मक्का मदीना हज यात्रा मराठी माहिती

makka madina hajj yatra in marathi – जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला इस्लाम धर्माचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाणारे मक्का आणि मदीना हे धार्मिक केंद्र सौदी अरेबियात स्थित आहे.

मुहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक असून त्यांना अल्लाहचे अंतिम प्रेषित म्हणून ओळखले जाते. अल्लाहने मुहम्मद पैगंबर यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, अशी इस्लाम धर्मात मान्यता आहे.

कुराण या इस्लाम धर्मग्रंथानुसार प्रत्येक मुसलमानाने आपल्या आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, असा नियम आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी दरवर्षी लाखो लोक मक्का आणि मदीना येथे येतात.

या लेखातून आपण मक्का मदीना मराठी माहिती (makka madina hajj yatra in marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण येथील धर्मस्थळाचा इतिहास (makka madina history in marathi) आणि संस्कृती याविषयी चर्चा करणार आहोत.

मक्का मदीना येथील हज यात्रा करण्यामागचा इतिहास (makka madina history in marathi)

makka madina hajj yatra in marathi

सौदी अरेबिया हा देश एकूण 13 प्रदेशात विभागला गेला आहे. यामध्ये मक्का आणि मदीना हे दोन प्रदेश पश्चिम भागात लाल समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहेत. या दोन्ही प्रदेशात एकूण 88 लाखाच्या आसपास इस्लाम धर्मीय लोक राहतात.

कुराण हा इस्लाम धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. इस्लामधर्मीय लोक या ग्रंथाला प्रत्यक्ष परमेश्वराचा शब्द मानतात. अल्लाने आपला दूत जिब्राईल यांच्यामार्फत मोहम्मद पैगंबराकडे कुराण पोहचवले, अशी इस्लाम धर्मातील मान्यता आहे. मोहम्मद हा अल्लाचा प्रेषित आहे अशी कुराणाची मुख्य शिकवण आहे.

20 एप्रिल 0571 रोजी मुहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का या शहरात झाला. मुहम्मद लहान असतानाच, त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका एक व्यापारी होते, या काकांच्या सोबत त्यांनी सीरिया व येमेन या देशांच्या व्यापार यात्रा केल्या.

हजरत मुहम्मद यांना चिंतनाची ओढ होती. त्यामुळे ते हिरा नावाच्या गुहेत जाऊन चिंतन करायचे. एका दिवशी या गुहेत मुहम्मद चिंतन करत असताना जिब्राईल नावाचा देवदूत येऊन अल्लाहने तुला प्रेषित म्हणून निवडले आहे असा संदेश दिला.

यानंतर हजरत मुहम्मद यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. हा संदेश एकूण त्यांची पत्‍नी, चुलतभाऊ, मित्र आणि दास यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला.

मग पुढे मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माचा प्रसार चालूच ठेवला. हा प्रसार करताना त्यांचे अनेक विरोधक निर्माण झाले. या विरोधकांनी मुहम्मद पैगंबरांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घातला. तरीदेखील मुहम्मदांनी आपले कार्य सुरूच ठेवले.

मक्केतील वाढत्या विरोधाच्या दबावाने हजरत मुहम्मद यांनी मदीना प्रदेशाकडे आपल्या प्रसार मोर्चा वळवला. यानंतर हजरत मुहम्मद यांनी मक्का सोडून मदिनेस स्थलांतरित होण्याचे ठरवले.

हजरत मुहम्मद यांच्या मक्का सोडून मदीनेला जाण्याच्या घटनेला इस्लामच्या इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली.

मक्का सोडून मदिनेमध्ये येताच त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मक्केतील विरोधकांना कंटाळून गेलेले इतर लोकही मदिनेत आले. यामुळे मुहम्मद पैगंबर आणि मुस्लिमांची शक्ती वाढू लागली.

हजरत मुहम्मद यांनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. मुहम्मदच्या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला.

या तीनही लढायांमध्ये हजरत मुहम्मद यांनी विरोधकांचा पराभव केला. यानंतर मुहम्मद यांनी 1400 अनुयायीं घेऊन मक्का येथे हज यात्रेस जाण्याचे ठरवले.

पण त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवले. हजरत मुहम्मद यांनी आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे.

यातून मक्केमधील विरोधक आणि मुहम्मद यांच्यात एक तह झाला, या तहानुसार त्यांनी मुहम्मद आणि त्यांच्या अनुयायांना पुढच्या वर्षी हज यात्रेला येण्यास सांगितले.

पुढे एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायी घेऊन मुहम्मद पैगंबर यांनी हजची यात्रा केली. ही त्यांची आयुष्यातील शेवटची हज यात्रा होती. या यात्रेत त्यांनी अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला.

या यात्रेनंतर तीन महिन्यांनी मुहम्मद पैगंबर यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायींनी इस्लामचा प्रसार आणि प्रचार जगभर केला. आज इस्लाम हा धर्म जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला धर्म आहे.

