maharashtra geet lyrics in marathi – जय जय महाराष्ट्र माझा कविता इयत्ता सातवी मध्ये आपण सर्वांनीच अभ्यासली आहे. ही कविता एक स्फूर्ती गीत म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्र राज्याचे वर्णन करत असताना कवी राजा बढे यांनी या काव्याची रचना केली आहे. ही कविता राजा बढे यांच्या कविता संग्रहातून घेतली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. राजा बढे यांनी अनेक कवितासंग्रह, नाटके आणि चित्रपटाची निर्मिती केली.
जय जय महाराष्ट्र माझा (maharashtra geet lyrics in marathi)

गीत | जय जय महाराष्ट्र माझा (jay jay Maharashtra maza) |
कवी | राजा बढे |
संगीत | श्रीनिवास खळे |
गायक | शाहीर साबळे |
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजाजय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥
या कविता तुम्हाला वाचायला आवडेल
- बाबा वर कविता (vadil marathi kavita)
- भारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी
- बापावर कविता (Maze baba poem in marathi)
- कुसुमाग्रज प्रेम कविता (kavi kusumagraj prem kavita in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण आहे ?
जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी राजा बढे हे आहेत.
राजा बढे यांचे टोपणनाव काय आहे ?
कोंडिबा हे राजा बढे यांचे टोपणनाव आहे.