Maharashtra wildlife animal information in marathi – महाराष्ट्र राज्य पूर्वीपासूनच सुजलाम सुफलाम राष्ट्र म्हणून ओळखले जाते. येथील वनांमध्ये अनेक जंगली जीव वास्तव्यास आहे, तर काही नामशेष झाले आहेत. महाराष्ट्रातील जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, वन्यजीव आणि तसेच स्थलांतरित पक्षांचा निवास आहे.
या लेखात आपण महाराष्ट्रातील जंगली प्राणी माहिती मराठी – maharashtra wildlife animal information in marathi जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील जंगलात प्रामुख्याने मर्कटे, मांसाहारी प्राणी, कीटकहारी प्राणी, उडणारा सस्तन प्राणी, शशांक, खूरवाले प्राणी, खवलेधारी प्राणी, जलचर सस्तन प्राणी, पांढरे वाघ आणि चित्ता इत्यादी प्रकारची प्राणी आढळतात.
Table of Contents
- महाराष्ट्रातील जंगली प्राणी माहिती मराठी – maharashtra wildlife animal information in marathi
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
महाराष्ट्रातील जंगली प्राणी माहिती मराठी – maharashtra wildlife animal information in marathi

महाराष्ट्रातील वन्य जीवांची माहिती घेत असताना आपण सुरुवातीला महाराष्ट्रातील जंगलाविषयी थोडक्यात माहिती पाहू.
महाराष्ट्रात सदाहरित जंगले, रुंदपर्णी पानझडी वृक्षांची वने, झुडपांची राने, समशीतोष्ण सदाहरित जंगल, समुद्रकाठी असणारे जंगल, कोकणची किनारपट्टी, दख्खनचे महाराष्ट्र पठार अशा प्रकारची जंगले आहेत.
या जंगलात मर्कटे, मांसाहारी प्राणी, कीटकहारी प्राणी, उडणारा सस्तन प्राणी, शशांक, खूरवाले प्राणी, खवलेधारी प्राणी, जलचर सस्तन प्राणी, पांढरे वाघ आणि चित्ता इत्यादी प्रकारची प्राणी आढळतात.
मर्कटे
या प्रकारात सर्व प्रकारचे माकड आणि वानर यांचा समावेश होतो. जंगलामध्ये माकड आणि वानर हे रानगायी किंवा हरीण यांच्या बरोबर राहताना आढळून येते. पट्टेवाला वाघ आणि बिबट्या हे माकड आणि वानर यांचे शत्रू आहेत, अर्थात ते यांची शिकार करून आपले पोट भरवतात.
तसेच अजगर आणि मगरी या मर्कट प्रजातीचे दुसरे शत्रू मानले जाते, पाणी पिण्यासाठी आलेल्या माकड आणि वानर यांची ते शिकार करत असतात.
जंगलात माकडे कळपाने राहत असतात. एका कळपात साधारण 30 पर्यंत नर आणि मादी माकड राहतात. ही संख्या कमी किंवा जास्त असू शकते.
यामध्ये आपल्याला माकडाचे विविध प्रकार पाहायला मिळतात.
- लाल तोंडाचे माकड
- उत्तरी माकड
- हनुमान वानर
- तेवांग
मांसाहारी प्राणी
मांसाहारी प्राण्यांचे गट खूप मोठा आहे. यामध्ये वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, लांडगा, कोल्हा, अस्वल या प्राण्यांचा समावेश होतो.
कुत्रा, लांडगा आणि कोल्हा हे प्राणी एकच प्रकार यामध्ये येतात. या प्राण्याविषयी दृष्टी आणि गंध खूप तीक्ष्ण स्वरूपाची असते. तसेच त्यांचे पाय खूप मजबूत असतात. यातील लांडगा आणि कोल्हा आणि आयुष्यभर आपले जीवन जंगलामध्ये जगतात तर कुत्रा हा प्राणी मानव वस्तीत राहताना आपल्याला दिसून येतो.
महाराष्ट्र राज्यातील कुलाबा, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, सोलापूर, बीड, अमरावती आणि चंद्रपूर या ठिकाणी लांडगा या प्राण्याचे निवास आढळतात.
