MIDC Full form in marathi – मित्रांनो, आपण एमआयडीसी हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतो, वाचतो आणि वापरतो. अश्या वेळी आपल्याला प्रश्न पडतो, एमआयडीसी म्हणजे नक्की काय काय ? या एमआयडीसी चे कामकाज कोण पाहत असेल ?
याव्यतिरक्त महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी मित्र एमआयडीसी मध्ये ऑफिसर आणि इतर कामाचे स्वप्न पाहतात.
आजच्या या लेखामध्ये आपण एमआयडीसी फुल्ल फॉर्म मराठी माहिती – midc full form in marathi आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ माहिती मराठी (midc information in marathi) जाणून घेणार आहोत.
एमआयडीसी फुल्ल फॉर्म मराठी माहिती – midc full form in marathi

एमआयडीसीचा फुल्ल फॉर्म महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे. ही एक सरकारी संस्था आहे. याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात उद्योगांची वाढ व्हावी आणि त्यातून महाराष्ट्र राज्य संपन्न व्हावे अशी आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मराठी माहिती
महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे आणि मुंबई पुणे यासारख्या मोठ्या औद्योगीक क्षेत्रातील उद्योगांचे विकीरण व्हावे, अश्या दोन हेतूने 1 ऑगस्ट 1962 या दिवशी महाराष्ट्र सरकारने औद्योगिक विकास महामंडळ सुरू केले.
एमआयडीसी चे कामकाज
खते, औषधे, ट्रक, स्कूटर, सायकली, घड्याळे, दूध शीतकरणाची इलेक्ट्रॉनिकीय उत्पादने, अन्नपदार्थ, शीतपेये, पशुखाद्ये, ओतशाळा अश्या विविध लहानमोठ्या उद्योगधंद्यांची एमआयडीसीव्दारे उभारणी केली जाते.
कारखान्यांसाठी आवश्यक असे प्लॉट पाडणे त्याचबरोबर छपऱ्या बांधणे, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, नि:सृत पाण्याची विल्हेवाट करणे या सुविधा उपलब्ध करून देणे.
बॅंका, डाकघरे, दूरध्वनी या सोयी उपलब्ध करणे या प्रकारे औद्योगिक क्षेत्रांचा विकास केला जातो.
लघुउद्योग विकास करण्यासाठी एमआयडीसी विशेष मदत पुरवते.
औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधणे, औद्योगिक व नागरी विकाससाठी मोठ्या पाणी पुरवठा योजना सुरू करणे आणि सरकारी व निमसरकारी अभिकरणांसाठी ठेव अभिदान तत्वावर प्रकल्प बांधणे अशी कामे एमआयडीसी करते.
औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट साधारण 99 वर्षाचा करारावर दिले जाते.
एका वर्षात कारखान्याच्या उभारणीला सुरुवात व दोन वर्षांत ती पुरी व्हावी, असा सर्वसाधारण नियम आहे.
स्वयं-सेवा योजनेला विकास व्हावा यासाठी तंत्रज्ञ, अभियंते वगैरेंना भाडे-खरेदी पध्दतीवर प्लॉट दिले जातात.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन शासकीय सदस्य, राज्याचे वीज मंडळ, वित्तीय महामंडळ, उद्योग व गुंतवणूक महामंडळ आणि गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे ज्येष्ठ अधिकारी, सहा नामनिर्देशित सदस्य व महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा 15 सदस्यांच्या संचालक मंडळाकडे एमआयडीसीचे व्यवस्थापन आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मंत्री कोण आहेत ?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मंत्री सुभाष देसाई आहेत.
भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाली ?
भारतात पहिले औद्योगिक धोरण 1916 साली स्थापन झाली.
भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना कधी झाली ?
भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना 1 जुलै 1964 या वेळी झाली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापना कधी झाली ?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली.
हे देखील वाचा
- सावंतवाडी मराठी माहिती – sawantwadi information in marathi
- मोहरी मराठी माहिती – mustard in marathi
- दिशा निर्देश मराठी माहिती – direction information in marathi
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये एमआयडीसी फुल्ल फॉर्म मराठी माहिती – midc full form in marathi जाणून घेतली.
त्याचबरोबर या लेखात आपण एमआयडीसी फुल्ल फॉर्म मराठी माहितीमध्ये एमआयडीसी मराठी माहिती, एनआयडीसी चे कामकाज, एमआयडीसी बद्दल इतर मराठी माहिती पाहिली आहे.
एमआयडीसी फुल्ल फॉर्म मराठी माहिती – midc full form in marathi हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला एमआयडीसी मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.