Maze baba poem in marathi – आपल्या भारतीय संस्कृती मध्ये फार पूर्वीपासून ते आपल्या पर्यंत काही संस्कार आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आपल्या मुलांना चांगली शिकवण देणे. ही चांगली शिकवण आणि संस्कार आई वडील आपल्या मुलांना देत असतात. त्यामुळे त्यांना देवासमान मानले जाते.
आई वडिलांवर अनेक साहित्य आणि कविता लिहिल्या आहेत, परंतु आई बद्दल जितकं लिहिलं गेलं त्यामानाने बापाला मात्र या कवितांच्या आणि साहित्यांचे जगात पोरका करून टाकलं.
आजच्या या कवितेमध्ये आपण वडील चारोळ्या पाहणार आहोत.
तो बाप असतो मराठी कविता – To baap asto marathi poem

लेकरांसाठी तो झटत असतो, संसारासाठी तो पेटत असतो
शेतामध्ये तो राबत असतो, परंतु एवढं सारं करून सुद्धा
त्यात त्याचा कुठलाच स्वार्थ नसतो…
कारण तो बाप असतो…
बाप आणि मुलगी कविता मराठी – Bap ani mulgi kavita marathi

छोट्या संकटाला चालते ती आई, पण वादळ झेलताना आठवतो तो बाप
बाबांची वेदना समजते त्याची लेक, म्हणूनच बाप लेकीचं नातं असतं नेक….
आकाशातला एक तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा
एक छोटीशी दुनिया आपलीच असावी, जिथे आपली मुलगी खूप पुढे जाताना दिसावी…
मुलगी म्हणजे मायेच पाखरू, सायचे तूप आणि लक्ष्मीचे रूप
जिवलगही खूप, दादाची आन आणि घराचा मान आईची परी आणि बाबांची राणी…
माझे बाबा कविता मराठी – Maze baba poem in marathi

विसरू नको रे आई बापाला, वेड्या मनाची वेडी माया
होईन मी मोठी शिकून शिकून, मारीन भरारी पाखरू होऊन
शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्याविना मला जन्माशी कोण घालणार
सांग ना ग आई मला कोण जपणार, होईल ग मी जेव्हा राजाची राणी
गाळू नको तुझ्या डोळ्यातलं पाणी, तुझ्याविना जन्माशी मला कोण घालणार
जाईन मी दूर दूर माझी आई रडणार….
जाईन मी दूर दूर माझे बाबा रडणार…
बाप आणि मुलगा कविता – Baap ani mulga kavita
बाबा यावरून काय लिहावे ? बाबा साठी काय लिहावे ?
तयार होतील खूप शब्द आईसाठी पण बाबांसाठी आहेत कुठे !
ते व्यक्त करण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे.
आई म्हणजे अंगणातील तुळस, पिता म्हणजे जीवनातील महत्व
तुझे जास्त सांगणारे होय पळस….
बाबा म्हणजे पहाटेची अंगावर, हसणारे कवळा मारलेली झोप
बाबा म्हणजे नवी सकाळी, आपल्या मुलांना सतत सावलीची
उन्हात देणारी झळाळी..
बाप चारोळी – Bap charoli
सलाम करते है उनको, बहुत शिकाया है हमको प्यार को दिया है सबको
भगवान सलामत रखे आपको, मिलते मिलते हसी वादियो मे खुशियों के फूल खिले
शुक्र हे उस भगवान का, जो आप जैसे पिता मिले लहानपणी आपला हात
वडिलांच्या हातात असतो, तर मोठेपणी वडिलांचा हात आपल्या हातात असतो
काळ बदलतो पण नातं नाही.
वडील म्हणाले मुलीला आमच्या वेळी बरे होते पाटी पुस्तकं अन् खडू शाळेत गुरुजीच पुरे होते
आता काही कळत नाही नोटबुक , टेक्सबुक इंग्रजी शाळेत शिकताना रिकामे होते पासबुक
प्रेमाच्या घट्ट धाग्यांनी इथे जुळतात नाती मायेच्या मऊ स्पर्शाने म्हणे घडतात मोती
बापाच्या हाताखाली मिळतात स्वप्नांना गती..
फादर डे निमित्त मराठी कविता – Father Day marathi poem
नेहमी तेवत ठेवतात ज्ञानज्योत, असंतो खूपच स्वाभिमानी धैर्य खचलेल्याना आणि चूक झालेल्यांना
दिव्य यशाची प्रेरणा रुजून देतो, तो बाप असतो प्रेमाने हात फिरवणारा, तो बाप असतो…
घराच अस्तित्व असतो बाप पण खंत 😞, सगळ्यांना वाटतो डोक्याला ताप
सर्वांवर असतो त्याचा धाक पण प्रेमाने हात फिरवणारा असतो तो बाप…
शेतकरी बाप कविता मराठी
शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो, अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर, काटा त्याच्याच का पाई त्यानं काय केलं पाप ?
माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप
बाप फोडतो लाकडं, माय पेटविते चुल्हा पिठामागल्या घामाची काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापाहाप !
कवी इंद्रजीत भालेराव
टीप – वरील कविता आणि चारोळी या विविध मार्गाने संग्रहित केलेले आहेत. येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील.
हे देखील वाचा – बाबा वर कविता | vadil marathi kavita
Originally posted on September 22, 2022 @ 2:55 pm
Pingback: राजा हरिश्चंद्र माहिती मराठी | Raja Harishchandra information in marathi - Pradnyan