जीवन विमा मराठी माहिती (Life insurance information in marathi)

By | November 14, 2022

Life insurance information in marathi – आपले दैनंदिन जीवन सुरक्षित असावे, आपल्या जीवनात अडचणी आणि संकट येऊ नये, आपले आर्थिक नुकसान होऊ नये अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आपल्यावर येणाऱ्या आपत्ती केव्हाही येतात. या आपत्ती अनेक प्रकारच्या असतात. त्यामुळे येणारी आपत्ती आणि संभाव्य धोके विचारात घेऊन विम्याच्या योजना बनवल्या जातात.

विम्याचा प्रकारांमधील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे जीवन विमा होय. जीवन विमा विमे दाराच्या आयुष्याचा उतरवलेला असतो. व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे, पण जर घरातील कर्त्या पुरुषाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट उभे राहते. अशा वेळेस जीवन विमा असल्यास येणारी आर्थिक अडचण दूर होते.

त्यामुळे आपण जीवन विमा काढत असतो. या लेखात आपण जीवन विमा मराठी माहिती (Life insurance information in marathi) जाणून घेणार आहोत. या लेखात प्रामुख्याने जीवन विमा म्हणजे काय ? त्याचे प्रकार आणि जीवन विमा उतरवण्याची पद्धत, जीवन विम्याचे पैसे मिळवण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

जीवन विमा मराठी माहिती (Life insurance information in marathi)

Life insurance information in marathi
विषय जीवन विमा
प्रकारविम्याचे प्रकार

जीवन विमा हा विमेदाराच्या आयुष्याचा उतरवलला असतो. त्यामुळे याला आयुर्विमा असेही म्हणतात. जीवन विमा हा इतर विम्यांसारखाच प्रकार आहे. यामध्ये विमेदाराने दरवर्षी ठराविक रक्कम हफ्ता म्हणून विमा कंपनीकडे भरायचे असतात. कराराची मुदत संपल्यानंतर विमा कंपनी विमेदाराला विम्याची रक्कम देतात.

विम्याचे हप्ते चालू असताना विमेदाराचा मृत्यू झाला तर विम्याची पूर्ण रक्कम त्याच्या वारसदारांना दिली जाते.

सध्याच्या युगात जीवन विमा खूप आवश्यक आहे. व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे, पण जर घरातील कर्त्या पुरुषाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट उभे राहते. अशा वेळेस जीवन विमा असल्यास येणारी आर्थिक अडचण दूर होते.

विमेदाराला विमा कंपनीला स्वतः संबंधी संपूर्ण आणि खरी माहिती द्यावी लागते. चुकीची किंवा अर्धवट माहिती दिल्यास विमा कराराचा भंग समजला जातो.

जीवन विमा हा वयक्तिक, पती-पत्नी, धनको-ऋणको, मालक-नोकर, भागीदार असे कुणीही उतरवू शकतो.

जीवन विमा प्रकार माहिती मराठी (Life insurance types information in marathi)

आजीव विमा (Whole Life Insurance Policy) या विम्याच्या प्रकारात विमेदारास आयुष्यभर विम्याचे हप्ते भरावे लागतात. या हफ्त्याची रक्कम कमी असते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना विम्याची रक्कम मिळते.

मुदत विमा (term life insurance policy) या विम्याच्या प्रकारात विशिष्ट मुदतीपर्यंत हफ्ते भरावे लागते. विम्याच्या हप्त्याची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम परत मिळते. जर विम्याचे हप्ते पूर्ण होण्याअगोदर विमेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना विम्याची पूर्ण रक्कम मिळते.

हा विमा मुलांचे शिक्षण, मुलींचा विवाह अशा हेतूने उतरविला जातो.

हा लेख जरूर वाचाWhat is insurance and types of insurance

संयुक्त जीवन विमा (joint life insurance policy) या विम्याच्या प्रकारात दोन किंवा जास्त व्यक्तीचा एकत्रित विमा उतरविला जातो. या विम्याचे हफ्ते पूर्ण झाल्यावर विम्याची सर्व रक्कम सर्व व्यक्तींना मिळते. जर कोणत्याही एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर उरलेल्या व्यक्तींना विम्याची रक्कम मिळते.

