Maharashtra din information in marathi – भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक नवीन राज्य निर्माण झाले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून एक मे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यामागे बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्र दिनी सर्व सरकारी कार्यालय बंद असतात. शाळा, महाविद्यालये बंद असतात. महाराष्ट्र दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
या लेखात आपण महाराष्ट्र दिन माहिती मराठी (maharashtra din information in marathi) जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र दिनाचा इतिहास आणि मुंबईसाठी होणारा वाद याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्य माहिती मराठी (maharashtra din information in marathi)

राज्य | महाराष्ट्र |
क्षेत्रफळ | 307,713 किमी2 (भारतात तिसरा) |
निर्मिती | 1 मे 1960 |
राजधानी | मुंबई |
उपराजधानी | नागपूर |
अधिकृत भाषा | मराठी |
जिल्हे | 36 |
तालुके | 358 |
साक्षरता दर | 82.34% (2011 नुसार) |
राज्य खेळ | कबड्डी |
राज्यफूल | ताम्हण किंवा जारुळ |
राज्यपक्षी | हरियल |
राज्य गीत | जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ धृ.॥ जय जय महाराष्ट्र माझा … ॥ |
महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वांत समृध्द राज्य (india’s richest state) म्हणून ओळखले जाते. भारत सरकारच्या तिजोरीत जीएसटीच्या स्वरूपात इतर राज्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात महाराष्ट्र राज्य कर जमा करते. भारताच्या प्राप्तिकरापैकी 40 टक्के प्राप्तिकर (income tax) फक्त महाराष्ट्र राज्य भरते.
देशातील सर्वात मोठ्या सरकारी (government) आणि खासगी (private) बँकांचे कार्यालये मुंबईत स्थित आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक (industrial) आणि तंत्रज्ञान (technology) क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अव्वल आहे.
शेतीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात भारतात सर्वाधिक फळे, भाज्या, कापूस, तेलबिया आणि डाळीचे उत्पादन करतो. गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याची आहे.
हा लेख जरूर वाचा – कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी (kolhapur famous for in marathi)
महाराष्ट्रातील वीज जाळे (electricity network) 36,644 मेगावॅट इतकी आहे, हे जाळे भारतातील सर्वात मोठे वीजजाळे म्हणून ओळखले जाते. भारताची पहिली विद्युतीकृत रेल्वे (India’s first electric railway) मुंबई ते कुर्ला यादरम्यान धावली.
भारतातील पहिली सूतगिरणी (India’s first spinning Mills), पहिला अणुप्रकल्प, पहिले पोस्ट ऑफिस (India’s first post office), अशिया खंडातील पहिले स्टॉक एक्सचेंज (asia’s first stock exchange) महाराष्ट्र राज्यात आहे.
भारतातील सर्वात जास्त उद्योगपती महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी आहेत. मोठ्या मोठ्या उद्योगसमूहांची ऑफिस आणि कंपन्या महाराष्ट्र राज्यात स्थित आहेत.
उत्तर प्रदेशचे पहिले (First Chief Minister of UP) मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे एक मराठी होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती (india’s first president lady) प्रतिभाताई पाटील यादेखील महाराष्ट्रीयन आहे. तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (india’s first doctor lady) आनंदीबाई जोशी या महाराष्ट्र राज्यातील आहे.
हा लेख जरूर वाचा – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी माहिती (Anandibai Joshi Information in Marathi)
भारतील पहिला चित्रपट (india’s first film) हा एका मराठी माणसाने बनविला आहे. भारताची राज्यघटना लिहिणारे (indian constitution creator) बाबासाहेब आंबेडकर असोत की हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे (Founder of Hindavi Swarajya) छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राने जगाला दिलेले मोलाचे रत्न आहेत.
अनेक समाजसुधारक आणि नेते मंडळी या महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे.
हा लेख जरूर वाचा – महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे (maharashtra division in marathi)
महाराष्ट्र राज्य निर्मिती इतिहास माहिती मराठी (maharashtra din history information in marathi)
महाराष्ट्र राज्य निर्मिती इतिहास माहिती (maharashtra din information in marathi) – 15 ऑगस्ट 1949 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. यानंतर बहुतांश प्रांतीय राज्य मुंबई प्रांतामध्ये विलीन झाले. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्यामुळे ते मुंबईसह स्वतंत्र राज्य घोषित करण्याची मागणी करू लागले.
म्हणजेच गुजराती भाषेत बोलणारे लोकांना वेगळे राज्य हवे होते तर मराठी भाषिकांना वेगळे राज्य निर्माण करायचे होते. यासाठी देशामध्ये अनेक आंदोलनं घडून आले.
21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण बनले, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यासाठी नकार दिला होता. यामुळे मराठी माणसे चिडली होती. याचा निषेध प्रत्येक सभेमध्ये व्यक्त करण्यात येत होता. यानंतर मोठ्या संख्येने एक मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोर चौकात भरविण्यात आला.
या मोर्चाला उधळून लावण्यासाठी पोलीस लाठीचार्ज करत होते. पण आंदोलन करणारे ठाम असल्याने पोलिसांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाही. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला. या गोळीबारात 106 आंदोलन करणारे मृत्युमुखी पडले.
हा लेख जरूर वाचा – फ्लोरा फाउंटनच्या परिसरात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांची नावे
इसवी सन 1960 मध्ये गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात चळवळ सुरू झाली. याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसह संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.
21 नोव्हेंबर 1956 या गोळीबारात हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे मुंबई राज्याच्या सरकारने माघार घेऊन 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. पुढे पाच वर्षांनी फ्लोरा फाउंटनच्या (flora fountain) परिसरात हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
अश्या प्रकारे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र राज्य म्हणून स्थापित झाले. मराठी भाषिक लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजराती भाषिक लोकांसाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली.
याआधी महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे एकच राज्य म्हणून ओळखले जात होते. 1 मे 1960 नंतर महाराष्ट्र राज्य स्वतंत्र राज्य म्हणून ओळखला जाऊ लागले.
यानंतर कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तर तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. तसेच मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले.
मुंबईवरून महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात झालेला वाद (maharashtra and gujarat separation information in marathi)
महाराष्ट्र आणि गुजरात (maharashtra and gujrat) या दोन राज्यात मुंबईवरून वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्यातील लोकांना मुंबई हा महाराष्ट्राचा भाग म्हणून पाहिजे होता, कारण तेथील बरेच लोक मराठी बोलत होते. ते मुंबईच्या प्रगतीत गुजराती लोकांचा जास्त हात आहे, असे गुजराती लोक म्हणाले. त्यामुळे तो त्यांच्या राज्याचा भाग असावा असं त्यांना वाटत होत.
अखेर शेवटी मुंबई हे महाराष्ट्र राज्याचा भाग आहे म्हणून घोषित करण्यात आले.
हा लेख जरूर वाचा – गोवा मुक्ती दिवस माहिती मराठी (goa liberation day information in marathi)
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र दिन माहिती मराठी (maharashtra din information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र दिन माहिती मराठी (maharashtra din information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या रोजी झाली.
महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी कोणते राज्य अस्तित्वात होते?
महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी बॉम्बे (मुंबई) राज्य अस्तित्वात होते.
मुंबई राज्यात किती जिल्हे होते ?
मुंबई राज्यात एकूण 28 जिल्हे होते, ते पुढीलप्रमाणे
1.अमरेली
2. बनासकांठा
3. मेहसाना
4. अहमदाबाद
5. साबरकांठा
6. खेडा
7. पंच महल
8. बडोदा
9. भरूच
10. सुरत
11. डांग
12. पश्चिम खानदेश
13. पूर्व खानदेश
14. नाशिक
15. ठाणा
16. बृहद्मुंबई
17. कुलाबा
18. रत्नागिरी
19. पुणे
20. अहमदनगर
21. सोलापूर
22. उत्तर सातारा
23. दक्षिण सातारा
24. कोल्हापूर
25. विजापूर
26. बेळगाव
27. धारवाड
28. उत्तर कन्नडा
मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
मुंबई राज्यात एकूण तीन मुख्यमंत्री झाले.
मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधरराव खेर होते. तर दुसरे मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि तिसरे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.
कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात ?
एक मे आपल्या राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात.
महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत ?
महाराष्ट्र विधानसभेत 78 सदस्य आहेत.
महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे?
महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे होते त्यानंतर नवीन जिल्ह्याची निर्मिती होऊन आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे.
महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत ?
महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत.
महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे ?
महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 11,23,72,972 इतकी आहे.