महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती (maharashtra tourist places in marathi)

maharashtra tourist places in marathi – महाराष्ट्र राज्य देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, नैसर्गिक सुंदरता असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर राज्याचा पर्यटन विकास व्हावा, या हेतूने सरकारने 1975 साली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले. राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा, हा यामागील उद्देश होता.

भारत देशातील 12 ज्योति्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात आहे. देवीची साडेतीन शक्तिपीठे, अष्टविनायक, प्राचीन लेणी व गुफा मंदिर, थंड हवेचे ठिकाण तसेच गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक किल्ले, वस्तू संग्रहालय, तीर्थक्षेत्र आणि प्रमुख मंदिरे महाराष्ट्र राज्यात आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य जगातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

या लेखातून आपण महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती मराठी (maharashtra tourist places in marathi) जाणून घेणार आहोत.

Table of Contents

महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती (maharashtra tourist places in marathi)

maharashtra tourist places in marathi
विषय महाराष्ट्र पर्यटन स्थळांची माहिती
प्रकारमहाराष्ट्र पाहाण्यासारखी ठिकाणे

आपल्या राज्यात ऐतिहासिक, धार्मिक, संग्रहालय, नैसर्गिक सुंदरता अशी बरीच ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच राज्यात मुंबई या ठिकाणी हिंदी आणि मराठी या राष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती होते. यामुळे मुंबई हे सिनेमा सृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळतो. रांगणा किल्ला हा मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराजांनी 350 हून अधिक किल्ले जिंकून घेतले आहेत.

महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे (Tourist places in Maharashtra)

महाराष्ट्र ज्योतिर्लिंग दर्शन स्थळे माहिती (jyotirlinga in maharashtra mahiti marathi)

jyotirlinga in maharashtra mahiti marathi
ज्योतिर्लिंगजिल्हा
घृष्णेश्वर औरंगाबाद
परळी वैजनाथ बीड
भीमाशंकरपुणे
औंढा नागनाथ हिंगोली
त्र्यंबकेश्वरनाशिक
maharashtra tourist places in marathi

प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा, चेतना या सर्व अवस्थेसाठी ज्योती हा शब्द वापरला आहे. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग! हे ज्योतिर्लिंग भारतात एकूण बारा आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्र राज्यात पाच आहेत.

महाराष्ट्रातील अष्टविनायक पर्यटन स्थळे (ashtavinayak ganpati names and places in marathi)

गणपतीचे नावस्थळ
चिंतामणीथेऊर (पुणे)
श्री महागणपतीरांजणगाव (पुणे)
मयुरेश्वर मोरगाव (पुणे)
श्री विघ्नेशवर ओझर (पुणे)
गिरिजात्मक लेण्याद्री (पुणे)
श्री विनायक महाड (रायगड)
बल्लाळेश्वरपाली (रायगड)
सिद्धिविनायकसिद्धटेक (अहमदनगर)
अष्टविनायक नावे व ठिकाण

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. याला गणपतीची आठ तीर्थे म्हणतात आणि आठ मंदिरांपैकी 6 मंदिरे पुणे जिल्ह्यात आणि 2 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहेत. कोणतीही पूजा सुरू होण्यापूर्वी आपण पहिला गणपतीची पूजा करतो. हिंदू धर्मातील प्रत्येकाला भगवान गणेश आवडतात कारण तो सर्व समस्यांपासून आपल्या भक्तांचे रक्षण करतो.

मयुरेश्वर गणपती आणि मोरेश्वर गणपती एकच ठिकाण आहे. लेण्याद्री डोंगरात 30 बुध्दकालीन लेण्या आहेत. त्यापैकी सात क्रमांकाची लेणी म्हणजेच गिरिजात्मक गणपती आहे.

