महाराष्ट्र राज्यातील आरटीओ क्रमांकाची नवीन यादी

Maharashtra RTO District Number List In Marathi – नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आरटीओ विषयी थोडक्यात माहिती असेलच, RTO ही भारतातील एक प्रशासकीय संस्था असून या संस्थेद्वारे राज्यातील रस्ते वाहतूक आणि रहदारीचे नियमन केले जाते. राज्यातील प्रत्येक शहरातील रस्त्यावरची रहदारी आणि सुरक्षिततेचे धोरण निश्चित करण्यासाठी आरटीओ महत्वाची संस्था आहे.

या संस्थेद्वारे राज्यातील प्रत्येक वाहन नोंदणी करणे, ड्रायव्हिंग लायसन्स देणे, परमिट जारी करणे, कर गोळा करणे आणि नियम व नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम आरटीओमार्फत केले जाते.

जेव्हा आपण नवीन वाहन खरेदी करतो, तेव्हा त्या वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक असते. आरटीओ ही नोंदणी करून त्या वाहनाला एक विशिष्ट क्रमांक देतो. यालाच आपण गाडी नंबर असे म्हणतो.

या नंबरवरून गाडी कोणत्या राज्यातील व शहरातील आहे, हे प्रमाण ठरते. या लेखातून आपण महाराष्ट्र राज्यातील आरटीओ क्रमांकाची यादी (Maharashtra RTO District Number List In Marathi) जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील आरटीओ क्रमांक माहिती (Maharashtra RTO District Number List In Marathi)

Maharashtra RTO District Number List In Marathi
विषयमहाराष्ट्रातील आरटीओ क्रमांकाची यादी
प्रकारपरिवहन विभाग
कार्य वाहन नोंदणी करून त्या वाहनास एक विशिष्ट क्रमांक देणे
नियंत्रणराज्य सरकार
आयएसओ संक्षिप्त नावIN-MH

मित्रांनो, आरटीओचा मराठी फुल फॉर्म (RTO Full Form in Marathi) प्रादेशिक परिवहन कार्यालय (Regional Transport Office) असा आहे.

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. या प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. या कार्यालयातून प्रादेशिक वाहनाची नोंदणी करून तिला क्रमांक दिला जातो.

महाराष्ट्र राज्याचे आयएसओ संक्षिप्त नाव IN-MH असे आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. थोडक्यात, महाराष्ट्रातील गाड्यांचे एकूण MH 56 पर्यंत क्रमांक आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्र राज्यातील आरटीओ क्रमांकाची यादी MH 01 ते MH 28 (Maharashtra RTO District Number List In Marathi)

महाराष्ट्र आरटीओ क्रमांकशहर
MH 01दक्षिण मुंबई
MH 02पश्चिम मुंबई
MH 03 पूर्व मुंबई
MH 04 ठाणे
MH 05 कल्याण
MH 06 रायगड
MH 07 सिंधुदुर्ग
MH 08 रत्नागिरी
MH 09 कोल्हापूर
MH 10 सांगली
MH 11 सातारा
MH 12 पुणे
MH 13 सोलापूर
MH 14 पिंपरी चिंचवड
MH 15 नाशिक
MH 16 अहमदनगर
MH 17 श्रीरामपूर
MH 18 धुळे
MH 19 जळगाव
MH 20 संभाजीनगर
MH 21 जालना
MH 22 परभणी
MH 23 बीड
MH 24 लातूर
MH 25 उस्मानाबाद
MH 26 नांदेड
MH 27 अमरावती
MH 28 बुलढाणा

महाराष्ट्र राज्यातील आरटीओ क्रमांकाची यादी MH 29 ते MH 56 (Maharashtra RTO District Number List In Marathi)

महाराष्ट्र आरटीओ क्रमांकशहर
MH 29 यवतमाळ
MH 30 अकोला
MH 31 नागपूर शहर
MH 32 वर्धा
MH 33 गडचिरोली
MH 34 चंद्रपूर
MH 35 गोंदिया
MH 36 भंडारा
MH 37 वाशिम
MH 38 हिंगोली
MH 39 नंदुरबार
MH 40 नागपूर
MH 41 मालेगाव
MH 42 बारामती
MH 43 नवी मुंबई (वाशी)
MH 44 अंबेजोगाई (जिल्हा बीड)
MH 45 अकलूज (जिल्हा सोलापूर)
MH 46 पनवेल (जिल्हा रायगड)
MH 47 बोरिवली
MH 48 वसई विरार
MH 49 नागपूर पूर्व
MH 50 कराड (जिल्हा सातारा)
MH 51 नाशिक ग्रामीण
MH 52 परभणी ग्रामीण
MH 53 पुणे दक्षिण
MH 54 पुणे उत्तर
MH 55 मुंबई मध्य
MH 56ठाणे ग्रामीण

सारांश

मित्रांनो, आशा करतो की, महाराष्ट्र राज्यातील आरटीओ क्रमांकाची यादी (Maharashtra RTO District Number List In Marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. धन्यवाद.

संबंधित लेख

  1. महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती
  2. रहिवासी दाखला कसा काढावा ?
  3. पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा ?

Leave a Comment