Marathi Poem Kana By Kusumagraj – विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न मानले जाते, असे हे कवी कुसुमाग्रज. यांनी मराठी भाषेत कविता, कथा, कादंबर्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता केली.
मराठी भाषेच्या सौंदर्यात कुसुमाग्रजांनी मोलाची भर घातली. इसवी सन 1942 साली लिहिलेल्या विशाखा या काव्यसंग्रहाला मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव मानले जाते.
अशीच एक कुसुमाग्रजांची गाजलेली कविता म्हणजे कणा. अतिशय सुंदर आणि मनाला आधार देणारी ही कविता, नेहमी ऐकू वाटते.
या लेखातून आपण ओळखलत का सर मला मराठी कविता (Marathi Poem Kana By Kusumagraj) पाहणार आहोत. ही कविता कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील एक प्रसिद्ध कविता आहे.
Related – हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे शाळेतील प्रार्थना मराठी
ओळखलत का सर मला मराठी कविता (Marathi Poem Kana By Kusumagraj)

नाव | कणा |
प्रकार | मराठी कविता |
कवी | विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) |
साहित्याची भाषा | मराठी |
ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा!
कणा मराठी कविता अर्थ (Marathi Poem Kana By Kusumagraj)
Kana Kavita Marathi Meaning – कवी कुसुमाग्रज लिखित कणा या कवितेत, एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाला भेटण्यासाठी आला आहे. कवितेतून तो आपल्या सरांना सांगत आहे की, जोरदार झालेल्या पावसाने माझे घर पडले आहे.
इतकेच नाही तर, जे घरात होते, ते सर्व पाण्यामध्ये वाहून गेले आहे. मी आणि माझी बायको पुन्हा एका संसार थाटतो आहे.
हे ऐकतच, सर खिश्यात हात घालून पैसे देणार, इतक्यातच तो बोलतो की, सर मला पैसे नको आहे. मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करायला चाललो चाललो आहे. मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यासाठी तुम्ही मला पुन्हा लढण्यासाठी बळ द्या.
अशा प्रकारे त्या व्यक्तीचे पावसामुळे घर आणि घरात असणारे सर्व वस्तू, होते-नव्हते ते सारे वाहून गेले. पण तो इतक्या सहज हार न मानता, कसलीही चिंता किंवा कुणाच्या मदतीची अपेक्षा न करता, आपल्या जीवनाची नवी सुरुवात करण्याची हिंमत दाखवत आहे. यासाठी तो फक्त आशिर्वाद रुपी आपल्या सरांना लढण्यासाठी पाठबळ मागत आहे.
Related – कुसुमाग्रज प्रेम कविता मराठी
सारांश
मित्रांनो, कुसुमाग्रजांची कणा – ओळखलत का सर मला मराठी कविता (Marathi Poem Kana By Kusumagraj) खरंच मनाला आधार देणारी कविता आहे. बाकी, तुम्हाला ही कविता कशी वाटली, हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
आणि जाता जाता, जर तुमच्याकडे देखील मराठी कविता असतील, तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्या कविता तुमच्या नावासह या ब्लॉगवर प्रसिद्ध करू.