महाराष्ट्रातील सर्व जंगलांमध्ये कोल्हा प्राणी आढळून येतो. रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, भंडारा, आणि चंद्रपुर या जिल्ह्यात असणारे जंगलामध्ये जंगली कुत्रे निवास करतात.
अस्वलाचे गंधज्ञान अतिशय तीव्र स्वरूपाचे असते. परंतु त्याची दृष्टी खूपच मंद स्वरूपाची असते. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, मुंग्या आणि वाळवी या अस्वलाचे प्रमुख खाद्य असते.
महाराष्ट्र राज्यात आढळणाऱ्या अस्वलाचे वजन 125 ते 150 किलोग्राम असते, अमेरिकेत असणाऱ्या अस्वलाचे वजन 450 किलोग्राम असते, तर अलास्का या ठिकाणी आढळणाऱ्या असलेला अस्वल 700 किलोग्राम पर्यंत असू शकते.
अस्वलाचे आयुर्मान जवळपास 40 ते 50 वर्षे इतके असते. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात असणारे जंगलामध्ये अस्वल आढळतात.
त्यानंतर भंडारा, अमरावती आणि सातारा या ठिकाणी जलमांजरे आढळतात. तळे, ओढे, नाले, सरोवरे आणि इतर पाण्याचे प्रवाह वाहत असणाऱ्या ठिकाणी यांचा आढळ आहे.
राटेल हा प्राणी फक्त भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतो. हे प्राणी मुख्यतः मांसाहारी असतात. यासोबतच महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्य यामध्ये जावडी मांजर आणि उद्-मांजर पाहायला मिळतात.
यासोबतच मांसाहारी प्राण्यांच्या गटात मुंगूस, तरस, वाघ, बिबळ्या, वाघटी आणि मांजरे यांचा समावेश होतो.
उडणारे सस्तन प्राणी
वटवाघुळ हे एकमेव सस्तन प्राणी आहेत ज्यांना पंख असून ते आकाशामध्ये मुक्तपणे उडू शकतात. वटवाघुळ याचे दोन प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे फळे खाणारी वटवाघूळ आणि दुसरा प्रकार म्हणजे कीटक खाणारे वटवाघूळ.
वटवाघुळ हे साधारणत 55 किलोमीटर ताशी इतक्या वेगाने उडू शकतात. वटवाघूळ ही निशाचर असल्याने रात्रीच्या अंधारात सहजतेने उडू शकतात.
कीटक खाणाऱ्या वटवाघळाची श्रवण शक्ती फळे खाणारा वटवाघुळापेक्षा खूप तीव्र असते. तसेच यांचे स्पर्शज्ञान देखील तीव्र स्वरूपाची असते. वड, उंबर, चिंच किंवा जास्त फांद्या असणाऱ्या झाडांवर वटवाघुळ आढळून येतात.
कुरतडणारे प्राणी
खारी, घुशी, उंदीर आणि सायाळी हे कुरतडणारे प्राणी महाराष्ट्रात आढळतात. या प्राण्यांना आपण ओळखतच आहोत.
खारे मध्ये दोन प्रकार पडतात एक छोटी खार आणि एक दुसरी मोठी खार, महाराष्ट्र मध्ये आढळणारी खार ही मोठी खार असते.
उंदीर हा सर्वांना माहितीच आहे. उंदिरच्या प्रामुख्याने तीन प्रकार महाराष्ट्रात पहावयास मिळतात. यामध्ये शेतातील उंदीर, घरगुती मंदिर आणि झाडावरील उंदीर याचा समावेश होतो.
शशांक
ससा हा लहान मुलांचा सर्वात आवडता प्राणी आहे. शशांक म्हणजे ससा, हा संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करणारा प्राणी आहे. याचे कान खूप लांब असतात, आणि मागील पाय हे पुढील पायाहून मोठे असतात ही सश्याची ओळख.
खूरवाले प्राणी
या गटात असणारे प्राणी पायांच्या बोटांवर भार देऊन चालतात. यांच्या पायांच्या बोटांचेच रूपांतर खुरात झालेले असते. यामध्ये प्रामुख्याने झेब्रा, घोडा, गाढव आणि गेंडा या प्राण्यांचा समावेश होतो. खूरवाले प्राणी प्रामुख्याने शाकाहारी असून ते घास, गवत आणि पाला खात असतात. या सर्वच प्राण्यांच्या दाढी आकाराने मोठ्या असतात.
