Machindranath History In Marathi – मित्रांनो, हिंदू धर्मात अनेक संप्रदाय आहेत, यातीलच एक म्हणजे नाथ संप्रदाय. हा पंथ संपूर्ण भारतात पसरलेला असून भगवान शिव हे या पंथाचे आराध्यदेव आहेत. या पंथाची स्थापना मच्छिंद्रनाथ यांपासून झाली आहे.
मच्छिंद्रनाथ यांना नाथ संप्रदायातील पहिला आचार्य व योगी म्हणून ओळखले जातात. तसेच यांना मत्स्येंद्रनाथ देखील म्हणतात, कारण यांची निर्मिती माश्यापासून झाली अशी मान्यता आहे.
या लेखात आपण नवनाथ पंथातील पहिला योगी श्री मत्स्येंद्रनाथ यांच्याविषयी माहिती (Machindranath Information In Marathi) जाणून घेणार आहोत.
संबंधित लेख – महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय माहिती
श्री मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा माहिती (Machindranath Information In Marathi)

मित्रांनो, मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला ? याविषयी एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. ही कथा पुढीलप्रमाणे आहे.
एके दिवशी शिवपार्वती कैलासावर असताना, पार्वती देवी शंकरांना म्हणाल्या की प्रभू आपण मला अनुग्रह द्यावा. पार्वतीची विनंती शंकरांनी मान्य केली. हा अनुग्रह देण्यासाठी एक शांत स्थान हवे होते, यासाठी शिवपार्वती यमुना नदीच्या काठावर आले.
यमुना काठी अतिशय शांतता होती. येथे शंकरांनी पार्वती देवीला अनुग्रह देण्यास आरंभ केला. नदीत असणाऱ्या पाण्यामध्ये एक मासळी होती, हिच्या पोटी कविनारायण गर्भस्वरूपात होते. या मासळीने गर्भातुनच महादेवांचा संवाद ऐकला. त्यामुळे तिला शुद्धज्ञान प्राप्त होऊन ते ब्रह्म स्वरूप झाले.
उपदेश संपल्यावर महादेव देवीस म्हणाले, हे पार्वती आजच्या उपदेशातील सार काय आहे ते मला सांग पाहू. यानंतर सर्व ब्रह्मस्वरूप आहे हे शब्द शिवपार्वतीस ऐकू आले. पण हे शब्द देवीने बोलले नव्हते.
मग शंकरांनी नदीकडे पाहिले असता, त्यांना नदीत असलेल्या मासळीला समजले की कविनारायण ह्या मासळीच्या पोटी गर्भस्वरूप आहे.
हे पाहून शंकर मासळीला म्हणाले “कविनारायणा तु अवतार घेतल्यावर बद्रिकाश्रमाला ये” तेव्हा मी तुला दर्शन देईन सोबतच आजचा उपदेश दत्तात्रेय अवतारातुन तुला ऐकवीन. असे बोलून शिवपार्वती कैलासाला निघून गेले.
पुढे त्या मासळीने अंडी घातली. त्यापैकी एका अंड्याला बगळ्याने आपल्या चोचीने फोडले. तेव्हा त्यातून एक बालक निघाला. अशा प्रकारे कविनारायण अवतार स्वरुपी प्रकट झाले .
त्याचवेळी तेथे कामिक नावाचा कोळी मासेमारी करण्यासाठी आला होता. हे बाळ त्या कोळ्यास दिसले, या बाळाला कोळ्याने हात लावताच एक आकाशवाणी झाली की, हे बाळ कविनारायणाचा अवतार आहे. तु याला घरी घेऊन जा व याचा चांगला सांभाळ करावे.
या कथेनुसार माश्याच्या पोटी कवीनारायण यांचा जन्म झाला. याचेच नाव मच्छिंद्र ठेवण्यात आले. पुढे पाच वर्षाचे झाल्यावर दत्त महाराजांनी मच्छिंद्रनाथांना मंत्रोपदेश करून पूर्ण ज्ञानी बनविले. त्यानंतर दत्तांनी नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी मच्छिंद्रनाथास सुरुवात करण्यास सांगितले.
संबंधित लेख – अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज माहिती
मच्छिंद्रनाथ यांच्याविषयी माहिती मराठी (Machindranath History In Marathi)
महादेव आणि दत्तात्रेय यांनी स्थापन केलेल्या नाथ सांप्रदायाची जबाबदारी मच्छिंद्रनाथांवर सोपवून श्री शंकर व दत्तात्रेय निघून गेले. गुरूंच्या कृपाशीर्वादाने मच्छिंद्रनाथाने नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी तीर्थयात्राची सुरवात केली.
मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करताना ते प्रथम सप्तशृंगीला गेले आणि तेथे त्यांनी तपश्चर्या करून अंबा भवानीला प्रसन्न करून घेतले. येथेच त्यांनी शाबरी विद्या प्राप्त करून आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला.
पुढे मच्छिंद्रनाथ बंगाल राज्यांतील चंद्रगिरी गावी पोहोचले. तेथे ते भिक्षा मागत असताना एका घरी गेले. या घरी सरस्वती ही सर्वोदयपालची बायको होती. हिला मूलबाळ नसल्याने तिने आपले दुःख मच्छिंद्रनाथासमोर मांडले.
यावर मच्छिंद्रनाथांने तिच्या हातावर भस्म ठेऊन म्हणाले, या भस्माचे सेवन केल्याने तुझ्या उदरी हरिनारायण जन्म घेतील. मी पुन्हा आल्यावर त्याला गुरुमंत्र देईन. असे सांगून मच्छिंद्रनाथ पुढील यात्रेला निघून गेले.
यानंतर नवनाथांनी म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरिनाथ, रेवणनाथ, वटसिद्ध नागनाथ, चरपटीनाथ यांनी मिळून नाथ परंपरेचे कार्य सुरूच ठेवले.
संबंधित लेख – नरसोबाची वाडी माहिती मराठी
सारांश
हिंदु धर्मातील नाथ परंपरेचे पाईक म्हणून ओळखले जाणारे मच्छिंद्रनाथ, हे एक विलक्षण व प्रभावी असा योगी आहे. नाथ पंथातील प्रत्येक नाथांनी मानवतेच्या उद्धाराचा मार्ग विश्वाला प्रदान केला.
मी आशा करतो, की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मच्छिंद्रनाथ यांच्याविषयी माहिती मराठी (Machindranath History In Marathi) तुम्हाला आवडली असल्यास, तुमच्या मित्रांनाही शेअर करा.