मकर संक्रांत माहिती मराठी – Makar sankranti 2022 in marathi

Makar sankranti 2022 in marathi – मकर संक्रांत हा सण नवीन वर्षाच्या सुरुवातीला येत असतो. दरवर्षप्रमाणे या वर्षी मकरसंक्रांत 14 जानेवारी 2022 या दिवशी आहे. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पुर्ण होतात आणि आपले दुःख नाहीसे होते, अशी मान्यता आहे.

असे म्हणतात, या दिवशी तीळ एकमेकांना वाटल्याने शनिदोषातून आपण मुक्त होतो. याबरोबरच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे मकर राशीत संक्रमण झाल्यामुळे खरमास संपून सर्व शुभ कार्ये सुरू होतात. मकर संक्रांतिपासून लग्न, मुंडण आणि इतर समारंभ सुरू होतात.

या लेखात आपण मकर संक्रांत माहिती मराठी – Makar sankranti information in marathi जाणून घेणार आहोत.

Table of Contents

मकर संक्रांत माहिती मराठी – Makar sankranti 2022 in marathi

Makar sankranti 2022 in marathi
मकर संक्रांत माहिती मराठी

मकर संक्रांत निमित्त सकाळी लवकर स्नान करून मडक्यात लाल फुले आणि अक्षत टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचे असते. सूर्याच्या बीज मंत्राचा जप करावा, अशी मान्यता आहे. श्रीमद्भगवदातील एक अध्याय वाचा किंवा गीताचे पठण करावे.

नवीन धान्य, घोंगडी, तीळ आणि तूप दान करावे, अशी मान्यता आहे. या दिवशी जेवणात नवीन पदार्थाची खिचडी बनवतात. त्यानंतर देवाला नैवैद्य अर्पण करायचे आणि प्रसाद म्हणून घ्यायचा. एखाद्याला भांड्यांसह तीळ दान केल्याने शनिदेवाशी संबंधित दुखापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

मकर संक्रात पंचांग मराठी – makar sankranti 2022 panchang

makar sankranti 2022 panchang in marathi – मकरसंक्रांती 14 जानेवारी 2022 रोजी (शुक्रवारी) साजरी (Makar Sankranti 2022 Date) केली जाईल.

मकरसंक्रांती पुण्य काळ – दुपारी 02:43 वाजल्यापासून ते सायंकाळी 05:45 वाजेपर्यंत असेल.

मकर संक्रांति रंगाचे महत्व माहिती – makar sankranti 2022 in marathi color

Makar sankranti 2022 colour in marathi – मकर संक्रात हा भारतीय सणानपैकी एक सण आहे. या दिवशी सर्व महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करतात. या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी आपल्या मैत्रिणींना त्या आमंत्रित करत असतात.

makar sankranti 2022 color not to wear – सण आणि उत्सव मध्ये काळा रंग वापरत नाहीत. परंतु मकर संक्रात हिवाळा ऋतूत येत असल्याकारणाने हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान करण्यात येतात.

हा कार्यक्रम करताना काही जणी मकरसंक्रांत निमित्ताने रांगोळी स्पर्धा (makar sankranti rangoli in marathi) आयोजित करतात.

मकर संक्रात 2022 शुभेच्छा – greetings makar sankranti 2022 in marathi

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!” तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! तिळगुळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रात निमित्ताने महाराष्ट्र राज्यात खास पदार्थ (sankranti special food items in maharashtra) बनवले जातात. ज्यामध्ये खिचडी, गुळपोली, उंधियो, घेवर आणि उसाच्या रसाची खीर बनवतात.

इतर कार्यक्रम (other special features of makar sankranti) – मकर संक्रात वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. काही जण या दिवशी पतंग उडवतात. सूर्य देवाची पूजा करून दान धर्म करतात. काही जण घरातील गायीची पूजा करत असतात.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल >> महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी – festival of maharashtra information in marathi

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण मकर संक्रांत माहिती मराठी – Makar sankranti 2022 in marathi जाणून घेतली. त्याचबरोबर या लेखात आपण मकर संक्रात माहिती मराठीत पाहिली आहे.

मकर संक्रांत माहिती मराठी – Makar sankranti information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो ?

मकर संक्रांत हा सण हिवाळा ऋतूत येतो.

मकर संक्रांत म्हणजे काय मराठी माहिती ?

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात.

Leave a Comment