खूरवाले प्राणी या गटात शेळ्या, मेंढ्या, एडके, गवे, याक, गाई, म्हशी, हरणे, काळवीट, सांबर, झेब्रा, घोडा, गाढव आणि गेंडा यांचा समावेश होतो.
खवलेधारी प्राणी
या गटात असणाऱ्या प्राण्यांना दात नसतात. महाराष्ट्रातील जंगलात प्रामुख्याने खवले मांजर आढळतात. शत्रु पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हा आपल्या शरीराची गुंडाळी करू शकतो. तसेच या शहरावर जाड आणि तणाव खवले असतात.
हा साधारण जमिनीमध्ये बिळे खंदून राहत असतो. मुंग्यांची अंडी, मुंग्या, वाळवी हे यांचे आवडीचे खाद्य आहेत. याला मुंग्याखाऊ म्हणून ओळखले जाते.
आदिवासी समाज याचे मांस खातात व सांधेदुखीवर औषध म्हणून खवले मांजराचे मास वापरतात.
जलचर सस्तन प्राणी
या गटात व्हेल, डॉल्फिन, पॉरपाज, समुद्रगायी, सील, वॉलरस आणि समुद्रसिंह या प्राण्यांचा समावेश होतो. पाण्यातील जीवन सोपे जावे म्हणून निसर्गाने त्यांना अनुरूप असे शरीर दिले आहे.
हे जलचर प्राणी सहसा कोणी खत नाही, पण कारखान्यात वेगवेगळ्या वस्तू बनविण्यासाठी याचा वापर केला जातो.
देवमास्याच्या हाडापासून तेल बनविण्यात येते. सील आणि समुद्रसिंह या प्राण्यांच्या कातड्यापासून लांब लांब केसाळ कोट बनवतात. या कोटाला बाजारात प्रचंड मागणी आहे.
चित्ता
प्राणी संग्रहालय जंगलामध्ये चिता सध्या आढळत नाही. जंगलातील चित्ताचे अस्तित्व नाहीसे झाल्यासारखे आहे. चित्याची कातडी अतिशय सुंदर असल्याने त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी होती, परिणामी चित्याची बेसुमार शिकार केल्यामुळे त्याचे अस्तित्व संपत चालले आहे.
चिता त्याच्या विलक्षण गती साठी ओळखला जातो. आपल्या भक्ष्यावर झडप घालताना चिता 70 किमी इतक्या वेगाने पळू शकतो. तसेच चिता झाडावर चढण्यास पटाईत असतो.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील जंगली प्राणी माहिती मराठी – maharashtra wildlife animal information in marathi जाणून घेतली.
त्याचबरोबर जंगलातील मर्कटे, मांसाहारी प्राणी, कीटकहारी प्राणी, उडणारा सस्तन प्राणी, शशांक, खूरवाले प्राणी, खवलेधारी प्राणी, जलचर सस्तन प्राणी, पांढरे वाघ आणि चित्ता मराठी माहिती पाहिली आहे.
महाराष्ट्रातील जंगली प्राणी माहिती मराठी – maharashtra wildlife animal information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांची माहिती मराठी – maharashtra wildlife animal information in marathi ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांची माहिती मराठी तुमच्याकडे असेल तर आम्हला नक्की कळवा, आम्ही ती माहिती या लेखात समाविष्ट करू.
हे देखील वाचा :
- महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य माहिती मराठी
- राधानगरी वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती
- वाघ मराठी माहिती
- मांजराची माहिती मराठी
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
स्वतःचा निवारा स्वतः तयार करणारे कोणकोणते प्राणी आहेत ?
शिंपी, चिमणी, सुगरण हे पक्षी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात.
मधमाश्या, घुशी आणि उंदीर आपापल्या सोयीने घर बनवतात.
अश्या प्रकारे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा,उन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा निवारा सर्वच प्राणी तयार करतात.
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ?
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा आहे.