रशिया लूना 25 चंद्रयान मोहीम अयशस्वी मराठी माहिती

Luna 25 Mission In Marathi – नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागील काही दिवसांपासून चंद्रयान मोहिमेबद्दल ऐकत असाल. या मोहिमेची सुरुवात 14 जुलै 2023 रोजी भारताने चंद्रयान 3 यानाचे प्रक्षेपण करून केली. यानंतर महिन्याभरात 11 ऑगस्ट रोजी बलाढ्य देश रशियाने त्यांचे लूना 25 अंतराळयान सोबत तब्बल 47 वर्षांनी ही चंद्रमोहीम राबवली होती.

रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉसने या मोहिमेची अधिकृत माहिती दिली आहे. रशियाचं लूना-25 हे यान 21 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं.

पण आता ही रशियाची चंद्रमोहिम अपयशी ठरल्याची मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचं लूना-25 यान चंद्रावर क्रॅश झाले असून त्यांची ही मोहीम अयशस्वी झाली आहे.

रशियाने तब्बल 47 वर्षानंतर ही चंद्रमोहिम हाती घेतली होती. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागून होते. पण आता ही मोहीम अयशस्वी झाल्याने रशियाला मोठा धक्का बसला आहे.

या लेखात आपण रशियाच्या लुना 25 चंद्रयान मोहिमेबद्दल (Luna 25 Mission In Marathi) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

लूना 25 चंद्रयान मोहीम माहिती मराठी (Luna 25 Mission In Marathi)

Luna 25 Mission In Marathi

10 ऑगस्ट 2023 रोजी लूना-25 हे यान रशियाने अंतराळात पाठवण्यात आलं. हे यान भारतीय यानापेक्षा अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेट असून त्याने चंद्राकडे जाण्याचा थेट मार्ग स्वीकारला होता. आपल्या भारताने हा मार्ग गोफण पद्धतीने स्वीकारला आहे.

लूना 25 यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे हे यान कमी वेळेत चंद्राच्या कक्षेत पोहचलं होतं.

21 ऑगस्ट 2023 रोजी लूना 25 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होतं. पण 19 ऑगस्ट रोजी यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या. यानंतर हा बिघाड दुरुस्त कऱण्याचा प्रयत्न सुरू होता. पण चांद्रयान मोहीम यशस्वी होण्याअगोदरच लूना 25 चंद्रावर क्रॅश झाले, आणि मोहीम यशस्वी होता होता राहिली.

अनियंत्रित कक्षेत फिरल्यामुळे रशियाचे लूना-25 अंतराळयान चंद्रावर कोसळल्याची बातमी रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉसने अधिकृतरित्या दिली आहे.

रोस्कोसमॉसने एका निवेदनात म्हटलं आहे की, लूना-25 नियोजित कक्षेत न जाता वेगळ्या अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. यामुळे लूना 25 चंद्रयान मोहीम (Luna 25 Mission In Marathi) मोहिम अयशस्वी ठरली आहे.

यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान 3 या मोहिमेकडे लागले आहे.

Related – चंद्रयान 3 मराठी माहिती

भारताच्या चांद्रयान-3 ने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी रॉकेटमधून उड्डाण केले होते. तर रशियाने भारतानंतर जवळपास महिन्याभरानंतर 11 ऑगस्ट रोजी सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन प्रक्षेपण केलं होतं.

रशिया आणि भारत दोन्ही देश दोन दिवसांच्या अंतराने चंद्रावर उतरणार होते. आता रशियाचं लूना-25 क्रॅश झाल्यानंतर जगाचं लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागलं आहे. चंद्रयान 3 हे यान 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.

चंद्रयान 3 आणि लूना 25 यातील फरक (Chandrayaan 3 Vs Luna 25 In Marathi)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान 3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता श्रीहरिकोटा येथून केले आहे. आतापर्यंत झालेले हे यान नियोनबध्द दिशेने प्रवास करत आहे. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता भारतीय यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे.

आता भारतीय यान अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांत चंद्रयान मोहीम यशस्वी होताना दिसत आहे. जर असे झाले तर भारत हा जगातील पहिला देश असेल ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे यान उतरविले आहे.

सारांश

तर मित्रांनो, जगभरात प्रतीक्षेत असलेल्या लूना 25 हे यान आणि भारतीय यान दोन दिवसाच्या फरकाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते.

पण आता हाती आलेल्या बातमीनुसार लूना 25 यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून रशियाची चंद्रमोहीम अर्धवट राहिली. परिणामी आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान 3 यानाकडे लागले आहे.

चंद्रयान 3 हे अंतराळयान 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. सर्व सुखरूप झाले तर भारत जगातील पहिला देश ठरेल, जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरला आहे.

Leave a Comment