एलएलबी फुल फॉर्म आणि माहिती

LLB full form in marathi – जर तुम्ही कायद्यात करिअर करण्याचा विचार करत असाल तर कदाचित तुम्ही “एलएलबी” हा शब्द ऐकला असेल. परंतु एलएलबी म्हणजे काय आणि या कोर्समध्ये नक्की कोणते विषय शिकविले जातात, याविषयी अधिकतर विद्यार्थ्यांना माहिती नसते.

यासाठी आम्ही या लेखात एलएलबी फुल फॉर्म आणि माहिती (LLB Full Form In Marathi) सविस्तरपणे समजाऊन सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एलएलबीला प्रवेश प्रक्रिया ते संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती मिळेल.

एलएलबी फुल फॉर्म आणि माहिती (LLB full form in marathi)

एलएलबीला लॅटिनमध्ये लेगम बॅक्लॉरियस असे म्हणतात. ज्याला इंग्रजीत बॅचलर ऑफ लॉ तर मराठी भाषेत कायद्याची पदवी असे म्हणतात. जसे, बीससी, बीकॉम, तसेच हे एलएलबी. भारतात वकील होण्याच्या प्रवासातील ही पहिली पायरी आहे.

भारतात कायद्याचा सराव करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एलएलबी पदवी ही मूलभूत पात्रता आहे. यात तुम्हाला कायदेशीर प्रणाली समजून घेण्यासाठी, कायद्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि विविध कायदेशीर बाबींमध्ये ग्राहकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये शिकविले जातात.

Related – विद्यार्थी करिअरची चुकीची निवड का करतात?

LLB कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

LLB full form in marathi

भारतात एलएलबी कोर्स करण्यासाठी, साधारणपणे मान्यताप्राप्त बोर्डातून तुमची 10+2 किंवा समकक्ष परीक्षा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. पण पात्रता निकष विद्यापीठांमध्ये भिन्न असू शकतात, म्हणून तुम्हाला ज्या विद्यालयात प्रवेश घ्यायचं आहे, तेथील पात्रता निकष तपासून घ्या.

भारतात विविध प्रकारचे एलएलबी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, यात प्रामुख्याने 3 वर्ष आणि 5 वर्षाचा इंटिग्रेटेड एलएलबी कोर्स आहे.

तीन वर्ष एलएलबी हा कोर्स कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी खुला आहे. यात कायद्याचा मूलभूत गोष्टीचा अभ्यास केला जातो.

पाच वर्षांचे इंटिग्रेटेड एलएलबी हा कोर्स 10+2 पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यात कायदेशीर शिक्षणा आणि पदवीपूर्व अभ्यास केला जातो.

एलएलबी कॉर्समध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश अभ्यास केला जातो.

  1. घटनात्मक कायदा
  2. करार कायदा
  3. गुन्हेगारी कायदा
  4. कौटुंबिक कायदा
  5. मालमत्ता कायदा
  6. पर्यावरण कायदा
  7. कायदेशीर लेखन आणि संशोधन

वरील एलएलबी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला खालील करिअर पर्याय उपलब्ध होतात.

  1. वकील
  2. कायदेशीर सल्लागार
  3. कॉर्पोरेट वकील
  4. सरकारी वकील
  5. कायदेशीर विश्लेषक

भारतात कायद्याचा सराव करण्यासाठी, तुम्हाला बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) मध्ये नोंदणी करणे आणि ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

बॅरिस्टर आणि वकील एकच असतो का?

वकील हा कायदेतज्ज्ञासारखा असतो. सल्ला देणे, कायदेशीर कागदपत्रे लिहिणे आणि गरज पडल्यास कोर्टात तुमचे प्रतिनिधित्व करणे यासारखी विविध कायदेशीर कामे तो करू शकतो.

बॅरिस्टर हा कोर्टात जावून कायदेशीर कारवाई लढविण्यात तज्ञ असतो. हा असा वकील असतो, जो न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करून कायदेशीर खटले निकाली लावतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर, एक वकील अनेक कायदेशीर नोकर्‍या करू शकतो, तर बॅरिस्टर हा कोर्टरूमच्या कामासाठी तज्ञ असतो. भारतात, बहुतेक कायदेशीर व्यावसायिक वकील आहेत जे सल्लागार आणि कोर्टरूम दोन्ही भूमिका व्यवस्थितपणे हाताळतात.

Related – पायलट बनण्यासाठी काय करावे ?

सारांश

LLB पदवी ही भारतातील कायदेशीर करिअरची पहिली पायरी आहे. या कोर्समध्ये कायदेशीर ज्ञानाचा व कौशल्यांचा अभ्यास केला जातो. ज्यामुळे कायदेशीर क्षेत्रातील अनेक संधींचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतात.

आशा करतो की, एलएलबी फुल फॉर्म आणि माहिती (LLB Full Form In Marathi) तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. जर LLB कॉर्सबद्दल तुमच्या मनात काही शंका असल्यास, तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये विचारू शकता.