महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती (maharashtra police information in marathi)

maharashtra police information in marathi – भारतात पोलीस प्रशासनाची सुरुवात इसवी सन 1861 मध्ये झाली. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात केली गेली.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस हे प्रशासन काम करते. महाराष्ट्र पोलीस हे भारतातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 13 पोलीस आयुक्तालये आणि 36 जिल्हा पोलीसदलांचा समावेश होतो. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती (maharashtra police information in marathi) जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्र दिन माहिती मराठी (maharashtra din information in marathi)

महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती (maharashtra police information in marathi)

maharashtra police information in marathi
विषय महाराष्ट्र पोलिस दल
प्रकार राज्यसरकारचा कर्मचारी
स्थापना2 जानेवारी 1961
कर्तव्यकायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच मालमत्तेचे रक्षण करणे
सर्वोच्च पदपोलिस महासंचालक (Director general of police)
घोषवाक्यसद्रक्षणाय खलनिग्रहणाय (सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी)
संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

2 जानेवारी 1961 या दिवशी महाराष्ट्र राज्यात पोलिस दलाची स्थापना झाली. याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलिस दलास ध्वज प्रदान केला. त्यामुळे दरवषी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

भारतीय दंडविधान संहिता, भारतीय पुराव्याचा कायदा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे कायदे पोलीस यंत्रणेस मदत करतात. गाव पातळीवर पोलीस यंत्रणेला मदत करण्यासाठी पोलीस पाटील असतात. तसेच पोलीस यंत्रणेस मदत करण्यासाठी होमगार्ड देखील असतात.

इसवी सन 1955 मध्ये भारतात सर्वप्रथम मुंबई राज्यात स्त्री पोलिसाची नेमणूक करण्यात आली.

पोलीस खात्यातील पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद असते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आहे. ते आहेत म्हणून आपण सर्व जण सुरक्षित आहोत.

पोलिस अधीक्षक आणि त्यावरील अधिकारी हे भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात. यांची निवड संघ लोकसेवा आयोग यांच्याद्वारे करण्यात येते आणि नेमणूक राज्य सरकार करते.

पोलीस उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात येते. या दोन्हींची राज्य शासनाकडून नेमणूक केली जाते.

पोलीस उपनिरीक्षकाची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. तर पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक पोलीस मुख्यालयाकडून करण्यात येते.

नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये पोलीस उपनिरीक्षक पोलीस, पोलिस उपअधिक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त या पदांसाठी प्रशिक्षण देण्यात येते. खंडाळा, नाशिक, मुंबई, अकोला, नागपूर, जालना, तासगाव या ठिकाणी पोलिस शिपायांसाठी प्रशिक्षण देण्यात येते. मसुरी आणि हैद्राबाद येथे भारतीय पोलिस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.

महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशा मोठ्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हा भारतीय सेवेतील उच्च अधिकारी पोलिस आयुक्तालयाचा प्रमुख असतो.

महाराष्ट्र राज्यात एकूण बारा पोलीस आयुक्तालय आहेत. ती पुढीप्रमाणे.

  • बृहन्मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
  • औरंगाबाद
  • सोलापूर
  • अमरावती
  • मुंबई रेल्वे
  • पिंपरी चिंचवड

ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक हा अधिकारी असतो. महाराष्ट्र राज्यात ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आणि पोलीस ग्रामीण परिक्षेत्र आहे.

6 मार्च 1948 रोजी महाराष्ट्र राज्यातील राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. राखीव पोलीस दलाच्या प्रमुखाला समादेशक असे म्हणतात. होमगार्ड या संघटनेची स्थापना इसवी सन 1946 साली करण्यात आली. होमगार्डच्या प्रमुखास महासमादेशक असे म्हणतात.

कारागृह महानिरीक्षक हा वरिष्ठ अधिकारी राज्यातील तुरुंग प्रशासनाचा प्रमुख असतो. तर जिल्हा पातळीवर तुरुंग अधीक्षक हा तुरुंगाचा प्रमुख असतो.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi)

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती (maharashtra police information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती (maharashtra police information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पोलीस म्हणजे काय ?

पोलीस हे राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तयार करण्यात आलेले पद आहे.

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस केव्हा साजरा करतात ?

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी 1961 रोजी साजरा करतात.

गृहरक्षक दलाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

गृहरक्षक दलाची स्थापना इसवी सन 1946 साली करण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्र किती आहेत ?

महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्र आठ आहेत. ते पुढीलप्रमाणे….
1. ठाणे
2. नाशिक
3. अमरावती
4. औरंगाबाद
5. नागपूर
6. नांदेड
7. कोल्हापूर
8. गडचिरोली

4 thoughts on “महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती (maharashtra police information in marathi)”

Leave a Comment