Mahaparinirvan Din In Marathi – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झाले होते, त्यानंतर 7 डिसेंबर 1956 म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्यांचे मुंबई येथील चैत्यभुमीवर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार केले गेले.
तेव्हापासून भीमरावांचे अनुयायी दरवर्षी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. ही चैत्यभूमी मुंबई शहरातील दादर या ठिकाणी आहे.
या लेखात आपण परमपूज्य महापरिनिर्वाण दिन माहिती (Mahaparinirvan Din In Marathi) घेणार आहोत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
mahaparinirvan din quotes in marathi
डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती (Dr. B.R Ambedkar Information In Marathi)

संपुर्ण नाव | डॉ. भीमराव रामजी आंबेडकर |
जन्मस्थळ | 14 एप्रिल 1981 महू, मध्य प्रदेश भारत |
मृत्यू | 06 डिसेंबर 1956 नवी दिल्ली, भारत |
आईचे नाव | भीमाबाई सपकाळ |
वडीलांचे नाव | रामजी सपकाळ |
पत्नीचे नाव | 1. रमाबाई आंबेडकर 2. सविता आंबेडकर |
अपत्ये | यशवंत आंबेडकर |
राजकीय पक्ष | भारतीय रिपब्लिकन पक्ष |
1. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावात झाला.
2. भारतीय अर्थव्यवस्था, न्याय आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी विशेष योगदान दिले.
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि थोर तत्त्वज्ञ होते.
4. त्यांनी दलित समाजाला नवी प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, त्याचबरोबर महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
5. भीमराव ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक म्हणून ओळखले जाते.
6. भारत देशाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे डॉ. आंबेडकरांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असे संबोधले जाते.
7. भारत देशासह जगभरात भीमरावांचा जन्मदिवस म्हणून आंबेडकर जयंती साजरी केली जाते.
8. इसवी सन 2012 रोजी द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात भीमरावांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड केली आहे.
9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ जगभरात अनेक स्मारके आणि स्तूप बांधली आहेत.
10. 6 डिसेंबर 1956 या दिवशी पहाटे 12.15 वाजता दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन झाले.
11. यावेळी आंबेडकर वय वर्ष 64 आणि 7 महिन्याचे होते.
12. एकविसाव्या शतकातील युगप्रवर्तक म्हणून आंबेडकरांना ओळखले जाते.
13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास हा खूप उल्लेखनीय आहे.
14. नरेंद्र जाधव म्हणतात की, “महात्मा गांधी हे ‘भारताचे राष्ट्रपिता’ होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता’ होते!
15. भीमराव आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार झाला.
16. महाराष्ट्र राज्यात आंबेडकरांचा जन्मदिवस हा “ज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो.
17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.
18. भीमराव दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.
19. भीमराव आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
20. आंबेडकरांमुळे भारतीय जातीव्यवस्थामध्ये अमुलाग्र बदल घडून आला.
21. अस्पृश्यांची उन्नतीकडे वाटचाल सुरू झाली.
22. आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, कृषी या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली.
23. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून आंबेडकरी विचार आपल्या मनात रुजवला पाहिजे.
महापरिनिर्वाण दिवस माहिती मराठी (Mahaparinirvan Din In Marathi)

24. महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे. याचा शब्दशः अर्थ ‘मृत्यूनंतरचे निर्वाण’ असा होतो.
25. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही.
26. जगात भीमराव जबरदस्त नेता म्हणून ओळखले जातात.
27. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिवशी त्यांचे असंख्य अनुयायी आणि इतर भारतीय नेते चैत्यभूमीला भेट देतात आणि बाबांना श्रद्धांजली अर्पण करतात.
28. भारतातून लाखोंच्या संखेने जनसमूदाय मुंबई या ठिकाणी चैत्यभूमीवर बाबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर पासून येत असतात.
29. जगात सर्वात जास्त अनुयायी असणारा हा पहिला नेता आहे.
30. भारत देशातील 14 विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.
31. बाबासाहेब आंबेडकर यांना चालते फिरते विद्यापीठ म्हंटले जाते.
32. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार भीमराव यांनी पटवून दिला.
33. शिक्षणाने माणूस स्वतःची आणि समजाची कशी प्रगती करू शकतो, हे प्रत्यक्ष बाबांनी जगाला दाखवून दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी (Mahaparinirvan Din In Marathi)
34. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिवशी मुबई मध्ये दादर येथे चैत्यभूमीवर भारतासह इतर लाखोंच्या संख्येने लोक येतात.
35. चैत्यभूमी स्तूपात असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात आणि त्यांचे दर्शन घेतात.
35. या दिवशी प्रत्येक जनाला चैत्यभुमीवर येता येत नाही अश्या वेळेस ते घरामध्येच बाबांची प्रतिमा आणि मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात.
36. प्रत्येक स्थानिक बौध्द विहार, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये अश्या प्रकारे घराघरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रध्दांजली अर्पण करतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर आणि दुसऱ्या पत्नीचे नाव सविता आंबेडकर होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म इंदोर मधील महू या गावात झाला. या गावाला सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे
1. Administration and Finance of the East India Company
2. The Evolution of Provincial Finance in British India
3. The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution
4. Annihilation of Caste
5. Which Way to Emancipation?
6. Federation versus Freedom
7. Pakistan or the Partition of India
8. Rande, Gandhi and Jinaah
9. Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables
10. What Congress and Gandhi Have Done to the Untouchables
11. Communal Deadlock and a Way to Solve It
12. Who Were the Shudras?
13. A Critique of The Proposals of Cabinet Mission for Indian Constitutional changes in so far as they affect the Scheduled Castes (Untouchable)
14. The Cabinet Mission and the Untouchables
15. States and Minorities
16. Maharashtra as a Linguistic Province
17. The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables
18. Thoughts on Linguistic States: A Critique of the Report of the States Reorganization Commission
19. The Buddha and His Dhamma
20. Riddles in Hinduism
21. Dictionary of the Pali Language (Pali-English)
22. The Pali Grammar
23. Waiting for a Visa(Autobiography)
24. A People at Bay
25. Untouchables or the Children of India’s Ghetto
26. Can I be a Hindu
27. What the Brahmins Have Done to the Hindus
28. Essays of Bhagwat Gita
29. India and Communism
30. Revolution and Counter-revolution in Ancient India
31. Buddha and Karl Marx
32. Constitution and Constitutionalism
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण ?
बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरूंची नावे त्यांनी पुस्तकातून, विचारातून सांगितली आहेत. बाबासाहेबांचे ते गुरु म्हणजे सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले.
हे देखील वाचा
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी (Mahaparinirvan Din In Marathi) जाणून घेतली. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.