महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे व त्यांची माहिती

Maharashtratil Paryatan Sthal – भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक सुंदरता असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. महाराष्ट्र निर्मितीनंतर राज्यातील पर्यटन विकास व्हावा, या हेतूने सरकारने इसवी सन 1975 साली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ स्थापन केली.

भारत देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात आहे. देवीची साडेतीन शक्तिपीठे, अष्टविनायक, प्राचीन लेणी व गुफा मंदिर, थंड हवेचे ठिकाण तसेच गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक किल्ले, वस्तू संग्रहालय, तीर्थक्षेत्र आणि प्रमुख मंदिरे महाराष्ट्रात आहेत.

यामुळे महाराष्ट्र जागतिक पर्यटकांची आवड बनले आहे. या लेखातून आपण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे व त्यांची माहिती (Maharashtratil Paryatan Sthal) जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे व त्यांची माहिती (Maharashtratil Paryatan Sthal)

Maharashtratil Paryatan Sthal

महाराष्ट्रात ऐतिहासिक, धार्मिक, संग्रहालय, नैसर्गिक सुंदरता अशी बरीच ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच मुंबई या ठिकाणी हिंदी आणि मराठी या राष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती होते. यामुळे मुंबई हे सिनेमा सृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसा अर्थात किल्ले महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांनी 350 हून अधिक किल्ले जिंकले. यातील रांगणा किल्ला हा मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे (Maharashtratil Paryatan Sthal) यादी पाहा.

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग नावे व ठिकाण (5 Jyotirlinga In Maharashtra In Marathi)

5 jyotirlinga in maharashtra in marathi
ज्योतिर्लिंगजिल्हा
घृष्णेश्वर औरंगाबाद
परळी वैजनाथ बीड
भीमाशंकरपुणे
औंढा नागनाथ हिंगोली
त्र्यंबकेश्वरनाशिक

प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा, चेतना या सर्व अवस्थेसाठी ज्योती हा शब्द वापरला आहे. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग! हे ज्योतिर्लिंग भारतात एकूण बारा आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्र राज्यात पाच आहेत.

अष्टविनायक गणपती नावे व ठिकाण माहिती (Ashtavinayak Darshan List In Marathi)

Ashtavinayak Darshan List In Marathi
गणपतीचे नावस्थळ
चिंतामणीथेऊर (पुणे)
श्री महागणपतीरांजणगाव (पुणे)
मयुरेश्वर मोरगाव (पुणे)
श्री विघ्नेशवर ओझर (पुणे)
गिरिजात्मक लेण्याद्री (पुणे)
श्री विनायक महाड (रायगड)
बल्लाळेश्वरपाली (रायगड)
सिद्धिविनायकसिद्धटेक (अहमदनगर)

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांमध्ये (Maharashtratil Paryatan Sthal) अष्टविनायक दर्शन यात्रा लोकांची आवडती पसंत आहे. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.

या देवळांना गणपतीची आठ तीर्थे म्हणतात. 8 मंदिरांपैकी 6 मंदिरे पुणे जिल्ह्यात आणि 2 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहेत.

कोणतीही पूजा सुरू होण्यापूर्वी आपण पहिला गणपतीची पूजा करतो. हिंदू धर्मातील प्रत्येकाला भगवान गणेश आवडतात कारण तो सर्व समस्यांपासून आपल्या भक्तांचे रक्षण करतो.

मयुरेश्वर गणपती आणि मोरेश्वर गणपती एकच ठिकाण आहे. लेण्याद्री डोंगरात 30 बुध्दकालीन लेण्या आहेत. त्यापैकी सात क्रमांकाची लेणी म्हणजेच गिरिजात्मक गणपती आहे.

Related – अष्टविनायक ओझरचा विघ्नहर माहिती

महाराष्ट्रातील शक्तीपीठे नावे व माहिती (Shakti Peeth List In Maharashtra)

शक्तिपीठेठिकाण
महालक्ष्मी (अंबाबाई) कोल्हापूर
रेणुकामातामाहूर (नांदेड)
तुळजाभवानीतुळजापूर (उस्मानाबाद)
सप्तशृंगी (अर्धपीठ)वणी (नाशिक)

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी (Maharashtratil Paryatan Sthal) शक्तिपीठाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शक्तिपीठ म्हणजे हिंदू धर्मांच्या देवीचे स्थान. पुराणामध्ये शक्तिपीठ आता ज्या ठिकाणी आहेत तिथे काहीतरी फार महत्वाचे प्रसंग घडले आहेत.

त्यानंतर त्यादेवीचे स्थान म्हणून त्या त्या ठिकाणी देवीची मंदिरे उभारण्यात आली. पण याचे अनन्यसाधारण महत्व असल्यामुळेच याला ‘शक्तिपीठ’ असे म्हटले जाते. भारत देशात एकूण 51 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे तीन शक्तीपीठ महाराष्ट्र राज्यात आहेत.

महाराष्ट्रातील प्राचीन लेणी आणि गुफा मंदिरे

Maharashtra leni information in marathi
लेणीजिल्हा
अजिंठाऔरंगाबाद
वेरुळ औरंगाबाद
पितळखोराऔरंगाबाद
कार्ला (मळवली)पुणे
बेडसा (कामशेत)पुणे
भाजे (मळवली)पुणे
घारापुरीरायगड
गोमाशी रायगड
आगाशीव सातारा
खरोसालातूर
खिद्रापूरकोल्हापूर
पांडवलेणीनाशिक

भारतातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा ही आहे. ही लेणी इसवी सन दुसऱ्या शतकातील आहे. भाजे लेणी हा एकूण 12 लेण्यांचा समूह आहे. आगाशीव लेणी हा 66 लेण्यांचा समूह आहे. खिद्रापूर या ठिकाणचे कोपेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या लेण्यांचा शोध 28 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ याच्यामुळे लागला. या लेण्या वाघूर नदीच्या परिसरात आहेत. इसवी सन पूर्व दुसरे ते चौथे शतक या काळात कोरलेल्या या 22 बुद्ध लेणी आहेत. या लेण्यांचा जागतिक वारसा यादीत 1983 साली समावेश झाला.

वेरुळ लेणी कोणाच्या सातवाहन,वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात खोदली गेली. वेरूळ लेणी खुलताबाद तालुक्यात आहे. इसवी सन पाच ते दहाव्या शतकात वेरुळ लेणीची निर्मिती झाली आहे. वेरुळ या ठिकाणी 34 लेण्यांचा समूह आहे. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा दिला आहे.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांमध्ये (Maharashtratil Paryatan Sthal) अजिंठा वेरूळ लेणी जगप्रसिद्ध पर्यटनाचे आकर्षण बनले आहे.

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (Maharashtra Hill Station Tourism)

Maharashtra Hill Station Tourism Marathi
ठिकाणउंची (मी)
महाबळेश्वर (सातारा)1438
पाचगणी (सातारा)1293
चिखलदरा (अमरावती)1188
तोरणमाळ (नंदुरबार)1150
म्हैसमाळ (औरंगाबाद)1067
भंडारदरा (अकोला)740
आंबोली (सिंधुदुर्ग)690
माथेरान (रायगड)800
खंडाळा (पुणे)550
पन्हाळा (कोल्हापूर) 754
लोणावळा (पुणे)624

चिखलदरा या ठिकाणी किचक याचा वध भीमाने येथे केला होता, म्हणून या ठिकाणाला किचकधरा या नावाने ओळखले जाते. चिखलदरा हे राज्यातील थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात सातपुड्याच्या गाविलगड रांगात येते.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. याला भारताचे मिनी काश्मीर तर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. या व्यतिरिक्त पालघर तालुक्यातील जव्हार, ठाण्यातील मोखाडा व सूर्यमाळ, उस्मानाबाद येथील येडशी, बुलढाण्यातील अंबाबरवा व भिंगारा ही महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहेत.

महाराष्ट्रातील गरम पाण्याची झरे असलेली ठिकाण (Maharashtra Hot Water Springs Marathi)

Maharashtra Hot Water Springs Marathi
गरम पाण्याचे झरेजिल्हा
वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी ठाणे
उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव, अडावद, चांगदेवजळगाव
उनकेश्वरनांदेड
दापोली, राजापूर, संगमेश्वररत्नागिरी
इंदेवधुळे
साव (महाड), उन्हेरे (पाली)रायगड
उनपदेव, अनवदेवनंदुरबार
सातिवली, कोकणेर पालघर
कापेश्वर यवतमाळ
सालबर्डीअमरावती

गरम पाण्याचा झरा म्हणजे जिथून गरम भूजल जमिनीवर नियमित वाहते. या गरम पाण्याचे तापमान 30 अंश ते 70 अंश सेल्सिअसपर्यंत असते. असो, हा वेगळा मुद्दा. महाराष्ट्र राज्यात एकूण दहा गरम पाण्याचे झरे आहेत.

महाराष्ट्रातील गड किल्ले (List Of Forts In Maharashtra In Marathi)

list of forts in maharashtra for tourism

किल्ला हा अरबी शब्द आहे, मराठीत यासाठी दुर्ग हा शब्द वापरला जातो. पूर्वीच्या काळी परकीय आक्रमणे आणि राज्यविस्तार करण्यासाठी केव्हाही युद्ध होत असायचे. राजे आपले साम्राज्याचे संरक्षण करण्यासाठी योजना बनवत. यातूनच किल्ला एक अशी वास्तू आहे, ज्यामधे आक्रमण करताना सहज शिरकाव करता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना अनेक किल्ले आणि प्रदेश जिंकून आपल्या ताब्यात घेतले. कारण किल्ले ताब्यात असेल की, त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर सहज लक्ष देता येते. हे महाराजांना माहीत होते.

साधारणपणे 160 किल्ले महाराजांच्या नावावर आहेत, तर 350 हून अधिक किल्ले महाराजांनी जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केले. महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले पाहायला मिळतात. ते पुढीलप्रमाणे…

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले – हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली, घोडबंदर, भैरवगड, भंडारगड, डोंगरी आणि सुधागड हे किल्ले ठाणे पाहण्यासारखी किल्ले आहेत.

पालघर जिल्हा पाहाण्यासारखी (किल्ले) ठिकाणे – अर्नाळा, वसईचा भुईकोट, कळवा, असावा, शिरगाव, बल्लाळगड, भगवानगड, दातीवरे, मनोर, टकमक इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले – पुरंदर, तोरणा, शिवनेरी, राजगड, सिंहगड, राजमाची इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

नाशिक जिल्ह्यातील किल्ले – साल्हेर, मुल्हेर, अंकाई टंकाई, अलंग कुलंग, घोडप, चांदवड, विश्रामगड, ब्रह्मगिरी, बितनगड, पट्टा, औंढा, आड, घनगड, हरिहरगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

रायगड जिल्ह्यातील सर्व किल्ले – रायगड, कर्नाळा, लिंगाणा, खांदेरी, उंदेरी, सुधागड, सरसगड, सुरगड, मुरुड-जंजिरा, रेवदंडा, अलिबाग आणि कोरलाई इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व किल्ले – रत्नागिरी, जयगड, विजयगड, सुवर्णदुर्ग, पासगड, कनकदुर्ग, फतेहगड, पूर्णगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

सातारा जिल्ह्यातील सर्व किल्ले – प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, मकरंदगड, वसंतगड, वैराटगड, वासोटा, मधुमकरंदगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ले – पन्हाळा, विशालगड, भुदरगड, रांगणा, महिपाळगड, समानगड आणि पारगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

औरंगाबाद जिल्हा देवगिरी हा किल्ला आहे. या किल्ल्यास दौलताबादचा किल्ला (daulatabad fort) देखील म्हटले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व किल्ले – अहमदनगरचा किल्ला म्हणजे भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, बहादूरगड, रतनगड, मांजरसुबा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

बुलढाणा या जिल्ह्यात राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहे. या ठिकाणी सिंदखेड राजा हा प्रमुख किल्ला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग किल्ला हा प्रमुख किल्ला आहे. अकोला जिल्ह्यात नरनाळा, बाळापूर, असदगड हे प्रमुख किल्ले आहेत.

हरिश्चंद्रगड हा किल्ला ठाणे, पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे. तरुण वर्गात किल्ले हे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे (Maharashtratil Paryatan Sthal) प्रमुख आकर्षण आहे.

महाराष्ट्र राज्यातील वस्तुसंग्रहालय (Famous Museum in Maharashtra)

maharashtra museum in marathi
जिल्हावस्तुसंग्रहालय
पुणे 1. आगाखान पॅलेस
2. राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय
3. गणेश संग्रहालय
4. बलेड्स ऑफ गलोरी क्रिकेट मुझियम
अहमदनगर1. आलमगीर संग्रहालय
2. कॅवलरी टँक म्युझियम
औरंगाबाद 1. सोनेरी महाल
2. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
कोल्हापूर1. चंद्रकांत मांडरे कलादालन
2. सिद्धगिरी म्युझियम
3. टाऊन हॉल संग्रहालय
मुंबई 1. नॅशनल मेरिटाईम म्युझियम
2. डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम
सातारा1. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
2. श्री भवानी संग्रहालय
उस्मानाबादरामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय
नाशिकनाणे संग्रहालय
नागपूरमध्यवर्ती संग्रहालय

महाराष्ट्र तीर्थक्षेत्र – प्रेक्षणीय मंदिरे आणि ठिकाण (Famous Religious Places In Maharashtra)

प्रमुख मंदिर जिल्हा
एकविरा मंदिर, कार्ले पुणे
धूतपापेश्वर मंदिर रत्नागिरी
गोंदेश्वर मंदिरनाशिक
खंडोबा मंदिरऔरंगाबाद
भगवान पुरुषोत्तम मंदिरबीड
आनंदेश्वर मंदिरअमरावती
शिवमंदिरगडचिरोली

महाराष्ट्र राज्यातील संत तुकाराम महाराज याचे देहू तर ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ, वाशिम मध्ये असणारे संत सेवालाल महाराज यांचे समाधी स्थळ, मंगळवेढा मध्ये असणारे बसवेश्वरांचे स्मारक हेही तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

पंढरपूरचा विठोबा-रखुमाई, नाशिकची सप्तशृंगी देवी, पुण्यातली खंडोबाची जेजुरी आणि शिर्डीचे साईबाबा हे खूप प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत.

सारांश

या लेखातून आपण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे व त्यांची माहिती (Maharashtratil Paryatan Sthal) जाणून घेतली. यात आपण देवीची साडेतीन शक्तिपीठे, अष्टविनायक, प्राचीन लेणी व गुफा मंदिर, थंड हवेचे ठिकाण तसेच गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक किल्ले, वस्तू संग्रहालय, तीर्थक्षेत्र आणि प्रमुख मंदिरे याविषयी माहिती पाहिली.