हा लेख जरूर वाचाअष्टविनायक गणपतीची नावे व माहिती (ashtavinayak ganpati names and places in marathi)

महाराष्ट्र राज्यातील शक्तिपीठे पर्यटन स्थळे (maharashtra shakti peeth in marathi)

शक्तिपीठेठिकाण
महालक्ष्मी (अंबाबाई) कोल्हापूर
रेणुकामातामाहूर (नांदेड)
तुळजाभवानीतुळजापूर (उस्मानाबाद)
सप्तशृंगी (अर्धपीठ)वणी (नाशिक)
maharashtra tourist places in marathi

शक्तिपीठ म्हणजे हिंदू धर्मांच्या देवीचे स्थान. पुराणामध्ये शक्तिपीठ आता ज्या ठिकाणी आहेत तिथे काहीतरी फार महत्वाचे प्रसंग घडले आहेत.

त्यानंतर त्यादेवीचे स्थान म्हणून त्या त्या ठिकाणी देवीची मंदिरे उभारण्यात आली. पण याचे अनन्यसाधारण महत्व असल्यामुळेच याला ‘शक्तिपीठ’ असे म्हटले जाते. भारत देशात एकूण 51 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे तीन शक्तीपीठ महाराष्ट्र राज्यात आहेत.

महाराष्ट्रातील लेण्यांची माहिती (प्राचीन लेणी आणि गुफा मंदिरे पर्यटन स्थळे)

Maharashtra leni information in marathi
लेणीजिल्हा
अजिंठाऔरंगाबाद
वेरुळ औरंगाबाद
पितळखोराऔरंगाबाद
कार्ला (मळवली)पुणे
बेडसा (कामशेत)पुणे
भाजे (मळवली)पुणे
घारापुरीरायगड
गोमाशी रायगड
आगाशीव सातारा
खरोसालातूर
खिद्रापूरकोल्हापूर
पांडवलेणीनाशिक
maharashtra tourist places in marathi

भारतातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा ही आहे. ही लेणी इसवी सन दुसऱ्या शतकातील आहे. भाजे लेणी हा एकूण 12 लेण्यांचा समूह आहे. आगाशीव लेणी हा 66 लेण्यांचा समूह आहे. खिद्रापूर या ठिकाणचे कोपेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या लेण्यांचा शोध 28 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ याच्यामुळे लागला. या लेण्या वाघूर नदीच्या परिसरात आहेत. इसवी सन पूर्व दुसरे ते चौथे शतक या काळात कोरलेल्या या 22 बुद्ध लेणी आहेत. या लेण्यांचा जागतिक वारसा यादीत 1983 साली समावेश झाला.

वेरुळ लेणी कोणाच्या सातवाहन,वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात खोदली गेली. वेरूळ लेणी खुलताबाद तालुक्यात आहे. इसवी सन पाच ते दहाव्या शतकात वेरुळ लेणीची निर्मिती झाली आहे. वेरुळ या ठिकाणी 34 लेण्यांचा समूह आहे. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा दिला आहे.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे (Tourist places in Maharashtra)

महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण (maharashtra hill station information)

maharashtra hill station information
ठिकाणउंची (मी)
महाबळेश्वर (सातारा)1438
पाचगणी (सातारा)1293
चिखलदरा (अमरावती)1188
तोरणमाळ (नंदुरबार)1150
म्हैसमाळ (औरंगाबाद)1067
भंडारदरा (अकोला)740
आंबोली (सिंधुदुर्ग)690
माथेरान (रायगड)800
खंडाळा (पुणे)550
पन्हाळा (कोल्हापूर) 754
लोणावळा (पुणे)624
maharashtra tourist places in marathi

चिखलदरा या ठिकाणी किचक याचा वध भीमाने येथे केला होता, म्हणून या ठिकाणाला किचकधरा या नावाने ओळखले जाते. चिखलदरा हे राज्यातील थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात सातपुड्याच्या गाविलगड रांगात येते.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती मराठी (chikhaldara hill station Maharashtra information in marathi)

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. याला भारताचे मिनी काश्मीर तर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. या व्यतिरिक्त पालघर तालुक्यातील जव्हार, ठाण्यातील मोखाडा व सूर्यमाळ, उस्मानाबाद येथील येडशी, बुलढाण्यातील अंबाबरवा व भिंगारा ही महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहेत.

महाराष्ट्र गरम पाण्याचे झरे पाहण्यासारखी ठिकाणे (hot water springs in maharashtra)

hot water springs in maharashtra
गरम पाण्याचे झरेजिल्हा
वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी ठाणे
उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव, अडावद, चांगदेवजळगाव
उनकेश्वरनांदेड
दापोली, राजापूर, संगमेश्वररत्नागिरी
इंदेवधुळे
साव (महाड), उन्हेरे (पाली)रायगड
उनपदेव, अनवदेवनंदुरबार
सातिवली, कोकणेर पालघर
कापेश्वर यवतमाळ
सालबर्डीअमरावती
महाराष्ट्र गरम पाण्याचे झरे पाहण्यासारखी ठिकाणे (hot water springs in maharashtra)

गरम पाण्याचा झरा म्हणजे जिथून गरम भूजल जमिनीवर नियमित वाहते. या गरम पाण्याचे तापमान 30 अंश ते 70 अंश सेल्सिअसपर्यंत असते. असो, हा वेगळा मुद्दा. महाराष्ट्र राज्यात एकूण दहा गरम पाण्याचे झरे आहेत.

हा लेख जरूर वाचापाण्याचे विविध स्रोत आणि गुणधर्म मराठी माहिती (water information in marathi)

महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक किल्ले (list of forts in maharashtra for tourism)

list of forts in maharashtra for tourism

किल्ला हा अरबी शब्द आहे, मराठीत यासाठी दुर्ग हा शब्द वापरला जातो. पूर्वीच्या काळी परकीय आक्रमणे आणि राज्यविस्तार करण्यासाठी केव्हाही युद्ध होत असायचे. राजे आपले साम्राज्याचे संरक्षण करण्यासाठी योजना बनवत. यातूनच किल्ला एक अशी वास्तू आहे, ज्यामधे आक्रमण करताना सहज शिरकाव करता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना अनेक किल्ले आणि प्रदेश जिंकून आपल्या ताब्यात घेतले. कारण किल्ले ताब्यात असेल की, त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर सहज लक्ष देता येते. हे महाराजांना माहीत होते.

साधारणपणे 160 किल्ले महाराजांच्या नावावर आहेत, तर 350 हून अधिक किल्ले महाराजांनी जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केले. महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले पाहायला मिळतात. ते पुढीलप्रमाणे…

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले (thane district fort list in marathi) – हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली, घोडबंदर, भैरवगड, भंडारगड, डोंगरी आणि सुधागड हे किल्ले ठाणे पाहण्यासारखी किल्ले आहेत.

पालघर जिल्हा पाहाण्यासारखी (किल्ले) ठिकाणे (fort in palghar district in marathi) – अर्नाळा, वसईचा भुईकोट, कळवा, असावा, शिरगाव, बल्लाळगड, भगवानगड, दातीवरे, मनोर, टकमक इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले (list of fort near pune in marathi) – पुरंदर, तोरणा, शिवनेरी, राजगड, सिंहगड, राजमाची इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

नाशिक जिल्ह्यातील किल्ले (nashik all fort list in marathi) – साल्हेर, मुल्हेर, अंकाई टंकाई, अलंग कुलंग, घोडप, चांदवड, विश्रामगड, ब्रह्मगिरी, बितनगड, पट्टा, औंढा, आड, घनगड, हरिहरगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

रायगड जिल्ह्यातील सर्व किल्ले (raigad all fort list in marathi) – रायगड, कर्नाळा, लिंगाणा, खांदेरी, उंदेरी, सुधागड, सरसगड, सुरगड, मुरुड-जंजिरा, रेवदंडा, अलिबाग आणि कोरलाई इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व किल्ले (ratnagiri district fort list) – रत्नागिरी, जयगड, विजयगड, सुवर्णदुर्ग, पासगड, कनकदुर्ग, फतेहगड, पूर्णगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

सातारा जिल्ह्यातील सर्व किल्ले (satara district fort list in marathi) – प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, मकरंदगड, वसंतगड, वैराटगड, वासोटा, मधुमकरंदगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ले (kolhapur fort name in marathi) – पन्हाळा, विशालगड, भुदरगड, रांगणा, महिपाळगड, समानगड आणि पारगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

औरंगाबाद जिल्हा देवगिरी हा किल्ला आहे. या किल्ल्यास दौलताबादचा किल्ला (daulatabad fort) देखील म्हटले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व किल्ले (ahmednagar fort list in marathi) – अहमदनगरचा किल्ला म्हणजे भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, बहादूरगड, रतनगड, मांजरसुबा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

बुलढाणा या जिल्ह्यात राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहे. या ठिकाणी सिंदखेड राजा हा प्रमुख किल्ला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग किल्ला हा प्रमुख किल्ला आहे. अकोला जिल्ह्यात नरनाळा, बाळापूर, असदगड हे प्रमुख किल्ले आहेत.

