Mantrimandal maharashtra in marathi – मंत्री हा एक राजकारणी असतो. जो शासकीय विभागाचा किंवा मंत्रालयाचा प्रमुख म्हणून ओळखला जातो. राज्याच्या प्रमुख मंत्र्याला मुख्यमंत्री म्हणतात. देशाच्या प्रमुख मंत्र्याला पंतप्रधान असे म्हणतात.
आज या लेखात आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022 – mantrimandal maharashtra in marathi जाणून घेणार आहोत.
यामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याविषयी मराठी माहिती जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी किंवा सामान्य ज्ञान म्हणून हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे.
हा लेख जरूर वाचा – संविधानाची उद्देशिका म्हणजे काय ?
Table of Contents
महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022 – mantrimandal maharashtra in marathi

राज्य | महाराष्ट्र |
ठिकाण | भारत |
राजधानी | मुंबई |
नियामक मंडळ | महाराष्ट्र विधानमंडळ |
कार्यकारी मंडळ | महाराष्ट्र विधानसभा |
अधिकृत भाषा | मराठी |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी (इसवी सन 2019 पासून) |
सरकार प्रमुख | उद्धव ठाकरे (इसवी सन 2019 पासून) |
महाराष्ट्र राज्याचे सरकार प्रमुख माननीय श्री. उद्धव ठाकरे हे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री आहेत. त्यापैकी 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्य मंत्री आहेत.
1. उद्धव ठाकरे (शिवसेना) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे एकोणिसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 14 मे 2020 रोजी उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.
खाते अधिकार – सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, वने व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
2. अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते आहे.
मतदारसंघ – बारामती
खाते अधिकार – वित्त, नियोजन उत्पादन शुल्क
3. अशोक चव्हाण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री आहेत.
4. एकनाथ शिंदे (शिवसेना) – महाराष्ट्र राज्यातील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री आहेत.
5. सुभाष देसाई (शिवसेना) – महाराष्ट्र राज्यातील उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा मंत्री आहेत.
6. जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आहेत.
7. छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आहेत.
8. बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत.
9. नितीन राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत.
10. दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत.
11. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य चे अधिकृत मंत्री आहेत.
12. विजय वडेट्टीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन, मदत व पुनर्वसन या विभागाचे मंत्री आहेत.
13.
14. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि कामगार मंत्री आहेत.
15. वर्षा गायकवाड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आहेत.
16. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत.
17. नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री आहेत.
18. राजेश टोपे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत.
19. सुनिल केदार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आहेत.
20. आदित्य ठाकरे (शिवसेना) – महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आहेत.
हा लेख जरूर वाचा – इसवी सन 1960 पासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री माहिती मराठी 2022 – mantrimandal maharashtra in marathi
21. गुलाबराव पाटील (शिवसेना) – महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत.
22. अमित देशमुख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत.
23. दादाजी दगडू भुसे (शिवसेना) – महाराष्ट्र राज्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री आहेत.
24. जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्यातील गृहनिर्माण मंत्री आहेत.
25. संदीपान भुंमरे (शिवसेना) – महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री आहेत.
26. बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री आहेत.
27. यशोमती ठाकुर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत.
28. अनिल परब (शिवसेना) – महाराष्ट्र राज्याचे परिवहन, संसदीय कार्य मंत्री आहेत.
29. उदय सामंत (शिवसेना) – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत.
30. के.सी. पाडवी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत.
31. शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आहेत.
32. अस्लम शेख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री आहेत.
महाराष्ट्र राज्यमंत्री माहिती मराठी 2022 – mantrimandal maharashtra in marathi
1. अब्दुल सत्तार (शिवसेना) – महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य ही खाते यांच्याकडे आहेत.
2. सतेज पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण ही खाते यांच्याकडे आहेत.
3. शम्भुराजे देसाई (शिवसेना) – गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन ही खाते यांच्याकडे आहेत.
4. बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष) – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार ही खाते यांच्याकडे आहेत.
5. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे आहेत.
6. आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क ही खाते यांच्याकडे आहेत.
7. संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य हे पाहतात.
8. प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन चे कार्य या सांभाळतात.
9. राजेंद्र श्यामगोंडा यड्रावकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत.
10. विश्वजीत कदम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा मंत्री आहेत.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022 – mantrimandal maharashtra in marathi मराठीमध्ये जाणून घेतली आहे.
यामध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात असणारे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री विषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात ?
देशाच्या मंत्रीमंडळाचे नेतृत्व पंतप्रधान करतात आणि प्रांतीय मंत्रीमंडळाचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात.
मंत्रिमंडळाचा कार्यकाळ किती आहे ?
मंत्रिमंडळाचा कार्यकाळ चार वर्षाचा असतो.
महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कोण आहेत ?
महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार हे आहेत.