MBOCWW म्हणजे काय ?

By | February 2, 2023

mbocww information in marathi – मित्रांनो, बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात. या कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एका कायदा निर्माण केला आहे.

या कायद्या-अंतर्गत राज्य सरकारने बांधकाम कामगार परिवाराचे जीवन सुधारावे या हेतूने पाऊल उचलले आहे. या लेखातून आपण MBOCWW full form, कार्य व उदिष्टे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

MBOCWW चा फुल फॉर्म काय आहे (mbocww long form in marathi)

MBOCWW चा फुल फॉर्म Maharashtra Building and other Construction Worker’s Welfare Board असा आहे आणि याला मराठीत भाषेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ असे म्हणतात.

ही बांधकाम कामगारांसाठी कार्यरत असणारी मोठी संस्था (labour welfare organisation) आहे. ही संस्था इमारत तसेच इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी सुविधा व सरकारी योजनांचा प्रदान करते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ (mbocww information in marathi)

mbocww information in marathi

भारत सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी 1996 मध्ये रोजगार व सेवाशर्ती नियमन अंतर्गत सर्व बांधकाम कामगार यांची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण व्हावे, यासाठी एक कायदा निर्माण केला.

या कायद्यानुसार प्रत्येक राज्याने सर्व बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने देखील बांधकाम कामगार कायदा 2007 स्थापन केला.

या कायद्यानुसार मंडळातील सदस्यांमध्ये शासन, मालक आणि कामगार यांचे प्रत्येकी 3 प्रतिनिधी असतात. यापैकीच एक अध्यक्ष असतो. या सर्व जणांचा तीन वर्षाचा कार्यकाळ असतो.

MBOCWW मध्ये अधिनियम 2011, 2015 व 2018 अनुसार मंडळाची पुनर्रर्रचना करण्यात आली आहे. यानुसार या मंडळात 11 सदस्य आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्य (mbocww marathi mahiti)

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ दुर्घटनेच्या बाबतीत लाभार्थीला तत्काळ सहाय्य प्रदान करते. तसेच 60 वर्षे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना निवतीवेतन प्रदान करते.

एक ठराविक रक्कम अटी व शर्तीं निर्धारित करून घर बांधण्यासाठी लाभार्थीला कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूरी करून देतात.

बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निर्धारित आर्थिक सहाय्य देणे. तसेच महिला लाभार्थ्यांना मातृत्व लाभ प्रदान करणे.

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना आखणे, सादर करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ करते.

बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी ( how to fill Mbocww Kamgar Nondani Form Online Marathi)

नावमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ
प्रकारराज्य सरकारचा कायदा
लाभार्थीइमारत व इतर बांधकाम कामगार
अधिकृत संकेतस्थळ mahabocw.in

बांधकाम कामगार नोंदणी ही बांधकाम मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर करता येते. तसेच बांधकाम होत असलेल्या ठिकाणी MBOCWW अंतर्गत कामगार नोंदणी कॅम्प राबविले जातात येथेही तुम्ही नोंदणी करू शकता.

कामगार नोंदणी करण्यासाठी कामगारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. तसेच ज्या कामगाराने मागील 12 महिन्यांमध्ये कमीत कमी 90 पेक्षा जास्त दिवस काम केले असेल तो नोंदणीसाठी पात्र असतो.

यासाठी तुमच्याजवळ वयाचा पुरावा, 90 दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ओळखपत्र पुरावा, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो पाहिजे.

वरील कागदपत्रे व फोटो सहित कामगार नोंदणी कॅम्पमध्ये जाऊन नोंदणी करू शकता. जर तुमच्या जवळ कॅम्प नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. ते पुढीलप्रमाणे,

Step 1 – कामगार नोंदणी करण्यासाठी MBOCWW च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कामगार नोंदणी हा पर्याय निवडा.

Step 2 – आता तुमच्या समोर एक फॉर्म येईल त्यावर तुमची जन्मतारीख, आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर टाकून व्हेरिफकेशन करून घ्या.

Step 3 – यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती अचूकतेने भरा. यानंतर तुमच्या बचत खाते विषयी माहिती भरा.

Step 4 – आता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यानंतर अर्ज जमा करा. अर्ज व्यवस्थितपणे जमा केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक reference number येईल.

या reference number वरून तुम्ही कामगार नोंदणी अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

सारांश

आशा करतो की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळविषयीची माहिती (mbocww information in marathi) तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

सरकारी योजना व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.

धन्यवाद ….

पुढील वाचन :

  1. सातबाराचा उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा ?
  2. माहितीचा अधिकार कसा वापरावा ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *