Maidani khel in marathi – खेळ खेळणे ही एक शारीरिक कला मानली जाते. ही कला अवगत करण्यासाठी दररोज किमान अर्धा ते एक तास सराव करावा लागतो. खेळ हे बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता यावर आधारलेले असतात. यामुळे अश्या खेळांची विभागणी केली जाते.
या लेखातून आपण मैदानी खेळ याविषयी माहिती (Maidani khel in marathi) सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. यात आपण मैदानी खेळ खेळण्याचे फायदे व मैदानी आणि बैठे खेळातील फरक पाहणार आहोत.
खेळाची माहिती मराठी (game information in marathi)

नाव | खेळ |
प्रकार | मैदानी खेळ बैठे खेळ |
खेळणारे | प्रत्येक वयोगटाचे |
जगातील सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ | फुटबॉल |
भारताचा राष्ट्रीय खेळ | हॉकी |
आज जगभर विविध खेळ खेळले जातात. यातील फुटबॉल, क्रिकेट असे खेळ जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खेळले जातात. खेळ खेळणे एक कला असून यात निपुण होण्यासाठी प्रचंड मेहनतीची जोड असावी लागते.
फार पूर्वीपासूनच खेळ खेळले जातात. पूर्वी राजे त्यांच्या काळात मनोरंजनासाठी विविध खेळांचे आयोजन करायचे. जसे की रेडयांच्या शर्यती, बैलांच्या झुंजी, कुस्त्या, तलवारबाजी, दांडपट्टा, तिरंदाजी इत्यादी.
खेळाचे प्रकार व माहिती (importance of games and sports mahiti marathi)
खेळाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. हे प्रकार खेळ खेळण्याच्या पद्धतीवरून करण्यात आले आहेत. यातूनच खेळाचे नियम तयार केले जातात.
1. मैदानी खेळ – मैदानी खेळ म्हणजे असा खेळ जो मैदानावर खेळला जातो. या खेळात संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्याने अनेक फायदे असून मुख्य फायदा म्हणजे शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते.
मैदानी खेळाचे देखील काही प्रकार पडतात. यातील काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही खेळ संघाने खेळले जातात.
सांघिक खेळामध्ये क्रिकेट, फूटबॉल, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी अशा खेळांचा समावेश होतो.
2. बैठे खेळ – या प्रकारातील खेळ खेळताना मैदानात जाण्यास गरज नसून एका जाग्यावर बसुन खेळता येतात. असे खेळ प्रामुख्याने एखाद्या ईमारतीत किंवा स्टेडियममध्ये खेळले जातात.
यामध्ये कॅरम, पत्ते, बुद्धीबळ, सारीपाट, टेबल टेनिस अश्या विविध खेळांचा समावेश होतो. अश्या खेळात कमीतकमी खेळाडूंची गरज असते. तसेच बाहेरील वातावरणाचा परिणाम खेळ खेळताना होत नाही. जसे की पाऊस पडला म्हणून क्रिकेट सामना खेळता येत नाही.
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
मैदानी खेळ | बैठे खेळ |
---|---|
मैदानी खेळ म्हणजे असा खेळ जो मैदानावर खेळला जातो. | बैठे खेळ म्हणजे असा खेळ जो कुठेही खेळला जाऊ शकतो, म्हणजे ज्याला मैदानाची गरज लागत नाही. |
हे खेळ प्रामुख्याने उभा राहून खेळले जातात. | हे खेळ प्रामुख्याने बसून खेळले जातात. |
या खेळात जास्त शारीरिक हालचाल होते. | या खेळात शारीरिक हालचाल जास्त नसून बौद्धिक हालचाल होते. |
अश्या खेळात शारीरिक क्षमता जास्त असावी लागते. यामुळे असे खेळ खेळण्यास शरीर लवकर थकते. | अश्या खेळात शारीरिक क्षमता कमी असली तरी चालते. यामुळे असे खेळ खेळण्यास शरीर लवकर थकत नाही. |
असे खेळ खेळण्यात रोमांच व थरारक अनुभव मिळतो. | असे खेळ खेळण्यात रोमांच व थरारक अनुभव कमी प्रमाणात मिळतो. |
यातील खूप खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात. उदा. फुटबॉल व क्रिकेट | कॅरम, बुद्धिबळ सोडले तर बहुतांश खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जात नाहीत. |
मैदानी खेळ खेळण्याचे फायदे माहिती (maidani khelache fayde in marathi)
मैदानी खेळ खेळण्याने शरीर स्वस्थ राहतं. आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते. मन प्रसन्न राहून कोणत्याही कामात उत्साह निर्माण होतो.
मैदानी खेळ खेळल्याने एकलकोंडा दोष नाहीसे होतो. बऱ्याच जणांना एकटे राहण्याची सवय लागते. याचा मानसिक व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसे पाहिले तर एकटं राहण्याचे फायदे आहेत, पण जास्त एकटे राहिल्याने बौद्धिक व शारिरीक विकास होण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे सर्वागीण विकासासाठी मैदानी खेळ गरजेचे असतात.
मैदानी खेळ खेळल्याने नेतृत्वगुण विकसित होऊ लागतो. बैठे खेळान नेतृत्वगुण जास्त प्रमाणात विकसित होत नाहीत. यासाठी बरेच लोक मैदानी खेळास प्राधान्य देतात.
मैदानी खेळ खेळल्याने शारिरीक विकास होतो, यातूनच शरीर नेहमी प्रसन्न राहते. कोणतेही काम सहजरीत्या करता येते. मानसिक त्रासापासून सुटका होते.
मैदानी खेळ खेळताना सगळी ज्ञानेद्रिय कार्यरत असतात. त्यामुळे आपली एकाग्रता वाढीस लागते. अभ्यासात किंवा इतर कोणतेही काम एकाग्रतेने करता येते.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण मैदानी खेळ खेळण्याचे फायदे माहिती मराठी (benefits of maidani khel) सविस्तरपणे जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Faq)
मैदानी खेळ म्हणजे काय ते सांगून खेळांचे विविध प्रकार लिहा.
मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय.
खेळाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. हे प्रकार खेळ खेळण्याच्या पद्धतीवरून करण्यात आले आहेत.
1. मैदानी खेळ – मैदानी खेळ म्हणजे असा खेळ जो मैदानावर खेळला जातो. या खेळात संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्याने अनेक फायदे असून मुख्य फायदा म्हणजे शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते.
2. बैठे खेळ – या प्रकारातील खेळ खेळताना मैदानात जाण्यास गरज नसून एका जाग्यावर बसुन खेळता येतात. असे खेळ प्रामुख्याने एखाद्या ईमारतीत किंवा स्टेडियममध्ये खेळले जातात.
मैदानी खेळाचे महत्व काय आहे ?
मैदानी खेळाचे महत्व पुढील प्रमाणे.
1. मैदानी खेळामुळे शरीर तंदुरुस्त व मजबूत राहते. शारीरिक क्षमतेबरोबर बौद्धिक विकासही होतो.
2. कोणत्याही गोष्टीविषयी साहस निर्माण होतो म्हणजे शरीरात उत्साह भरून येतो. 3. नेतृत्वगुणाचा विकास होतो. एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण होते.
4. मैदानी खेळ खेळल्याने एकाग्रता निर्माण होते.
5. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहे.
सांघिक खेळ म्हणजे काय ?
सांघिक खेळ म्हणजे असा खेळ जो खेळण्यासाठी एकाहून अधिक किंवा संघाची आवश्यकता असते.
उदा. क्रिकेट, कब्बडी, फुटबॉल
बैठे खेळ म्हणजे काय ?
बैठे खेळ म्हणजे असा खेळ जो खेळण्यासाठी नियोजित जागा किंवा ठराविक मैदानाची गरज लागत नाही. एका जागेवर बसून हा खेळ खेळला जाऊ शकतो.
भारतीय मैदानी खेळ कोणते आहेत ?
भारतीय मैदानी खेळ पुढीलप्रमाणे आहेत.
1. कबड्डी
2. कुस्ती
3. आट्यापाट्या
4. खो-खो
5. गोल खो-खो
6. फुटबॉल
7. मल्लखांब
8. लगोऱ्या
9. लंगडी
विदेशी मैदानी खेळ कोणते आहेत ?
विदेशी मैदानी खेळ पुढीलप्रमाणे आहेत.
1. क्रिकेट
2. फुटबॉल
3. व्हॉलीबॉल
4. बॅडमिंटन
5. हॉकी
6. पोलो
7. कॅरम
8. बुद्धिबळ
9. गोल्फ
10. हॉर्स रायडिंग
मुलांनी रोज संध्याकाळी मोकळ्या मैदानात का खेळावे ?
मुलांनी रोज संध्याकाळी मोकळ्या मैदानात खेळावे कारण मोकळ्या मैदानात खेळल्याने त्यांचा उत्साह, मानसिक व शारिरीक विकास वाढीस लागतो. मुलांचे अभ्यासात मन लागते, कोणत्याही नकारात्मक भावना मनात घर करत नाही. मनातील न्यूनगंड नाहिसा होतो.
मैदानी खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात ?
मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात. यात कुशल झालेला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून व्यावसायिक संधी प्राप्त करू शकतो.
हे लेख जरूर वाचा :