संस्कृत भाषेतील खंडकाव्य – मेघदूत मराठी अनुवाद

Meghdoot kalidas marathi pdf download – मेघदूत हे महाकाव्य कवी कालिदासाने लिहिले आहे. हे एक खंडकाव्य असून, पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत काव्य आधारले आहे.

मेघदूत हे संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. कुसुमाग्रज, वसंत पटवर्धन यांसहित अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भाषांतर केले आहे.

हा लेख जरूर वाचाप्रसिद्ध मराठी नाटक माहिती (old marathi natak name list)

मेघदूत मराठी माहिती (meghdoot information in marathi)

Meghdoot kalidas marathi pdf download
पुस्तकाचे नावमेघदूत
लेखकाचे नावकालिदास
भाषासंस्कृत
रचनाकाळइसवी सन 4 ते 6 शतक
स्वरूपपत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर आधारित
मेघदूत कथा सूत्र मराठी

मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्ष हा कुबेराचा एक सेवक होता.

आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली.

हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला ‘रामगिरी’ पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला.

तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या. त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही.

त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून आपल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले.

प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणाऱ्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली.

येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात आली आहे.

हा लेख जरूर वाचामराठीतील कवी आणि साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी (marathi writers name list in marathi)

मेघदूत मराठी अनुवाद (Meghdoot kalidas marathi pdf download)

पुस्तकमेघदूत
मराठी अनुवाद लेखकश्री. श्याम कुलकर्णी
प्रकाशकई साहित्य प्रतिष्ठान
PDF creditई साहित्य प्रतिष्ठान

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

मेघदूत हे महाकाव्य कोणी लिहिले?

मेघदूत हे महाकाव्य कवी कालिदास यांनी लिहिले.

महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या दोन नाटकांची नावे लिहा.

रघुवंश व कुमारसंभव ही महाकाव्ये, ऋतुसंहार व मेघदूत ही खंडकाव्ये आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतल ही नाटके महाकवी कालिदास यांनी लिहिली.

कवी कालिदास यांचे स्मारक कोठे आहे ?

रामटेकच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कालिदासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे.

Leave a Comment