Mica Information In Marathi – अभ्रक हे एक सिलिकेट खनिज आहे. जगातील अभ्रकाच्या उत्पादनापैकी भारत देशात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भारतातून इतर देशात अभ्रकाची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. या खनिजात विविध प्रकारच्या विशेषतः आढळतात यामुळे याचा वापर अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो.
या लेखात आपण अभ्रक खनिज माहिती मराठी (mica information in marathi) याविषयी जाणून घेणार आहोत. यात आपण अभ्रकाचे विविध प्रकार, त्यांचे उपयोग, गुणधर्म सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
इलेक्ट्रिक विद्युत उपकरणे, सौदर्य प्रसाधने आणि रंगाच्या उत्पादनांमध्ये अभ्रकाचा उपयोग होतो, याबद्दल अधिक माहिती आपण या लेखात समजून घेऊया.
अभ्रक खनिज माहिती मराठी (Mica Information In Marathi)

नाव | अभ्रक (mica) |
वर्ग | सिलिकेट खनिज |
प्रकार | रुबी अभ्रक (Ruby Mica) मस्कोव्हाइट (Muscovite) बायोटाइट (Biotite) |
उत्पादन | भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका |
उपयोग | इलेक्ट्रिक विद्युत उपकरणे सौदर्य प्रसाधने रंगाच्या उत्पादन तयार करण्यासाठी |
अभ्रक हा एक सिलिकेट खनिज आहे. लहान-लहान तुकड्यांमध्ये याचे भाग खाणीतून मिळतात. या तुकड्यांमध्ये मोठा विद्युत प्रवाह सहन करण्याची क्षमता असते. यासाठी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अभ्रकाला मागणी आहे.
भस्म हा प्रकार तुम्हाला माहीत असेलच, भस्म म्हणजे पवित्र राख. ही राख एखाद्या धुनी, होम यज्ञातील विशिष्ट लाकूड, तुप,औषधी वनस्पती आणि पवित्र गोष्टीपासून तयार करण्यात येते. भारतीय संस्कृतीमध्ये भस्म कपाळावर लावणे हे सामान्यपणे दिसून येते. अभ्रकाचा वापर करून भस्म बनवण्यात येते. तसेच औषधी वनस्पती म्हणून याचा उपयोग करण्यात येतो.
जगातील एकूण उत्पादनापैकी सर्वात जास्त उत्पादन भारत देशात घेतले जाते. त्यानंतर ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशात घेतले जाते. तर युनिटेड किंगडम, संयुक्त राज्य अमेरिका, रुस आणि युरोप या देशात अभ्रकाची प्रचंड मागणी आहे.
Related – लोखंडाची माहिती मराठी
अभ्रकाचे प्रकार माहिती मराठी (Mica Types Information In Marathi)
अभ्रकाचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत. ज्यामध्ये लेपिडोलाइट अभ्रक (Lepidolite Mica), मस्कोव्हाइट (Muscovite), बायोटाइट (Biotite),मॅग्नेशियम अभ्रक (Phlogopite) याचा समावेश होतो.
लेपिडोलाइट अभ्रक माहिती मराठी (Lepidolite Mica information in marathi) – याचा रंग गुलाबी, हलका जांभळा, जांभळा, गुलाब-लाल, जांभळा-राखाडी, पिवळसर, पांढरा, रंगहीन असतो. रुबिडियम आणि सीझियम या दुर्मिळ अल्कली धातूंचे हे प्रमुख स्त्रोत आहे .
मस्कोव्हाइट माहिती मराठी (Muscovite information in marathi) – याचा रंग पांढरा, राखाडी, चांदी या रंगाचा असतो. याला पोटॅश अभ्रक म्हणून देखील ओळखले जाते. याचा उपयोग सौदर्य प्रसाधनात केला जातो.
बायोटाइट माहिती मराठी (Biotite information in marathi) – याचा रंग गडद तपकिरी, हिरवट-तपकिरी, काळा-तपकिरी, पिवळा असतो. याला मोल सुधा म्हंटले जाते.
मॅग्नेशियम अभ्रक माहिती मराठी (Phlogopite information in marathi) – याचा रंग तपकिरी, तपकिरी लाल, गडद तपकिरी, पिवळा, पिवळसर तपकिरी, हिरवा, पांढरा आणि राखाडी रंगाचा असतो.
Related – दगडी कोळसा माहिती मराठी
अभ्रकाचे उत्पादन माहिती मराठी (mica production in marathi)
जगातील एकूण उत्पादनापैकी सर्वात जास्त उत्पादन भारत देशात घेतले जाते. त्यानंतर ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशात घेतले जाते.
भारतात सर्वात जास्त उत्पादन आंध्र प्रदेश या राज्यात घेतले जाते. त्यानंतर राजस्थान आणि उडीसा या राज्यात उत्पादन घेतले जाते.
