महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi)

Maharashtra major university information in marathi – महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वांत समृध्द राज्य म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असणारे पुणे महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ आहेत. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठांपैकी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे हे महाराष्ट्रात असून या विद्यापीठात सहा लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

महाराष्ट्रात अखिल भारतीय उच्चशिक्षण पाहणी 2018-19 च्या अहवालानुसार राज्यात 62 विद्यापीठ आहेत. यापैकी 34 राज्य विद्यापीठे, 21 अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय विद्यापीठ आणि सहा राष्ट्रहिताच्या संस्था आहेत.

या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi)

maharashtra major university information in marathi
विषय महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
प्रकार शैक्षणिक
सर्वात पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ (18 जुलै 1857)
एकूण विद्यापीठ62 (अखिल भारतीय उच्चशिक्षण पाहणी 2018-19 च्या अहवालानुसार)
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi)

महाराष्ट्र राज्यातील मुंबई विद्यापीठ (Mumbai University) हे पहिले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सर जॉन विल्सन (sir John Wilson) होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय किंवा महाराष्ट्रीयन कुलगुरू म्हणून न्या. काशिनाथ त्रिंबक (Kashinath Trimbak Telang) यांनी कारभार पाहिला.

मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 रोजी मुंबई या ठिकाणी सुरू केले. हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील (india’s oldest university) एक आहे. मुंबई विद्यापीठाचे ब्रीदवाक्य शीलवृतफला विद्या हे आहे, याचा मराठीत अर्थ विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.

इसवी सन 1996 पर्यंत बॉंम्बे विद्यापीठ (University of Bombay) म्हणून ओळखले जात होते. 1996 साली बॉंम्बे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले. त्यांनतर 4 सप्टेंबर 1996 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.

हा लेख जरूर वाचासंविधानाची उद्देशिका म्हणजे काय (constitution of india in marathi)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) याची स्थापना 4 ऑगस्ट 1993 साली नागपूर शहरात झाली. या विद्यापीठाचे कुलगुरू सर बिपिनकृष्ण बोस (bipin Krishna bose) हे होते आणि सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे कुलपती होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पहिले विद्यापीठ आहे. एका स्वतंत्र विभागाद्वारे महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारलेला अभासक्रम सुरू करण्याचे श्रेयही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठास जाते.

मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी तसेच संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University) स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी झाली. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद रामराव जयकर (mukund ramrao jayakar) हे होते.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (smt. nathibai damodar thackersey women’s university) हे महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठांपैकी चौथे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1916 मध्ये मुंबईमध्ये झाली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ (india’s first women’s university) आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे माहिती मराठी (maharashtra major university information in marathi)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (babasaheb ambedkar university aurangabad) स्थापना 23 ऑगस्ट 1958 साली औरंगाबाद या ठिकाणी झाली होती. मराठवाडा विभागातील (Marathwada university) हे सर्वात प्रमुख विद्यापीठ आहे.

शिवाजी विद्यापीठ (shivaji university kolhapur) हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 1962 साली झाली. शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीठांपैकी (Maharashtra’s oldest university) एक आहे.

कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ (sant gadge baba university) हे अमरावती विभागमधील (amravati division) महत्वाचे विद्यापीठ असून या विद्यापीठाची स्थापना 1 मे 1988 रोजी झाली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (yashwantrao chavan open university) आहे. या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी (kusumagraj) धरला होता. त्यामुळे या विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. याची स्थापना 1 जुलै 1989 रोजी नाशिक शहरात झाली. या विद्यापीठाचे गीत कुसमाग्रज यांनी लिहिले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी (bahinabai chaudhari university) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. याची स्थापना जळगाव जिल्ह्यात 15 ऑगस्ट 1990 या दिवशी झाली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (swami ramanand teerth marathwada university) हे महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ आहे. याची सुरुवात 17 सप्टेंबर 1994 रोजी नांदेड जिल्ह्यात झाली.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune) हे पुणे जिल्ह्यातील महत्वाचे विद्यापीठ असून याची स्थापना इसवी सन 1921 रोजी झाली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (punyashlok ahilyadevi holkar university solapur) हे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख विद्यापीठ असून याची सुरुवात 1 ऑगस्ट 2004 साली सोलापूर जिल्ह्यात झाली.

गोंडवाना विद्यापीठ (gondwana university) गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या विद्यापीठ आहे या विद्यापीठाची स्थापना 27 सप्टेंबर 2011 या दिवशी झाली.

महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठे (maharashtra agriculture university list in marathi)

विद्यापीठाचे नावस्थानस्थापना
महात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरी, अहमदनगर29 मार्च 1968
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला20 ऑक्टोबर 1969
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठदापोली (रत्नागिरी)18 मे 1972
डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी18 मे 1972
महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठे (maharashtra agriculture university list in marathi)

maharashtra agriculture university list in marathi – महाराष्ट्र राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ (mahatma phule agricultural university rahuri) महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 29 मार्च 1968 रोजी झाली.

