महाराष्ट्रातील सुहाना सफर – माळशेज घाट माहिती मराठी

By | October 5, 2022

Malshej ghat information in marathi – महाराष्ट्रात सह्याद्री व त्याचे फाटे ओलांडून जाणारे अनेक घाट प्रसिद्ध आहेत. नगर-कल्याण रस्त्यावरील माळशेज घाट हा अश्याच प्रसिद्ध घाटांपैकी एक आहे. ज्याच्या आजूबाजूला हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. निसर्गाची भेट असो की शाळेची सहल प्रत्येक पर्यटक माळशेज घाटाला पसंती देतात.

या लेखातून आपण महाराष्ट्रातील सुहाना सफर – माळशेज घाट माहिती मराठी (Malshej ghat information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण माळशेज घाट धबधबा व पाहण्यासारखी ठिकाणे याविषयी माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील सुहाना सफर – माळशेज घाट माहिती मराठी (Malshej ghat information in marathi)

Malshej ghat information in marathi
नावमाळशेज घाट
प्रकारघाट
ठिकाणनगर-कल्याण रत्यावर

पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये निर्सार्गाची उधळण करत माळशेज घाट मुरबाड व जुन्नर यांच्या सीमेवर बांधण्यात आला आहे.

पावसाळ्यातील फेसळणारे धबधबे व भन्नाट रानवारा, सोबती झाडावर बसलेले धुके या सर्वांनी मोहित करणारे असे निसर्ग पर्यटन म्हणजे माळशेज घाट. महाराष्ट्राचे काश्मीर म्हणजे माळशेज घाट, या घाटाला पावसाळ्यात पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात.

कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून हे प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे.

पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर द-याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो. आता घाटात पर्यटकांसाठी खास पॉइंट केले जात आहेत. पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर दोन ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था केली आहे.

एम.टी.डी.सी. व वन विभागाने घाट परिसरात विकासकामे हाती घेतली असूनत्यातून पर्यटकांना सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

माळशेज घाट पाहण्यासारखी ठिकाणे (tourist places in malshej ghat mahiti)

माळशेज घाटात माळशेज धबधबा, परदेशी पक्षी, वन्य प्राण्यांचा वावर अशी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत.

माळशेज घाट धबधबा – पावसाळा सुरू झाला की या माळशेज घाटातील निसर्ग फुलून येतो. संपूर्ण घाटाला धुक्याने जणू वेढा घातला आहे, असे वातावरण होते. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. हा धबधबा फक्त पावसाळ्यातच तीन धारांमध्ये कोसळताना दिसून येतो.

परदेशी पक्षी व वन्यजीव – येथील जलाशयात दरवर्षी अनेक परदेशी पक्ष्याचे आगमन होत असते. प्रामुख्याने रोहित पक्षी ज्याला इंग्रजीत फ्लेमिंगो असे म्हणतात. हा पक्षी येथील विशेष आकर्षण असून याला भेट देण्यासाठी पावसाळ्यात येथे पर्यटकांची वर्दळ दिसून येते.

तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडील शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलात ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर आहे.

माळशेज घाट कसे पोहोचाल (How to reach malshej ghat by Road, Train or Air)

जवळील विमान सेवामुंबई , पुणे
जवळील रेल्वे स्थानककल्याण
रस्ताराष्ट्रीय महामार्ग क्र. 222

माळशेज घाटात जाण्यासाठी विमान व रेल्वे यांचा उपयोग होत नाही. या घाटात जाण्यासाठी रस्त्याचाच वापर करावा लागतो.

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाटाकडे जाता येते.

महाराष्ट्राच्या इतर भागातून येणारया लोकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 हाच मुख्य मार्ग असून मराठवाडा, विदर्भातील लोक याच मार्गाने माळशेज घाटात येतात.

माळशेज घाट राहण्याची सोय (Where to stay in malshej ghat)

माळशेज घाटाच्या थोड्याच अंतरावर अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट उपलब्ध असून आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करू शकतो.

  1. Make my trip
  2. Tripadvisor
  3. Holidify

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील सुहाना सफर – माळशेज घाट माहिती मराठी (Malshej ghat information in marathi) जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

माळशेज घाट कोणत्या मार्गावर आहे ?

माळशेज घाट अहमदनगर कल्याण महामार्गावर आहे. या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो.

माळशेज घाट पर्यटनासाठी का प्रसिद्ध आहे ?

माळशेज घाट पर्यटनासाठी प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे येथील निसर्ग. पावसाळ्यात येथील वातावरण अगदी फुलून येते. जवळील धबधबा, परदेशी पक्षी, वन्य जीव आणि बरेच मनमोहक अशी निसर्गाची भेट देण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात.

पुढील वाचन :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *