लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी गीत (Marathi Abhiman Geet Lyrics)

Marathi Abhiman Geet Lyrics – सुरेश भट हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जातात. यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला, त्यामुळे सुरेश भट यांना गझलसम्राट संबोधिले जाते. मराठी अभिमान गीत मराठी (labhale amhas bhagya bolato marathi written by) कवी सुरेश भट यांनी लिहिले आणि कौशल इनामदार यांनी त्यास संगीत दिले आहे. कौशल इनामदार (kaushal inamdar) हे एक मराठी संगीतकार आहेत.

या पोस्टमध्ये आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी गीत (Marathi Abhiman Geet Lyrics) पाहणार आहोत.

तुम्हाला हेदेखील वाचायला आवडेलभारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी गीत (Marathi Abhiman Geet Lyrics)

Marathi Abhiman Geet Lyrics in marathi
गीत लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लेखक/कवीसुरेश भट
संगीतकारकौशल इनामदार
गाण्याचे स्वरूपमराठी अभिमान गीत
प्रकाशित 27 फेब्रुवारी 2010 (मराठी भाषा दिवशी)

तुम्हाला हेदेखील वाचायला आवडेलजय जय महाराष्ट्र माझा कविता (maharashtra geet lyrics in marathi)

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी 

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी... 

>> संगीतकार कौशल इनामदार यांनी मूळ कवितेमधील शेवटचे कडवे गाळले आहे. ते वरील कवितेत समाविष्ट करण्यात आले आहे.

मराठी अभिमानगीत वैशिष्ट माहिती मराठी (marathi abhiman geet features in marathi )

  • मराठी अभिमानगीताला 459 पेक्षा अधिक कलाकारांनी आपला आवाज बहाल केला आहे, असे एकमेव गाणे असावे.
  • मराठी अभिमानगीत या अल्बममध्ये ठाण्यात 27 फेब्रुवारी 2010 रोजी मराठी भाषा दिवशी प्रकाशित झाले.
  • मराठी अभिमानगीत हे 112 प्रथितयश गायक आणि गायिकांनी तसेच 356 समूहगायकांनी गायलेले गीत आहे.
  • मराठी अभिमान गीत हे मराठी गायकांनी आणि अमराठी एकत्रित गायकांनी गायलेले एकमेव गीत आहे.
  • मराठी 5 अभिमानगीत मुंबई, चेन्नई आणि ठाणे अशा 3 स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित केले आहे. या ध्वनिमुद्रणात 12 ध्वानिकी अभियंता आणि 65 वादकांचा सहभाग आहे.
  • अशा प्रकारे या गीतामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 2500 पेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी गीत (Marathi Abhiman Geet Lyrics) पाहिले आहे. मराठी अभिमान गीत (Labhale amhas bhagya bolato marathi lyrics) तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लेखक कोण आहेत ?

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लेखक सुरेश भट हे आहेत.

सुरेश भट कविता संग्रह नावे यादी

सुरेश भट कविता संग्रह नावे यादी पुढलप्रमाणे आहेत.
1. एल्गार
2. काफला
3. झंझावात
4. रंग माझा वेगळा
5. रसवंतीचा मुजरा
6. रूपगंधा
7. सप्‍तरंग
8. सुरेश भट – निवडक कविता
9. हिंडणारा सूर्य

Leave a Comment