हरिश्चंद्रगड हा किल्ला ठाणे, पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे. या किल्ल्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचाहरिश्चंद्रगड माहिती मराठी (harishchandragad trek information in marathi)

महाराष्ट्र राज्यातील वस्तुसंग्रहालय (maharashtra museum in marathi)

maharashtra museum in marathi
जिल्हावस्तुसंग्रहालय
पुणे 1. आगाखान पॅलेस
2. राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय
3. गणेश संग्रहालय
4. बलेड्स ऑफ गलोरी क्रिकेट मुझियम
अहमदनगर1. आलमगीर संग्रहालय
2. कॅवलरी टँक म्युझियम
औरंगाबाद 1. सोनेरी महाल
2. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
कोल्हापूर1. चंद्रकांत मांडरे कलादालन
2. सिद्धगिरी म्युझियम
3. टाऊन हॉल संग्रहालय
मुंबई 1. नॅशनल मेरिटाईम म्युझियम
2. डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम
सातारा1. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
2. श्री भवानी संग्रहालय
उस्मानाबादरामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय
नाशिकनाणे संग्रहालय
नागपूरमध्यवर्ती संग्रहालय
maharashtra museum in marathi

महाराष्ट्र तीर्थक्षेत्र – प्रेक्षणीय मंदिरे आणि ठिकाण (Popular Religious Spots in Maharashtra in marathi)

प्रमुख मंदिर जिल्हा
एकविरा मंदिर, कार्ले पुणे
धूतपापेश्वर मंदिर रत्नागिरी
गोंदेश्वर मंदिरनाशिक
खंडोबा मंदिरऔरंगाबाद
भगवान पुरुषोत्तम मंदिरबीड
आनंदेश्वर मंदिरअमरावती
शिवमंदिरगडचिरोली
Popular Religious Spots in Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील संत तुकाराम महाराज याचे देहू तर ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ, वाशिम मध्ये असणारे संत सेवालाल महाराज यांचे समाधी स्थळ, मंगळवेढा मध्ये असणारे बसवेश्वरांचे स्मारक हेही तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

पंढरपूरचा विठोबा-रखुमाई, नाशिकची सप्तशृंगी देवी, पुण्यातली खंडोबाची जेजुरी आणि शिर्डीचे साईबाबा हे खूप प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत.

सारांश

या लेखातून आपण महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती (maharashtra tourist places in marathi) जाणून घेतली आहे. यात आपण देवीची साडेतीन शक्तिपीठे, अष्टविनायक, प्राचीन लेणी व गुफा मंदिर, थंड हवेचे ठिकाण तसेच गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक किल्ले, वस्तू संग्रहालय, तीर्थक्षेत्र आणि प्रमुख मंदिरे याविषयी माहिती जाणून घेतली आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

महाराष्ट्र ज्योतिर्लिंग किती आहेत ?

महाराष्ट्र पाच ज्योतिर्लिंग आहेत. ते पुढीलप्रमाणे..
1. घृष्णेश्वर
2. परळी वैजनाथ
3. भीमाशंकर
4. औंढा नागनाथ
5. त्र्यंबकेश्वर

महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती नावे सांगा.

अष्टविनायक गणपती पैकी पहिला गणपती मोरगावचा मोरेश्र्वर आहे.
1. मोरेश्वर
2. चिंतामणी
3. श्री महागणपती
4. श्री विघ्नेश्वर
5. गिरिजात्मक
6. श्री विनायक
7. बल्लाळेश्वर
8. सिद्धिविनायक

मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी कोणती आहे ?

मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड आहे.

Leave a Comment