भूमी मराठी माहिती – व्याख्या, प्रकार आणि गुणधर्म

Land Information In Marathi – भूमी म्हणजे जमीन. जमीन ही सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा आधार म्हणून ओळखली जाते. सजीवांचा जन्म, विकास आणि शेवट या जमिनीशी निगडित आहे. डोंगर, दऱ्या, नदी नाले अश्या प्रत्येकास जमिनीचा आधार लागत असतो.

पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी भूमी एक असून सर्व सजीव सृष्टीला आसरा मिळत आहे. पाणी, हवा आणि भूमी या नैसर्गिक साधनसंपत्तीचा एक भाग आहे.

जमिनीवर सर्व जीवजंतू, प्राणिमात्र आणि वनस्पती, इतर घटक वास्तव्यास आहे. जमिनीमध्ये आपल्याला विविध खनिज पदार्थ, वायू आणि पाणी मिळत असते. पृथ्वीवर सुमारे 30 टक्के जमीन आहे आणि उरलेले 70 टक्के पाणी आहे.

जमिनीच्या वरच्या स्तराला भुपटल असे म्हणतात.

या लेखात आपण भूमी म्हणजे काय (land information in marathi), भूमीचे प्रकार व गुणधर्म या विषयावर सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

भूमी गुणधर्म मराठी माहिती (land information in marathi)

land information in marathi

पृथ्वीवरील माती ही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात आढळून येते. त्यामुळे मातीचे गुणधर्म देखील वेगळे असते. माते खडक फुटल्याने तयार होत असते. ही प्रक्रिया पृथ्वीच्या भौतिक, रासायनिक, जैविक घडामोडीतून होत असते.

विविध ठिकाणचे खनिज कण आणि पाण्याबरोबर वाहत आलेले खडकाचे तुकडे यापासून तयार झालेले पदार्थ मैदानी प्रदेशात पसरतात. यावरून मातीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये काळी माती, पांढरी माती, लाल माती, खनिजांच्या आधारे क्षार असलेली जमीन, आम्लयुक्त माती, चिकन माती, भरड माती यांचा समावेश होतो.

यातील काही माती पीक घेण्यासाठी योग्य असते, तर काही मातीत पिके घेता येत नाहीत. जमिनीच्या वरच्या थरातील माती एकदम उच्च गुणवत्तेचे असते, तिची निर्मिती व्हायला अधिक काळ लागतो.

त्यामुळे उच्चप्रतीचे मातीची योग्य काळजी घेणे गरजेचे असते, जमिनीची धूप होणार नाही, अशाप्रकारे तिची काळजी घ्यावी लागते. नाहीतर ती जमीन नापीक बनते आणि कनिष्ठ दर्जाची बनून जाते.

मानव सृष्टीचे राहण्यासाठी घर, अन्नधान्याची उत्पादन, पाण्याचे संकलन आणि इतर मूलभूत गोष्टी जमिनीवर आधारित असतात. त्यामुळे आपण जमिनीचा योग्य वापर करणे गरजेचे असते.

वाढत्या शहरीकरणामुळे दाट लोकवस्ती होत आहे, यामध्ये अनेक झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडत आहे. याचे परिणाम सर्व जग विविध प्रकारच्या दुष्परिणामांना तोंड देत आहे.

Related – पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी

भूमीचे विविध प्रकार मराठी माहिती (types of soil information in marathi)

सर्वसाधारण जमीन – या प्रकारची जमीन शेतीसाठी उपयुक्त ठरते. याव्यतिरिक्त अशी जमीन घरे बांधण्यासाठी योग्य असते. प्राणी आणि पक्षी यांचा निवास म्हणून अश्या ठिकाणी संग्रहालय उभारण्यात येतात.

पाणथळ जमीन – अश्या जमिनीत पाण्याचे प्रमाण अधिक प्रमाणत असते. या ठिकाणी पाणी जमिनीत न जाता भूभागावर राहते. त्यामुळे अश्या ठिकाणी दलदल तयार होते. ही जमीन शेतीसाठी उपयुक्त नसते तसेच यावर घर बांधता येत नाही.

धरण, तलाव, बांध आणि नदी यांच्या आजूबाजूच्या परिसरात सतत पाणी झिरपून तेथील जमीन पाणथळ होते. या जमिनीचा वापर जलवनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी केला जातो.

पडीक जमीन (land information in marathi) – या जमिनीवर खडक पाणी मुरण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही माती पूर्णपणे निरुपयोगी झालेली असते. यावर शेती करता येत नाही.

Related – रब्बी हंगामातील पिकांची नावे

वाळवंटी प्रदेश – या प्रकारच्या जमिनीत मातीचे कण मोठे असतात, त्यामुळे पाणी जिरवण्याची क्षमता नसते. या जमिनीत कोणतेही उत्पादन घेता येत नाही. अशा जमिनीच्या परिसरामध्ये पाण्याची कमतरता दिसून येते. आजूबाजूचा परिसर वाळवंट होऊन जातो.

खारफुटीचे प्रदेश – अशी जमीन सामान्य आपण समुद्र किनारी आणि खाडी या परिसरात आढळून येते. या ठिकाणी मातीचा क्षार ग्रहण करण्याची शक्ती अधिक असते. इथे उगवणारा वन असताना खारफुटी वनस्पती म्हणतात. या वनस्पती समुद्रकिनारी सुरक्षित राखणे मध्ये मदत करतात आणि जमिनीची धूप होण्यापासून रोखतात.

सारांश

या लेखात आपण भूमी म्हणजे काय (land information in marathi), भूमीचे विविध उपयोग, रूपे, प्रकार आणि गुणधर्म याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली.

जमीन ही सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा निवारा आहे. वाढत्या गरजा आणि शहरीकरणामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर नासधूस होऊन मातीचे प्रदूषण होत आहे. मातीचे गुणधर्म मराठी माहिती (land information in marathi) तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट द्वारे कळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

भूमी समानार्थी शब्द मराठी

जमीन, माती, धरती, अवणी, आई

भूमी उपयोजन म्हणजे काय मराठी ?

निसर्गाचा समतोल राखून मानवाचा विकास व्हावा, यासाठी जमिनीची केली जाणारी योजना म्हणजे भूमी उपयोजना होय.

भूमी उपयोजन सिद्धांत कोणी मांडला ?

वाँन थ्यूनेन यांनी भूमी उपयोजन सिद्धांत मांडला.

महाराष्ट्र राज्यात जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. महाराष्ट्र राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात जांभी मृदा आढळते.

महाराष्ट्रातील मृदा प्रकार कोणते आहे ?

महाराष्ट्रात काळी मृदा,जांभा मृदा,गाळाची मृदा,तांबडी मृदा आढळते.

मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक सांगा.

मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात.

मृदा म्हणजे काय मृदा कशी तयार होते ?

मृदा म्हणजे जमीन. जिला आपण माती, धरणी या नावाने देखील ओळखतो. मृदा साधारणपणे खडकापासून तयार होते. खडकाच्या प्रकरणावरून मातीचा रंग ठरतो. उदा. जांभा खडकापासून तयार झालेली मृदा तांबडी असते, तर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली मृदा काळी असते.

Leave a Comment