भारतात मिळणाऱ्या रुबी अभ्रकाच्या उत्पादनापैकी बिहार राज्यात नवादा या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
भारतातील अभ्रक खनिजांच्या खाणी पुढीप्रमाणे आहेत.
खाण | राज्य |
---|---|
कोडर्मा | झारखंड |
गिरिडीह | झारखंड |
चाकल | उत्तर प्रदेश |
सिंगूर | पश्चिम बंगाल |
मुंगेर | बिहार |
नेल्लोर | आंध्र प्रदेश |
गुंटूर | आंध्र प्रदेश |
उदयपुर | राजस्थान |
भीलवाड़ा | राजस्थान |
अजमेर | राजस्थान |
अभ्रक गुणधर्म माहिती मराठी (Mica Properties Information In Marathi)
- अभ्रक हे सर्वच रसायने, आम्ल, वायू, अल्कली आणि तेल यासारख्या जवळजवळ सर्व माध्यमांना प्रतिकार करू शकते.
- मीका अर्धपारदर्शक आहे.
- मीका अत्यंत कठीण आहे, उच्च तन्य शक्ती, लवचिक आहे. यात प्रचंड कॉम्प्रेशन पॉवर असते आणि ते मशीनिंग, डाय-पंच किंवा हात कापले जाऊ शकते.
- अभ्रक अग्निरोधक आणि ज्वलनशील आहे. ते 1000 अंश सेल्सिअस तापमानाला देखील प्रतिकार करू शकते.
- हे खनिज पारदर्शक आणि चमकदार आहे.
- अभ्रक विविध प्रकारच्या आजारावर गुणकारी उपचार म्हणून वापरले जाऊ शकते.
- हा उष्णतेचा चांगला वाहक आणि विजेचा खराब वाहक आहे.
अभ्रकाचे उपयोग माहिती मराठी (Mica Mineral Uses In Marathi)
- विद्युत उपकरणे, रेडिओ, विमान, औषध, अग्निरोधक कपडे, टेलिफोन, डोळ्यांचे संरक्षण करणारे चष्मे इत्यादी बनवण्यासाठी अभ्रकचा प्रामुख्यानं वापर केला जातो.
- पारदर्शक आणि चमकदार गुणधर्म असल्याने त्याचा वापर रंग बनवण्यासाठी केला जातो.
- कंडेन्सर, कम्युटेटर, टेलिफोन, डायनॅमो इत्यादींमध्ये अभ्रक वापरला जातो.
- दिव्याची चिमणी, स्टोव्ह, भट्टी याच्या निर्मितीमध्ये याचा उपयोग होतो.
- रबर उद्योगात तसेच मशीनमध्ये वंगण घालण्यासाठी आणि तराजूच्या सजावटीसाठी देखील हे वापरले जाते.
- वारा मोजणारी यंत्रे जसे की पवनचक्की आणि उत्तम दर्जाचे आरसे याच्या मदतीने बनवतात.
भट्टीत अग्निरोधक प्लास्टरिंगसाठी याचा वापर केला जातो. तसेच रंगहीन पारदर्शक कागद, विविध प्रकारची खेळणी, रंगमंचाच्या पडद्यांची सजावट आणि चमकदार रंगाचे रंगही अभ्रकाच्या मदतीने बनविले जातात.
अभ्रक भस्म हे आयुर्वेद औषधीतील एक अतिशय लोकप्रिय औषध आहे, ज्याचा उपयोग क्षयरोग, प्रमेहा, दगड इत्यादी रोगांच्या निदानासाठी करण्यात येतो.
Related – भारतातील खनिज तेल माहिती मराठी
सारांश
या लेखात आपण अभ्रक खनिजाची माहिती (Mica Information In Marathi) जाणून घेतली. यात आपण अभ्रक खनिजांच्या खाणी, प्रकार, गुणधर्म आणि उपयोग (Mica Information In Marathi) याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अभ्रक म्हणजे काय मराठी अर्थ
अभ्रक हे एक सिलिकेट खनिज आहे. याचा वापर इलेक्ट्रिक विद्युत उपकरणे , सौदर्य प्रसाधने आणि रंगाच्या उत्पादनांमध्ये केला जातो.
अभ्रक खाणी कोणत्या राज्यात आहे ?
अभ्रकाच्या खाणी प्रामुख्याने झारखंड आणि बिहार या दोन राज्यात आहेत.
अभ्रकाचे किती प्रकार आहेत ?
अभ्रकाचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत. ज्यामध्ये लेपिडोलाइट अभ्रक (Lepidolite Mica), मस्कोव्हाइट (Muscovite), बायोटाइट (Biotite),मॅग्नेशियम अभ्रक (Phlogopite) याचा समावेश होतो.