makhana in marathi – मित्रांनो, सुकामेवा खाण्याचे महत्व तुम्हाला नक्कीच माहीत असतील. सुकामेव्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे विपुल प्रमाणात असतात. यामुळे सुकामेवा खाल्याने शरीराला नक्कीच फायदा होतो.
मखाना याचा समावेश सुकामेव्यात होतो. मखाना हा इंग्रजी शब्द असून त्याला मराठीत (makhana in marathi name) कमळाचे बी असे म्हणतात. फॉक्स नट्स आणि लोटस सीड्स या नावाने देखील मखाना ओळखला जातो.
या लेखातून आपण मखाना माहिती मराठी (makhana in marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. याचे शरीराला होणारे फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत याविषयी आपण चर्चा करणार आहोत.
मखाना माहिती मराठी (makhana in marathi)
नाव | मखाना (कमळाचे बी) |
इतर नावे | फॉक्स नट्स आणि लोटस सीड्स |
शास्त्रीय नाव | नेलुंबो नुसिफेरा |
प्रकार | सपुष्प वनस्पती |
तुम्ही सर्वजण कमळ फूलं पाहिले असेलच पण तुम्हाला माहिती आहे का, प्राचीन काळापासून कमळाच्या फुलाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तसेच कमळ हे भारत आणि व्हिएतनामचे देशाचे राष्ट्रीय फूल आहे.
कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते. कमळाचे पान आणि फूल पाण्याच्या वर दोन ते तीन फूट उंच वाढते. या रोपाला मार्च ते सप्टेंबर महिन्यात फुले येतात.
कमळाच्या पूर्ण परिपक्व बिया काळपट रंगाच्या असून त्यांचा आकार शेंगदाण्याइतका असतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा कमळगठ्ठ्याचे मणी असे म्हणतात. हे मणी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरले जातात.
कमळाचा वापर आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. तसेच कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य आहेत. कमळाच्या बिया ज्यांना आपण मखाना असे म्हणतो. या बिया खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो.
मखाने खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे (benefits of makhana in marathi)

मखान्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जसे की, एंटीऑक्सीडेंट, एंटी इन्फ्लेप्लेमेंटरी, एंटी ट्यूमर इत्यादी. याला खाल्ल्याने ताप, कमजोर पचनशक्ती आणि दस्त या समस्या दूर होतात.
कमळाच्या बियांत इथेनॉल अर्क असते, यामुळे आपल्या शरीरातील फॅट नियंत्रित राहण्यास मदत होते. सलग महिनाभर कमळाच्या बिया खाल्ल्याने अतिरिक्त चरबी नियंत्रणात आणता येते.
मजबूत शरीर सर्वानाच हवे असते. पण शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम आणि आहार योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. तुम्ही मखाने खाऊन शारीरिक कमजोरी नक्कीच दूर करू शकता. तसेच मखान्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची देखील वाढते.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. परिणामी आपले आरोग्य बिघडते. बऱ्याचदा निद्रानाश समस्या उद्भवते, यामुळे रात्री व्यवस्थित झोप येत नाही. कमळाचे बी या त्रासापासून तुमची सुटका करू शकते.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कमळाच्या बिया फायदेशीर ठरतात. पोटाच्या समस्या, मधुमेह,
मखाना खाण्याची योग्य पद्धत याविषयी माहिती (how to eat makhana in healthy way)
मखाना अतिशय उपयुक्त असा सुकामेवा आहे, याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील साखर आणि उष्णता नियंत्रणात राहते.
सकाळी नाश्त्यात दुधात मखाना मिसळून खाल्ल्याने आपले आरोग्य सुधारते. तसेच सलाडमध्ये देखील मखाना खाऊ शकतो.
खाण्याच्या तेलात मखाना तळून त्यावर चवीनुसार मिठ आणि मसाला वापरून तुम्ही सकाळचा नाश्ता करू शकता. तसेच मखान्याची बारीक पावडर करून दही आणि ताक यांचे मिसळून पिऊ शकता.
मखाना खरेदी किंमत (makhana in marathi price) ही विक्रेत्यानुसार बदलू शकतो. पण मखान्याची साधारण किंमत एका किलोसाठी 500 रुपये इतकी आहे.
सारांश
या लेखातून आपण मखाना माहिती मराठी (makhana in marathi) सविस्तरपणे जाणून घेतली. यामध्ये आपण मखाना खाण्याचे फायदे जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
सुकामेवा म्हणजे काय ?
सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्स. यामध्ये फळे सुकविलेली किंवा वाळविलेली असतात. त्यामुळे ती जास्त काळ टिकतात. यात जीवनसत्त्वे व खनिजे विपुल प्रमाणात असतात.
सुकामेव्यात कशाचा समावेश होतो ?
sukameva list in marathi – सुकामेव्यात बदाम, पिस्ता, काजुगर, जरदाळू, अक्रोड, खारीक, बेदाणे, मनुका, गोडंबी, चारोळी, सुकी अंजिरे, सुकेळी, वेलदोडे, जायफळ, केशर यांचा समावेश होतो.
पुढील वाचन :