MDM App Maharashtra – नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार ही केंद्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो.
या योजनेअंतर्गत लागणाऱ्या गोष्टी, जसे की तांदूळ, पालेभाज्या, धान्य वस्तू, आहार तयार करण्यासाठी लागणारे इंधन, वाहतूक खर्च आणि आहार बनवण्यासाठी Cooking Cost इत्यादी. केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी बनवण्यासाठी MDM Application वापर करावा लागतो.
या लेखातून आपण MDM App Maharashtra हा अनुप्रयोग डाऊनलोड करून कसा वापरायचा, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
MDM App Maharashtra Download कसा करायचा ?
विषय | MDM App |
प्रकार | सॉफ्टवेअर |
नियंत्रण | राज्य सरकार |
पुरस्कृत | केंद्र सरकार |
वापर | शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी बनवण्यासाठी |
Step 1 – प्रथम तुमच्या Android मोबाईल मधील chrome browser उघडा. (तुमच्याकडे असेल ते browser वापरले तरी चालेल)
Step 2 – यानंतर http://education.maharashtra.gov.in/mdm/ या लिंक वर क्लिक करा.

Step 3 – आता तुमच्या स्क्रीनवर शालेय पोषण आहाराचे पोर्टल दिसू लागेल, यामध्ये डाऊनलोड पर्यायातून MDM अनुप्रयोग यावर क्लिक करा. यानंतर तुमचे application ऑटोमॅटिक डाऊनलोड होईल.
Step 4 – आता download झालेली APK file, मोबाईलमध्ये इंस्टॉल करून घ्या. (हे application फक्त अँड्रॉइड ऑपरेशन सिस्टीम वरच चालते)
MDM application registration कसे करायचे?

Step 1 – सर्वप्रथम तुम्ही इंस्टॉल केलेले MDM App उघडून त्यात शाळेचा uDISE code आणि सरल प्रणालीवर नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक टाकून रजिस्टर करा.
Step 2 – जर तुम्हाला रजिस्टर करताना Sending Message Failed असा error येत असल्यास, पुढील स्टेप फॉलो करा.
Step 3 – सर्वप्रथम http://education.maharashtra.gov.in/ या लिंकवर जाऊन MDM Login या पर्यायावर क्लिक करून शाळेचा सरल प्रणालीचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
Step 4 – पोर्टल लॉगिन झाल्यावर पेजवरील App Settings या पर्यायावर क्लिक करा.
Step 5 – आता तुमच्यासमोर सर्व मोबाईल क्रमांकाची लिस्ट दिसू लागेल, यातून तुमचा मोबाईल क्रमांक निवडून त्यासमोरील Change Device हा पर्याय निवडा आणि Save या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्या अँड्रॉइड फोनला स्विच ऑफ करून पुन्हा चालू करा. आणि वर सांगितल्याप्रमाणे शाळेचा uDISE code आणि सरल प्रणालीवर असलेला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून रजिस्टर करा.
तुमचे MDM Maharashtra App चालू होईल, जर वरील पद्धत वापरून काही अडचण येत असल्यास MDM Exucative ला संपर्क करा.
सारांश
आशा करतो की, तुम्हाला MDM App Maharashtra डाऊनलोड आणि लॉगिन कसा करायचा, याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.