मक्का मदीना हज यात्रा कशी करतात (makka madina hajj yatra in marathi)

makka madina history in marathi

कुराण या इस्लाम धर्मग्रंथात इस्लामची तत्त्वे सांगितली आहेत. या तत्त्वानुसार कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी प्रत्येक मुसलमानाने करणे बंधनकारक आहे. यानुसार प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने शक्य असल्यास आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे हा एक नियम आहे.

त्यामुळे प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करण्यासाठी मक्का या शहरात जातो. या शहरात काबा या जागेला इस्लाममधलं सगळ्यांत पवित्र स्थळ मानलं जातं.

हज यात्रेची सुरुवात मिकातपासून होते. मिकात ही मक्का शहराच्या आठ किलोमीटर अंतरावर असलेली एक खास जागा आहे. या ठिकाणी हज यात्रेकरू एकत्र जमतात.

यात्रा करण्यासाठी पुरुषांना एक खास पद्धतीचे कपडे परिधान करावे लागतात ते महिला त्यांच्या आवडीचे कपडे परिधान करू शकतात, याला अहराम असे म्हणतात.

मक्केला उतरल्यावर मुसलमान पहिले उमरा नावाची एक छोटी धार्मिक विधी करतात. यामध्ये अनेक प्रकारची धार्मिक कर्म-कांड केली जातात.

हज यात्रेची खरी सुरुवात जिल-हिज या इस्लामिक महिन्याच्या आठ तारखेपासून होते. या तारखेला यात्रेकरू मक्का शहरापासून 12 किलोमीटर दूर असलेल्या मीना शहरात जाऊन एक रात्र येथेच राहतात.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे मुसलमान अराफतच्या मैदानात जाऊन अल्लाहचं स्मरण करतात व अल्लाह कडून आपल्या पापांची माफी मागतात.

त्याच संध्याकाळी सर्वजण मुजदलफा या शहरात जाऊन रात्री तिथेच मुक्काम करतात. दहा तारखेला यात्रेकरू पुन्हा मीना शहरात जातात.

त्यानंतर यात्रेकरू एका खास ठिकाणी जाऊन प्रतिकात्मरीत्या सैतानाला दगड मारतात. या विधीला जमारत म्हणतात. यावेळी चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू देखील होतो.

प्रतिकात्मरीत्या सैतानाला दगड मारल्यानंतर एका बकरी किंवा मेंढीचा बळी दिला जातो. त्यानंतर पुरुष सगळे केस कापतात व महिला थोडेसे केस कापतात.

यानंतर सर्वजण मक्केला येऊन काबा या पवित्र जागेला सात फेऱ्या मारतात, याला इस्लाम परिभाषेत तवाफ असे म्हणतात. जिल-हिज या पवित्र महिन्याच्या दहा तारखेला सर्व मुसलमान ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण साजरा करतात.

तवाफनंतर हज यात्रेकरू मीना शहरात परतात आणि दोन दिवस तिथे राहतात. त्यानंतर 12 तारखेला ते पुन्हा काबाला जाऊन तवाफ करून आशीर्वाद घेतात. अशा पद्धतीने हज यात्रा पूर्ण होते.

यानंतर यात्रेकरू मक्का पासून 450 किलोमीटर अंतरावरील मदिना या शहरात जाऊन मस्जिद-ए-नबवीमध्ये नमाज पढतात. या मशिदीची उभारणी मोहम्मद पैगंबर यांनी केली होती, अशी मान्यता आहे. म्हणून या ठिकाणाला महत्वाचे धार्मिक स्थळ मानलं जाते.

सारांश

makka madina information in marathi

या लेखातून आपण मक्का मदीना हज यात्रा (makka madina hajj yatra in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. यात आपण हज यात्रा का आणि कशी करतात ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

इस्लाम धर्माचे पाच स्तंभ कोणते आहेत ?

कलमा, रोजा, नमाज, जकात, हज हे इस्लाम धर्माचे पाच स्तंभ आहेत.
1. कलमा – अल्लाह हा एकच ईश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही.
2. रोजा – मुहम्मद हे अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत.
3. नमाज – दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे.
4. जकात – आपल्या मिळकतीतील अडीच टक्के मिळकत गोरगरिबांसाठी दान करणे.
5. हज – शक्य असल्यास आयुष्यातून एकदा मक्केला हज यात्रा करण्यासाठी जावे.

मुसलमान म्हणजे काय ?

इस्लाम हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. या धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान असे म्हणतात.

मक्का मदीना कोणत्या देशात आहे ?

मक्का मदीना सौदी अरेबिया या देशात आहे.

पुढील वाचन :

  1. भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती
  2. अजातशत्रू माहिती मराठी
  3. शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती
  4. सौदी अरेबिया माहिती मराठी
  5. चहाविषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य मराठी

Leave a Comment