीची प्रतिमा लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.
तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित ठेवावा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.
हे दीप देवी! मला नेहमी सुखी राहू दे.
असे म्हणत पाकळ्या दिव्याच्या खालच्या बाजूस टाका. हातात पाणी घेऊन खालील प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा आणि चौथा मंत्र म्हटल्यानंतर हात धुवून घ्या.
- ओम केशवाय नम: स्वाहा
- ओम माधवाय नम: स्वाहा
- ओम गोविंदाय नम: स्वाहा
- ओम ऋषीकेशाय नम: हस्त-म् प्रक्षाल्-यामि।
यानंतर पवित्रीकरण पूजेसाठी उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी खालील मंत्र बोला आणि स्वत: च्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.
भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंत:करण पवित्रता प्राप्त करू शकतो.
यानंतर शुभ कार्य आणि शांतीसाठी पुढील मंत्राचे उच्चारण करावे.
हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे.
हे अंतरिक्षा! मला शांतता मिळू दे.
हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे.
हे जल! मला शांतता लाभू दे.
हे औषधीदेवी! मला शांती मिळू दे.
हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे.
जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.
हे सदा कार्यात मग्न असणार्या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर.
हे नारायणी! सर्व प्रकारची मंगलकामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात.
मी आपल्या शरण येतो. माझा आपणास नमस्कार आहे.
तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.’
यानंतर हातात पाणी घेऊन पुढील वाक्य म्हणावे – दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी श्री महालक्ष्मीची प्रसन्नतेने पूजा करतो.
श्री गणेशाची पूजा विधी (lakshmi puja 2022 vidhi marathi)
यानंतर गणपतीची पूजा करावी. श्री गणेशाचे ध्यान प्रणाम म्हणून केला जातो. गणेशाचे ध्यान करण्यासाठी खालील मंत्राचे उच्चारण करावे.
सृष्टीच्या प्रारंभकाळात प्रकट झालेले जे या जगाचे परमकारण आहे. गणेशाला चार भुजा आहेत, गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सूपाच्या आकाराचे आहेत, त्यांना केवळ एकच दात आहे. ते लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्यांना लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत. त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्या हातात अंकुश, तिसर्या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेले आहे. त्यांचे वाहन उंदीर आहे. जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त होते.’ हे गणराया! आपल्याला प्रणाम करतो.
यानंतर हातात अक्षता घेऊन ॐ महालक्ष्मी देवी! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठीत हो असा मंत्र म्हणून अक्षता अर्पण करावी.
प्रथम पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान करावे. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
महालक्ष्मीची मूर्ती मातीची असेल तर एका पूजेच्या सूपारीवर गणेशाची भावना व्यक्त करून स्नान केले जाते. मूर्तीवर थोडे पाणी शिंपडून ताब्यात ठेवून पुढील मंत्र म्हणून स्नानीय समर्पण व शुद्धोदक स्नान करतात.
हे देवी! गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे. त्याने आपल्याला आंघोळ घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा.
हे देवी! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत. आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा.
यांनतर महालक्ष्मी देवीला वस्त्र समर्पण करतात. यावेळी पुढील मंत्राचे उच्चारण करावे.
हे महालक्ष्मी! विविध प्रकारचे चित्र, सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ दे.
मग महालक्ष्मी आणि गणपतीला रक्त चंदन अर्पित केले जाते. यावेळी सुगंधी अगरबत्ती लावून धूप पसरवून पुढील मंत्र म्हणतात.
उत्तम गंधयुक्त वनस्पतिच्या रसापासून तयार धूप, जी सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे.
हे महालक्ष्मी! हे आपल्या सेवशी समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा.
ज्योती दर्शनविधी करण्यासाठी एक दिवा लावून हात धुवून घ्या आणि पुढील मंत्र म्हणा.
हे महालक्ष्मी! कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे.
तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे.
हे दीप ज्योतिर्मय देवी! माझ्या परमात्मा! मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे.
हे देवी! आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा करा.
यानंतर देवीला नैवेद्य निवेदन विधी असतो. यामध्ये विविध प्रकारचे मोदक, मिठाई, केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करताना पुढील मंत्र म्हणा.
‘हे देवी! दही, दूध, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करतो.
आपण त्याचा स्वीकार करा.
हे देवी! आपण हे नैवद्य ग्रहण करा आणि आपल्या प्रती माझ्या मनात असलेल्या भक्तीस सार्थक करा. मला परलोकात शांती मिळू दे.
यानंतर एक श्रीफळ किंवा दक्षिणा देवीला दान केली जाते. मग कापराच्या तीन वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते.
यानंतर ॐ महालक्ष्मीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो असे म्हणून देवीला पुष्पांजली अर्पण करा. ॐ महालक्ष्मीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पण करा.
हे महालक्ष्मी! तू विघ्नांवर विजय मिळविणारी आणि ज्ञान संपन्न आहेस.
आपल्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार अनेक वेळा नमस्कार.
हे देवी! आपण नेहमी माझ्या कार्यात येणार्या विघ्नांचा सर्वनाश करा.
असे म्हणत देवीची प्रार्थना करून खालील मंत्र म्हणून क्षमाप्रार्थना करावी.
हे देवी! मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधीवत पूजा करू शकलो नाही.’
हे देवी! मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दलमला क्षमा कर. मी या केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न रहाल अशी अपेक्षा करतो.
या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहीत महालक्ष्मी संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही तिचाच अधिकार आहे. असे म्हणत देवीला साष्टांग प्रणाम करावा.
यानंतर दिवा पात्रात तूप टाकून कापसाची वात लावावी. दिवा उजळून झाल्यावर हात धुवायचा आणि दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवून द्या.
अशा प्रकारे लक्ष्मी पूजन विधी (lakshmi puja 2022 vidhi marathi) संपन्न झाला.
सारांश
या लेखातून आपण लक्ष्मी पूजन विधी माहिती मराठी (lakshmi puja 2022 vidhi marathi) सविस्तरपणे जाणून घेतली आहे. यात आपण लक्ष्मी देवी पूजेसाठी लागणारे साहित्य, नियम आणि विधी याविषयी माहिती जाणून घेतली आहे.
सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा… 😊💥
🙏 Happy Diwali 2022 🙏
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
लक्ष्मी पूजन कधी आहे ?
लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोंबर 2022 रोजी आहे. या दिवशी सायंकाळी 06:53 ते रात्री0 8:16 मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त आहे.
लक्ष्मी देवीची आरती मराठी
जय देवी श्रीदेवी माते ।
वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥
श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥
जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।
शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥
भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।
आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥
गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।
मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती ॥ २ ॥
जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती ।
अनन्य भावे तुजला स्मरुनी प्रार्थीती ॥
त्यांच्या हाकेला तूं धांवुनिया येसी ।
संतती, वैभव किर्ती धनदौलत देसी ॥ ३ ॥
विश्वाधारे माते प्रसन्न तूं व्हावे ।भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ॥
मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी ।
म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ॥ ४ ॥
पुढील वाचन :
- जाणुन घ्या आपण दिवाळी का साजरी करतो ?
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2022
- दिवाळी पूजेचा मुहूर्त, लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ
- वसुबारस माहिती मराठी
- जाणून घ्या गणपतीची पूजा कशी मांडावी ?
माहिती स्रोत – मराठी वेब दुनिया