त्यानंतर अकोला या ठिकाणी असलेले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (panjabrao deshmukh agricultural university akola) 20 ऑक्टोबर 1969 रोजी स्थापन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी 18 मे 1972 साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची (dr. balasaheb sawant agricultural university) स्थापना करण्यात आली.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्र दिन माहिती मराठी (maharashtra din information in marathi)

डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (vasanth rao naik marathwada krishi vidyapeeth) हे परभणीमधील महत्त्वाचे कृषी विद्यापीठ असून याची स्थापना 18 मे 1972 रोजी झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची (Vasanth Rao Naik Agricultural University) स्थापना एकच दिवशी झाली.

विद्यापीठाचे नाव स्थळस्थापना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठलोणेरे (रायगड)इसवी सन 1989
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठरामटेक (नागपूर)18 सप्टेंबर 1997
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठनागपूर3 डिसेंबर 2000
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठनाशिक3 जून 1998
श्री. शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठपुणे (बालेवाडी)इसवी सन 1996
अरविंद मुक्त कृषि विद्यापीठ नागपूरइसवी सन 2013
महाराष्ट्रातील इतर विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (dr. B.R ambedkar university lonar) रायगड जिल्ह्यातील लोणेरे या ठिकाणी इसवी सन 1989 साली स्थापन झाले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (kalidas sanskrit university nagpur) हे नागपूरमधील महत्वाचे विद्यापीठ आहे. याची सुरुवात 18 सप्टेंबर 1997 रोजी नागपूर येथील रामटेक या ठिकाणी झाली.

महाराष्ट्र राज्यातील पहिले आणि भारतातील तिसरे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra Animal & Fishery Sciences University) 3 डिसेंबर 2000 या दिवशी नागपूर मध्ये स्थापन झाले.

3 जून 1998 या रोजी नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची (maharashtra arogya university nashik) स्थापना करण्यात आली.

इसवी सन 1996 मध्ये पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी श्री. शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठाची (shivchatrapati university balewadi) स्थापना करण्यात आली.

इसवी सन 2013 साली अरविंद मुक्त कृषि विद्यापीठ हे भारत देशातील पहिले कृषी विद्यापीठ नागपूर (arvind agriculture open university nagpur) या ठिकाणी सुरू करण्यात आले.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठे (maharashtra law University list in marathi)

महाराष्ट्र मध्ये तीन कायदा विद्यापीठ (law University) आहेत. त्यातील पहिले राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई या ठिकाणी आहे. नागपूर या ठिकाणी दुसरे तर औरंगाबाद याठिकाणी तिसरे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे.

हा लेख जरूर वाचाकलम 328 माहिती मराठी (IPC 328 in marathi)

सारांश

विद्यापीठाचे नावठिकाणस्थापना
मुंबई विद्यापीठमुंबई18 जुलै 1857
संत तुकडोजी महाराज विद्यापीठनागपूर4 ऑगस्ट 1923
सावित्रीबाई फुले विद्यापीठपुणे10 फेब्रुवारी 1949
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठमुंबईइसवी सन 1916
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, मराठवाडा औरंगाबाद23 ऑगस्ट 1958
शिवाजी विद्यापीठकोल्हापूर18 नोव्हेंबर 1962
कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठअमरावती1 मे 1983
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनाशिक1 जुलै 1989
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठजळगाव15 ऑगस्ट 1990
टिळक महाराष्ट्र विद्यापीठपुणेइसवी सन 1921
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरसोलापूर1 ऑगस्ट 2004
गोंडवाना विद्यापीठगडचिरोली27 सप्टेंबर 2011
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनांदेड17 सप्टेंबर 1994
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi)

आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi) माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ किती आहेत ?

महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत.

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे ?

मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. याची स्थापना 18 जुलै 1857 रोजी झाली.

महाराष्ट्रातील विद्यापीठाचे कुलपती कोण असतात ?

भारतामध्ये कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यातील सगळ्या राज्य विद्यापीठांचा आसनाधिष्ठीत कुलपती असतो.

राज्याच्या विद्यापीठातील कुलपती म्हणून कोण निर्णय घेत असतो ?

राज्याच्या विद्यापीठातील कुलपती म्हणून राज्याचे राज्यपाल निर्णय घेत असतो.

राज्य विद्यापीठ म्हणजे काय ?

राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठास राज्य विद्यापीठ म्हणतात.

केंद्रीय विद्यापीठ म्हणजे काय ?

शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठास केंद्रीय विद्यापीठ म्हणतात.

अभिमत विद्यापीठ म्हणजे काय ?

पुर्वी एखाद्या विदयापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयास विदयापीठाचा दर्जा दिल्यास त्या विदयापीठास अभिमत विदयापीठ असे म्हणतात.

महाराष्ट्रातील नियोजित विद्यापीठे कोणते आहेत ?

महाराष्ट्रातील नियोजित विद्यापीठे पुढीलप्रमाणे आहेत.
1. जैवतंत्रज्ञान विद्यापीठ (नागपूर)
2. अवकाश विज्ञान विद्यापीठ (मुंबई)
3. मेरिटाइम विद्यापीठ (रत्नागिरी)

नॅक म्हणजे काय ?

naac accreditation meaning in marathi – नॅक म्हणजे देशातील सर्व विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयाची शैक्षणिक मूल्यांकन करणारी संस्था आहे. नॅकचा मराठी फुल्ल फॉर्म (naac full form in marathi) राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद असा आहे. या संस्थेची स्थापना इसवी सन 1994 साली झाली. याचे मुख्यालय बेंगळूरू मध्ये आहे.

Leave a Comment