महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे व माहिती मराठी

Maharashtra division in marathi – महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे होते त्यानंतर नवीन जिल्ह्याची निर्मिती होऊन आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागणी ही भौगोलिक, ऐतिहासिक आणि राजकीय बाबी लक्षात घेऊन करण्यात आली आहे.

या लेखात आपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे व माहिती (maharashtra division in marathi) तसेच प्रशासकीय विभाग याबद्दल माहिती घेणार आहे.

महाराष्ट्रातील प्रदेश माहिती (maharashtra division in marathi)

महाराष्ट्र नकाशा
महाराष्ट्र नकाशा (maharashtra division map in marathi)
राज्यमहाराष्ट्र
स्थापन1 मे 1960
राजधानीमुंबई
उपराजधानीनागपूर
क्षेत्रफळ3,07,713 चौ.किमी
लोकसंख्या12.47 लाख (2021)
स्थानिक भाषामराठी
महाराष्ट्र जिल्हे आणि तालुके36 जिल्हे आणि 358 तालुके
साक्षरता दर82.3%
लिंग गुणोत्तर1000 : 929
माझा महाराष्ट्र माहिती मराठी

महाराष्ट्र राज्याची विभागणी एकूण पाच प्रादेशिक विभागात केली आहे.

  1. विदर्भ
  2. मराठवाडा
  3. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र
  4. कोकण
  5. पश्चिम महाराष्ट्र

वरील पाच प्रादेशिक विभागांमध्ये महाराष्ट्रातील जिल्हे आहेत.

विदर्भ (अमरावती विभाग)

अमरावती विभागाचे मुख्यालय हे अमरावती शहर असून सर्वात मोठे शहर आहे. या विभागात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश होतो.

विदर्भ (नागपूर विभाग)

नागपूर विभागाचे मुख्यालय नागपूर शहर असून या जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर देखील आहे. या विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो.

मराठवाडा

मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद शहर असून या विभागात सर्वात मोठे शहर औरंगाबाद आहे. या विभागात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश होतो.

खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र

खानदेश विभागाचे प्रमुख मुख्यालय नाशिक शहर आहे. तसेच सर्वात मोठे शहर देखील नाशिक शहर आहे. खानदेश या विभागात अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो.

कोकण

कोकण विभागाचे मुख्यालय मुंबई शहर आहे. मुंबई शहर कोकण विभागातील सर्वात मोठे शहर असून भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. कोकण विभागात प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र म्हणून पुणे विभागाला ओळखले जाते. या विभागाचे मुख्यालय पुणे जिल्हा आहे. या विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे (maharashtra division in marathi)

maharashtra division in marathi
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे (maharashtra division in marathi)
अहमदनगरनागपूर
अकोलानांदेड
अमरावतीनंदुरबार
औरंगाबादनाशिक
बीडउस्मानाबाद
भंडारापरभणी
बुलढाणापुणे
चंद्रपूररायगड
धुळेरत्नागिरी
गडचिरोलीसांगली
गोंदियासातारा
हिंगोलीसिंधुदुर्ग
जळगावसोलापूर
जालनाठाणे
कोल्हापूरवर्धा
लातूरवाशिम
मुंबई उपनगरयवतमाळ
मुंबई शहरपालघर
महाराष्ट्रातील 36 जिल्हे यादी 2022

महाराष्ट्रातील काही वैशिष्ट्य माहिती मराठी (maharashtra facts in marathi)

1. महाराष्ट्र राज्य भारत देशातील सर्वात धनवान आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते.

2. महाराष्ट्र राज्य भारत देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य आहे.

3. मुंबई शहर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे.

4. सुरवातीच्या काळात महाराष्ट्राला बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि बॉम्बे स्टेट या नावाने ओळखले जायचे.

5. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची सुमारे 1,646 मीटर आहे.

6. महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.

7. गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.

8. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी चार ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत.

9. त्र्यंबकेश्वर मंदिराची सुरुवात बालाजी बाजीराव यांनी केली होती.

10. महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या रूपामध्ये ओळखले जाते. सम्राट अशोकाच्या काळात याला राष्ट्रीय आणि त्यानंतर महानराष्ट्र या रुपात ओळखले जायचे.

11. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो.

12. भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

13. महाराष्ट्र राज्यात कोळसा, लोह, मॅगनीज, बॉक्साईट, नैसर्गिक गॅस हे खनिजे अधिक प्रमाणात आढळतात.

14. दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी, होळी व गणेशोत्सव हे सण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरे करतात.

15. जागतिक वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळ लेणी महाराष्ट्र राज्यात आहे.

16. भारतातील पहिला चित्रपट महाराष्ट्रात बनवला गेला होता.

17. दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा भारतातील पहिला चित्रपट बनवला होता.

18. महाराष्ट्र भारतातील एकमेव राज्य आहे, जेथे दोन मेट्रो शहरे आहेत पहिले मुंबई आणि दुसरे पुणे शहर.

19. महाराष्ट्रात नवापूर म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे, ज्याचा अर्धाभाग महाराष्ट्रामध्ये आणि अर्धाभाग गुजरातमध्ये आहे.

20. राज्याचा साक्षरता दर 82.3% आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदासंघ आहेत. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदरसंघ आहेत. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.

स्थानिक भाषा मराठी
साक्षरता दर82.3 %
विधानसभा मतदासंघ288
लोकसभा मतदरसंघ48
महाराष्ट्राचे पहिले गव्हर्नरRaja Sir Maharaj Singh, CIE
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीमा. यशवंतराव चव्हाण
सध्याचे महाराष्ट्र सरकार मा. उध्दव ठाकरे (शिवसेना)
महाराष्ट्राचे राष्ट्रीय खेळकबड्डी
महाराष्ट्राचे राष्ट्रीय लोकनृत्यलावणी
महाराष्ट्राचा राज्यपक्षीहरियाल (पिवळ्या पायाची हरोळी)
महाराष्ट्राचा राज्यप्राणीशेकरु
महाराष्ट्राचा राष्ट्रीयवृक्षआंबा
आर्थिक राजधानीमुंबई
सांस्कृतिक राजधानीमुंबई
माझा महाराष्ट्र माहिती मराठी

22. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे कोणत्याही घराला दरवाजे नाहीत.

23. महाराष्ट्रातील लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे.

24. भारतामध्ये पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे या ठिकाणी चालली होती.

25. राज्यात जवळजवळ 16 टक्के क्षेत्र वनक्षेत्र आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा आहे.

26. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.

25. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 कि.मी. किनारपट्टी लाभली आहे.

26. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत गाडगेबाबा असे महान संत लाभले आहेत, त्यामुळेच महाराष्ट्र राज्य संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.

27. अभिनेते, राजकारणी आणि खेळाडू महाराष्ट्रातून तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू महाराष्ट्रातले आहेत.

28. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच मातीतले आहेत.

29. महाराष्ट्रातील विविध स्थळांचा – नदी, पर्वत, स्थळ इ. रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो.

30. रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग धंदे आहेत.

31. आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये ही महाराष्ट्रातील महत्वाची पिके आहेत. शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड वखू ही महाराष्ट्रातील महत्वाची नगदी पिके आहेत.

32. भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई हे आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेअर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.

33. कोळसानिर्मिती व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

34. महाराष्ट्र इतिहास एक गौरवशाली इतिहास म्हणुन ओळखला जातो.

महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार पाच मोठे जिल्हे माहिती (largest district of maharashtra by area)

जिल्हाक्षेत्रफळ
अहमदनगर17,048 किलोमीटर
पुणे15,643 किलोमीटर
नाशिक15,530 किलोमीटर
सोलापूर14,895 किलोमीटर
गडचिरोली14,412 किलोमीटर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार पाच मोठे जिल्हे

महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार लहान जिल्हे माहिती (smallest district in maharashtra by area)

जिल्हाक्षेत्रफळ
मुंबई शहर157 किलोमीटर
मुंबई उपनगर446 किलोमीटर
भंडारा3,895 किलोमीटर
हिंगोली4,524 किलोमीटर
नंदुरबार5,034 किलोमीटर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार लहान जिल्हे

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra information in marathi) जाणून घेतली. महाराष्ट्र राज्य माहिती मराठी (Maharashtra rajya mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

यातून आपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे व माहिती (maharashtra division in marathi), प्रशासकीय विभाग याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत -maharashtrat kiti jilhe ahet ?

महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे होते त्यानंतर नवीन जिल्ह्याची निर्मिती होऊन आता 2021 मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे.

भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे – bhartatil sarvat lamb nadi ?

भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे.

पुणे विद्यापीठ – पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली ?

पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1948 रोजी झाली.

वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे ? – vi va shirwadkar nickname

वि वा शिरवाडकर यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आणि टोपण नाव ‘कुसुमाग्रज’ आहे.

कळसुबाई शिखराची उंची किती आहे ?

Heights of kalsubai shikhar – कळसुबाई शिखराची उंची 1,646 मीटर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची नावे

1. गोदावरी नदी
2. भीमा नदी
3. कृष्णा नदी
4. पूर्णा नदी
5. नर्मदा नदी
6. तापी नदी
7. उल्हास नदी

औरंगाबादमधील ज्योतिर्लिंग मंदिराचे नाव काय आहे ?

aurangabad jyotirlinga temple name – औरंगाबादमधील ज्योतिर्लिंग मंदिराचे नाव घृष्णेश्वर मंदिर (महादेव ज्योतिर्लिंग मंदिर) आहे.

रांजणगावच्या गणपतीचे नाव काय आहे ?

महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात.

पुढील वाचन :