प्रवासी विमा (travelers life insurance policy) या प्रकारचा विमा प्रवास करताना उतरविला जातो. हा विमा फक्त प्रवासापुरताच संरक्षण देतो.

दुहेरी मुदत विमा, बहुउद्देशीय विमा, मर्यादित रक्कम देण्याचा विमा हेदेखील जीवन विम्याचे प्रकार आहेत.

हा लेख जरूर वाचाTop 10 Best health insurance companies in india 2022

जीवन विमा कसा उतरवतात (how to apply life insurance)

how to apply life insurance – भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यासाठी जी व्यक्ती पात्र आहे, अशी व्यक्ती स्वतःचा किंवा अल्पवयीन मुलांचा जीवन विमा उतरवू शकतो.

  • जीवन विम्यासाठी अर्ज करताना स्वतःचे संपूर्ण नाव, वय, पत्ता, व्यवसाय, जन्मतारीख, विम्याचा उद्देश, मुदत इत्यादी माहिती भरावी लागते.
  • स्वतःची प्रकृती आणि कुटुंबातील व्यक्ती याविषयी सविस्तर माहिती असलेले निवेदन सादर करावे लागते. ही माहिती खरी आणि अचूक भरावी.
  • अर्ज आणि निवेदन सादर केल्यानंतर अर्जदाराची वैद्यकीय तपासणी केली जाते. ही तपासणी आयुर्विमा महामंडळाचे अधिकृत डॉक्टर करत असतात.
  • अर्ज आणि वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर अर्जातील माहिती समाधानकारक असली तर प्रस्ताव मान्य केला जातो.
  • जर अर्जातील माहितीच्या समाधानकारक असेल तर प्रस्ताव फेटाळला जातो.
  • अर्ज स्विकारल्याचे पत्र महामंडळ अर्जदारास पाठवते. त्यानंतर अर्जदाराला मंडळास पहिला हप्ता भरावा लागतो. त्यानंतर महामंडळ विमेदारचे विमापत्र तयार करून विमेदारास पाठवते.
  • अशा प्रकारचे विमापत्र हे कराराचा कायदेशीर पुरावा म्हणून समजले जाते.

जीवन विम्याचे पैसे कसे मिळवतात (how to claim life insurance)

how to claim life insurance – जीवन विम्याची मुदत संपल्यानंतर रक्कम परत मिळवण्यासाठी विमेदारास किंवा त्याच्या वारसांना विमा कंपनीकडे दावा दाखल करावा. जर हप्ते वेळेवर भरले असेल तर विम्याची रक्कम त्वरित मिळते.

जर विमेदाराचा मृत्यू झालेला असेल दादा तर वारसांना दावा दाखल करताना वारसाहक्क दाखला आणि विमेदाराचे मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

दावा आणि कागदपत्रे विम्याची कंपनी तपासतात आणि दावा समाधानकारक वाटला तर दावा मान्य करून वारसदारांना विम्याची रक्कम देतात.

हा लेख जरूर वाचाHow to fill lic death claim form 2022

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण जीवन विमा मराठी माहिती (Life insurance information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जीवन विमा माहिती (Life insurance information in marathi) यामधे आपण जीवन विमा म्हणजे काय ? त्याचे प्रकार आणि जीवन विमा उतरवण्याची पद्धत, जीवन विम्याचे पैसे मिळवण्याची पद्धत याविषयी माहिती पाहीली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे अन्न (faq)

भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी कोणती आहे ?

भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसी (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही आहे.

आयुर्विमा म्हणजे काय ?

जीवन विमा हा विमेदाराच्या आयुष्याचा उतरवलला असतो. त्यामुळे याला आयुर्विमा असेही म्हणतात. विमा काढलेल्‍या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी हे संरक्षण म्हणून वापरले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *