makar sankranti 2023 in marathi – मकर संक्रांत दरवर्षी जानेवारी महिन्यातील 14 तारखेला येत असतो, पण या वर्षी 15 जानेवारी 2023 या दिवशी मकर संक्रांत आली आहे. या सणाच्या निमित्ताने सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पुर्ण होऊन जीवनातील दुःख नाहीसे होते, अशी मान्यता आहे.
या लेखातून आपण मकर संक्रांती पंचांग, पूजेचा विधी व रंगाचे महत्व (makar sankranti 2023 in marathi) जाणून घेणार आहोत.
मकर संक्रांती पंचांग मराठी (makar sankranti panchang 2023 marathi)

makar sankranti 2023 panchang in marathi – 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. त्यांनतर 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल.
यावेळी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 7 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटापर्यंत राहील. महापुण्यकाळ मुहूर्त 7 वाजून 15 मिनिटे ते 9 वाजून 15 मिनिटापर्यंत असेल.
मकर संक्रांत पूजा 2023 माहिती (makar sankranti puja vidhi in marathi)
नवीन वर्षाला सुरुवात झाली की, येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. हा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्त्वं आहे तेवढंच सुगड पूजनालाही महत्त्वं असते.
या पुजेविषयीची माहिती आम्ही पुढील लेखात देऊ. या लेखात मी तुम्हाला सुगड पूजन आणि नवरीचा ववसा पूजेचा मुहूर्त सांगणार आहे.
सुगड पूजनाचा मुहूर्त सकाळी 06.58 पासून सकाळी 08.45 पर्यंत आहे.
मकर संक्रांत रंग माहिती (makar sankranti colour 2023 in marathi)
मकरसंक्रात हा भारतील प्रमुख सण असून या दिवशी सर्व महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करतात. या कार्यक्रमात त्या एकमेकींना शेतांत आलेल्या धान्याचे वाण देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
सण आणि उत्सवात सहसा काळा रंग वापरत नाहीत. पण मकरसंक्रात हिवाळा ऋतूत येत असल्याने या ऋतुत ऊबदार कपडे परिधान केले जातात. कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो, म्हणून मकर संक्रातीला काळे कपडे परिधान करण्यात येतात.
सारांश
या लेखातून आपण मकर संक्रांतीविषयी (makar sankranti 2023 in marathi) सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
मकर संक्रांत किती तारखेला आहे ?
मकर संक्रांत 15 जानेवारी 2023 या तारखेला आहे.
मकर संक्रांतीला कोणती पूजा करतात ?
मकर संक्रांतीला सुगडाची पूजा करतात.
पुढील वाचन :