lasavi masavi in marathi – लसावी व मसावी हा अंकगणितातील अतिशय महत्वाचा घटक आहे. सरळसेवा भरती आणि स्पर्धा परीक्षा देत असताना, यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तसेच दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात देखील हा घटक आहे. कमी वेळात अचूक उत्तरे काढण्यासाठी तुम्हाला लसावी किंवा मसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती माहिती पाहिजे. ज्याच्या मदतीने तुम्ही कमी वेळेतही एकदम अचूक उत्तरे काढू शकाल.
या लेखातून आपण आज लसावी मसावी म्हणजे काय (lasavi masavi in marathi) आणि तो कसा काढायचा ? याची सोपी पद्धत काय आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – मूळ संख्या माहिती मराठी (mul sankhya in marathi)
Table of Contents
लसावी मसावी म्हणजे काय (lasavi masavi in marathi)

विषय | लसावी मसावी |
प्रकार | अंकगणितातील घटक |
अंकगणित ही गणिताची एक प्रमुख शाखा आहे. यात अंक व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. यामधील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे मसावी आणि लसावी.
लसावी मसावी काढण्याची सोपी पद्धत (how to find lcm and hcf in marathi)
- दिलेल्या सर्व संख्या आडव्या मांडून घ्याव्यात. त्यांचे बॉक्स तयार करा.
- आता दिलेल्या सर्व संख्यांना एकच संख्येने भाग द्यावा. त्यानंतर पुन्हा उरलेल्या सर्व संख्यांना भाग जात असेल तर द्यावा व सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जात नसेल तर डाव्या बाजूकडील संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी होय.
- त्यानंतर लसावी काढण्यासाठी उरलेल्या कमीत कमी दोन संख्यांना जरी एकाच संख्येने भाग गेला तरी द्यावा.
- जोपर्यंत कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत द्यावा.
- नंतर डाव्या बाजूकडील सर्व संख्यांचा गुणाकार गुणिले उरलेल्या संख्या यांचा गुणाकार म्हणजे लसावी होय.
मसावी म्हणजे काय (Lasavi meaning in marathi)
मसावीचा फुल्ल फॉर्म (hcf full form in marathi) महत्तम साधारण विभाजक असा आहे, मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्याना भाग जातो. अर्थातच या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते.
HCF full form – Highest Common Factor |
मसावी काढण्याची सोपी पद्धत (How to find HCF quickly in marathi)
- दिलेल्या सर्व संख्या आडव्या मांडून घ्याव्यात. त्यांचे बॉक्स तयार करा.
- आता दिलेल्या सर्व संख्यांना एकच संख्येने भाग द्यावा.
- त्यानंतर पुन्हा उरलेल्या सर्व संख्यांना भाग जात असेल तर द्यावा.
- नंतर सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जात नसेल तर डाव्या बाजूकडील संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी होय.
मसावी सोडवलेले उदाहरणे (highest common factor example questions and answers)
1. मसावि काढा. 25, 15 व 35.
5 | 25 | 15 | 35 |
5 | 3 | 7 |
- 25, 15 आणि 35 या संख्या आडव्या मांडून घेतल्या. त्यांचे बॉक्स तयार केले.
- 25, 15 आणि 35 या संख्येला एकच संख्येने भाग जाणारी संख्या 5 आहे. त्यामुळे 5 ने सर्व संख्यांना भाग दिला.
- उरलेल्या संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही.
- डाव्या बाजूकडील संख्यांचा गुणाकार हा मसावि असतो, त्यामुळे 25, 15 व 35 मसावि 5 हा आहे.
2. मसावि काढा. 56 आणि 32.
8 | 56 | 32 |
7 | 4 |
किंवा,
2 | 56 | 32 |
2 | 28 | 16 |
2 | 14 | 8 |
7 | 4 |
- 56 आणि 32 या संख्या आडव्या मांडून घेतल्या.
- त्यांचे बॉक्स तयार केले.
- 56 आणि 32 या संख्येला एकच संख्येने भाग जाणारी संख्या 2 आहे. त्यामुळे 2 ने सर्व संख्यांना भाग दिला.
- उरलेल्या संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही.
- डाव्या बाजूकडील संख्यांचा गुणाकार हा मसावि असतो, त्यामुळे 2 × 2 × 2 = 8 मसावि 8 हा आहे.
लसावी म्हणजे काय (lcm meaning in marathi)
लसावीचा फुल्ल फॉर्म (lcm full form in marathi) लघुत्तम सामाईक विभाजक असा आहे. लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो. अर्थातच या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी लहान संख्या नसते.
LCM full form – Least Common Multiple |
लसावी काढण्याची पद्धत (How to find LCM quickly in marathi)
- दिलेल्या संख्यांचा मसावि काढून घ्यावा. त्यानंतर लसावि काढण्यासाठी उरलेल्या कमीत कमी दोन संख्यांना जरी एकाच संख्येने भाग गेला तरी द्यावा.
- जोपर्यंत कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत द्यावा.
- नंतर डाव्या बाजूच्या सर्व संख्यांचा गुणाकार गुणिले उरलेल्या संख्या यांचा गुणाकार म्हणजे लसावि होय.
लसावि सोडवलेले उदाहरणे (Least Common Multiple example questions and answers)
1. 18, 36 व 27 या संख्यांचा लसावी काढा.
3 | 18 | 36 | 27 |
3 | 6 | 12 | 9 |
2 | 2 | 4 | 3 |
1 | 2 |
- दिलेल्या संख्या 18, 36 व 27 या आडव्या मांडून घेतल्या. त्यांचे बॉक्स तयार केले.
- त्यानंतर तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जाईपर्यंत भाग दिला. त्यानंतर तिन्ही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, त्यामुळे उरलेल्या दोन संख्यांना 2 ने भाग दिला.
- नंतर डाव्या बाजूच्या सर्व संख्यांचा गुणाकार गुणिले उरलेल्या संख्या यांचा गुणाकार (3 × 3 × 2 × 1 × 2 × 3 = 108) म्हणजे 108 लसावि होय.
2. 18 व 27 या दोन संख्यांचा लसावी किती ?
3 | 18 | 27 |
3 | 6 | 9 |
2 | 3 |
1.दिलेल्या संख्या 18 व 27 या आडव्या मांडून घेतल्या. त्यांचे बॉक्स तयार केले.
2. या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाईल तो पर्यंत भागिले.
3. त्यानंतर उरलेल्या संख्येला पुढे भाग जात नाही, म्हणून भाग देणे थांबविले.
4. नंतर डाव्या बाजूच्या सर्व संख्यांचा गुणाकार गुणिले उरलेल्या संख्या यांचा गुणाकार म्हणजे (3 × 3 × 2 × 3 = 54) लसावि होय.
हा लेख जरूर वाचा – विरामचिन्हे माहिती मराठी (punctuation marks information in marathi)
सारांश
या लेखातून आपण लसावी मसावी म्हणजे काय (lasavi masavi in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. यात आपण लसावी मसावी काढण्याची सोपी पद्धत (how to find lcm and hcf in marathi) जाणून घेतली.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
लसावी म्हणजे काय ?
लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. म्हणजे या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारी लहान संख्या नसते.
मसावी म्हणजे काय ?
मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. म्हणजेच या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते.