आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी विजेत्यांची यादी

By | April 16, 2023

Maharashtra Kesari Winners List – नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कुस्ती हा खेळ पूर्वीपासून खेळला जाणारा एक प्रसिद्ध असा मर्दानी खेळ आहे. या खेळात अनेक डावपेच आणि स्पर्धा असतात. महाराष्ट्र केसरी ही राज्य स्तरीय घेतली जाणारी कुस्तीची स्पर्धा आहे.

भारतीय उपखंडात शूर माणसाला सिंहाची उपमा देतात. म्हणून तर ही स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानास महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार देतात. ही स्पर्धा जिंकण्यासाठी पैलवानाचा डाव, चपळता, निर्णयक्षमता खूप महत्वाची असते.

भारत स्वातंत्र्य झाल्यावर पहिली महाराष्ट्र चँपियन स्पर्धा 1953 साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत चालत आलेल्या कुस्ती स्पर्धेत अनेक पैलवानानी स्पर्धा जिंकत कुस्तीच्या मैदानात ठसा उमटविला आहे.

या लेखातून आपण इसवी सन 1961 पासून ते आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेत्यांची यादी (Maharashtra Kesari Winners List) पाहणार आहोत.

संबंधित लेखमैदानी खेळ खेळण्याचे फायदे माहिती

Table of Contents

महाराष्ट्र केसरी या स्पर्धेविषयी माहिती (Maharashtra Kesari Information In Marathi)

मामासाहेब मोहोळ यांनी इसवी सन 1961 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संस्थेचे स्थापना केली. या संस्थेअंतर्गत 1961 पासून महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च अशी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरीचे आयोजन केले जाते.

ही स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानास दीड किलो चांदीची गदा आणि 51 हजार रुपये रोख रक्कम दिली जाते. असे असले तरी स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानास बक्षीस स्वरूपात अजूनही बरेच काही देण्यात येते.

जसे की यावर्षी झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला रोख 5 लाखांचे बक्षीस, थार गाडी आणि उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

संबंधित लेखआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती माहिती

इसवी सन 1961 पासून आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेत्यांची यादी (Maharashtra Kesari Winners List)

Maharashtra Kesari Winners List
महाराष्ट्र केसरीचे नाव व जिल्हास्पर्धा जिंकलेले वर्ष
पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद)1961
पैलवान भगवान मोरे (धुळे)1962
साताऱ्यात स्पर्धा रद्द झाली1963
पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती)1964
पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक)1965
पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई)1966
पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव)1967
पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर)1968
पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर)1969
पैलवान दादू चौगुले (पुणे)1970
पैलवान दादू चौगुले (अलिबाग)1971
पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर)1972
पैलवान लक्ष्मण वडार (अकोला)1973
पैलवान युवराज पाटील (ठाणे)1974
पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर)1975
पैलवान हिरामण बनकर (अकलूज)1976
चाळीसगाव येथील स्पर्धा अनिर्णयित राहिली1977
पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई)1978
पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक)1979
पैलवान इस्माईल शेख (खोपोली)1980
पैलवान बापू लोखंडे (नागपूर)1981
पैलवान संभाजी पाटील (बीड)1982
पैलवान सरदार खुशहाल (पुणे)1983
पैलवान नामदेव मोळे (सांगली)1984
पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड)1985
पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर)1986
पैलवान तानाजी बनकर (नागपूर)1987
पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर)1988
वर्धा येथे स्पर्धा अनीर्णयीत राहिली1989
कोल्हापूर येथे स्पर्धा अनीर्णयीत राहिली1990
अमरावती येथे स्पर्धा अनीर्णयीत राहिली1991
पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर)1992
पैलवान उदयराज जाधव (पुणे)1993
पैलवान संजय पाटील (अकोला)1994
पैलवान शिवाजी केकाण (नाशिक)1995
पैलवान अशोक शिर्के (वर्धा)1996
पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर)1997
पैलवान धनाजी फडतरे (पुणे)1998
पैलवान विनोद चौगुले (खामगाव)1999
पैलवान राहुल काळभोर (नांदेड)2000
पैलवान राहुल काळभोर (नांदेड)2001
पैलवान मुन्नालाल शेख (जालना)2002
पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ)2003
पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी)2004
पैलवान सईद चाउस (इंदापूर)2005
पैलवान अमोल बुचडे (बारामती)2006
पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद)2007
पैलवान चंद्रहार पाटील (सांगली)2008
पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड)2009
पैलवान समाधान घोडके (रोहा)2010
पैलवान नरसिंग यादव (अकलूज)2011
पैलवान नरसिंग यादव (गोंदिया)2012
पैलवान नरसिंग यादव (भोसरी)2013
पैलवान विजय चौधरी (अहमदनगर)2014
पैलवान विजय चौधरी (नागपूर)2015
पैलवान विजय चौधरी (वारजे)2016
पैलवान अभिजीत कटके (भूगाव)2017
पैलवान बाला रफीक शेख (जालना)2018
पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी)2019
पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा)2020
कोरोना महामारीमुळे स्पर्धा झाल्या नाहीत2021
कोरोना महामारीमुळे स्पर्धा झाल्या नाहीत2022
पैलवान शिवराज राक्षे2023
महाराष्ट्र केसरी विजेत्यांची यादी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पहिला महाराष्ट्र केसरी कोण आहे ?

छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जिंकलेले पैलवान दिनकर दहय़ारी हे पहिले महाराष्ट्र केसरी आहे.

ट्रिपल महाराष्ट्र केसरी कोण आहेत ?

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी हे आहेत. यांनी 2014, 2015 आणि 2016 साली झालेल्या स्पर्धेत लढत जिंकली होती. सध्या ते पोलिस खात्यात कार्यरत आहेत.

सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल कोण आहे ?

सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल म्हणून नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांना ओळखले जाते.
नरसिंग यादव यांनी 2011 ते 2013 पर्यंत तर विजय चौधरी यांनी 2014 ते 2016 पर्यंत सलग महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकले आहेत.

सारांश

आशा करतो की, तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *