लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम माहिती मराठी

linux operating system mahiti – एकविसावे शतक संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते, याचे मुख्य कारण म्हणजेच आजच्या काळात मानव संगणकाने पूर्णतः वेढलेला आहे. विविध कार्य करण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मिळून संगणक तयार झाला आहे. सॉफ्टवेअर हे वापरकर्ता आणि संगणक यामधील संभाषण करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम असून ते भौतिक साधन नसून लिखित स्वरूपात असते.

हार्डवेअर हे संगणकाचे शरीर असते तर सॉफ्टवेअर संगणकाचा आत्मा असतो. सॉफ्टवेअर हे दोन प्रकारचे असतात.

1. सिस्टीम सॉफ्टवेअर – हार्डवेअर उपकरणांचे नियंत्रण व संचालन करण्यासाठी सिस्टिम सॉफ्टवेअर वापरतात. ऑपरेटिंग सिस्टिम, युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर आणि लँग्वेज ट्रान्सलेटर याद्वारे कॉम्पुटर सिस्टिम नियंत्रित व संचालित केली जाते.

2. अँप्लिकेशन सॉफ्टवेअर – संगणकाला विशिष्ट कार्य करण्यासाठी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर होतो. हे सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण विविध कामे करू शकतो. उदा. संगणकावर खेळ खेळणे, गणे ऐकणे, बिले तयार करणे, इंटरनेटचा वापर करणे.

मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टिम पर्सनल कॉम्प्युटरसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते. सर्व्हर आणि महासंगणकांमध्ये लिनक्सचा जास्त वापर केला जातो.

या लेखातून आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम माहिती मराठी (linux operating system mahiti) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम माहिती मराठी (linux operating system mahiti)

linux operating system mahiti
नावलिनक्स
प्रकारऑपरेटिंग सिस्टिम
उपयोगवयक्तिक, सर्व्हर आणि सुपर कॉम्पुटर मध्ये संचालन प्रणाली
शोध लिनस टोरवाल्ड्स (1990)

लिनक्स मुक्त स्त्रोतापासून बनवलेली ऑपरेटिंग सिस्टिम आहे. लिनक्स आणि युनिक्स या दोन्हीत बऱ्यापैकी साम्य आढळते. इसवी सन 1990 मध्ये लिनस टोरवाल्ड्स याने लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली, त्यामुळे त्याला लिनक्सचा मूळ निर्माता म्हणून ओळखले जाते.

लिनक्स सुरुवातीला इंटेल-386 मायक्रो प्रोसेसरवर आधारित पर्सनल कॉम्प्युटरसाठी बनविले होते. आता विविध प्रकारच्या व्यक्तिगत संगणक, महासंगणक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात वापरले जाते.

सुरुवातीच्या काळात मोजक्या कॉम्पुटर डेव्हलपरने लिनक्स विकसित केले. आता माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कंपन्या लिनक्सला अधिक विकसित करीत आहेत. उदा. आय.बी.एम, एचपी

अँड्रॉइड मोबाईल फोन प्रणालीचा विकास लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम वापरून केला आहे. तसेच इलेक्ट्रिक घड्याळ, गाडी, घरातील अनेक उपकरणात लिनक्सचा वापर केला जातो.

संगणक क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तरीदेखील लिनक्सने स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांमुळे बाजारात आपले स्थान निर्माण केले.

लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमचे वैशिष्ट्य मराठी (features of linux operating system mahiti marathi)

लिनक्स ओएस कोड सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. या कोडमध्ये कुणीही बदल करून वयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी याचा वापर करू शकतात.

लिनक्स फाइल सिस्टम अतिशय सोप्या पद्धतीने केलेली असते. यात प्रिंटर आणि स्कॅनर फाईल्सचा प्रकार मानला जातो.

लिनक्स वेगवेगळ्या प्रकारच्या हार्डवेअरला सपोर्ट करते. जुन्या आणि कमी मेमोरी असणाऱ्या संगणकात लिनक्स चांगल्या प्रकार कार्य करते.

लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिममध्ये एकाधिक वापरकर्ते क्षमता आणि मल्टीटास्किंग वैशिष्ट्य असते. ज्यामुळे लिनक्स वापरले अतिशय चांगला अनुभव मिळतो.

लिनक्स ओपन सोर्स ओएस आहे. याचा प्रोग्रामरना खूप फायदा होतो, कारण ते स्वतः जशी पाहिजे तशी कस्टम ऑपरेटिंग सिस्टमची रचना करू शकतात.

जागतिक विकास समुदाय लिनक्सची सुरक्षितता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. त्यामुळे लिनक्स अत्यंत सुरक्षित आणि मजबूत ऑपरेटिंग सिस्टिम आहे. Google, Facebook अश्या मोठ्या कंपन्या त्यांच्या सर्व्हरच्या सुरक्षिततेसाठी लिनक्स सिस्टिम वापरतात.

जगभरातील अनेक भाषा लिनक्स सिस्टिमवर विकसित केलेली असते. त्यामुळे वापरकर्ता त्यांच्या आवडीनुसार भाषा निवडू शकतो.

लिनक्स वितरण माहिती (best linux operating system in marathi)

बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे निर्माण करून स्वतःचे वितरण बनवून विनामूल्य विकू शकतो. लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून लिनक्स वितरण निर्माण केले जाते.

काही प्रसिद्ध लिनक्स वितरणे पुढीलप्रमाणे आहेत.

युबुंटु लिनक्सडेबिअन लिनक्स
ओपनसुसे लिनक्स
रेडहॅट लिनक्ससेंटओएस लिनक्स
जेंटू लिनक्सपीसी लिनक्स ओएस
लिनक्स मिन्ट
बॉस ऑपरेटिंग सिस्टिमकाली लिनक्स
आर्च लिनक्सगरुडा लिनक्स

सारांश

या लेखातून आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम माहिती मराठी (linux operating system mahiti) सविस्तरपणे जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल, ते तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

हा लेख जरूर वाचाप्रॉक्सी सर्व्हर माहिती मराठी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

लिनक्सचे अधिकृत प्रतीक काय आहे ?

टक्स पेंग्विन हे लिनक्सचे अधिकृत प्रतीक आहे.

लिनक्सची प्रथम आवृत्ती कोणी विकसित केली ?

लिनक्सची प्रथम आवृत्ती लिनस टोरवाल्ड्स याने विकसित केली.

लिनक्स कशासाठी वापरतात ?

लिनक्स संगणकात आणि इलेक्ट्रिक उपकरणात ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून वापरतात.

Leave a Comment