पैसा म्हणजे काय माहिती मराठी (money information in marathi)

money information in marathi – दररोजच्या जीवनात आपण सर्वजण पैशाचा वापर करतो, त्यामुळे पैसा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पैसा मिळवण्यासाठी सर्वच लोक धडपड करत असतात. सध्याच्या युगात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

पैसा आपल्या ओळखीचा असूनसुद्धा आपण पैशाची व्याख्या व्यवस्थित करत नाहीत. बहुतांश लोक पैसा म्हणजे रुपये किंवा डॉलर आहे असं म्हणतील. पैसा म्हणजे रुपये हे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने दिलेले उत्तर आहे. पण वास्तविक पाहता पैसा म्हणजे रुपये नसून, पैसा हे विनिमयाचे माध्यम म्हणून काम करणारे सर्वमान्य असणारी कोणतीही वस्तू होय. रुपये, डॉलर यांना पैशाला मोजण्यासाठी असणारी परिमाणे म्हणून ओळखले जाते.

या लेखात आपण पैसा म्हणजे काय माहिती मराठी (money information in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण पैशाच्या विविध व्याख्या, पैशाचे महत्व आणि कार्य याविषयी माहिती मराठी जाणून घेणार आहोत.

पैसा मराठी माहिती (money information in marathi)

money information in marathi
विषयपैसा
प्रकारविनिमयाचे माध्यम
वापरसेवा आणि वस्तू यांचा विनिमय करण्यासाठी आणि संपत्ती साठवणूक करण्यासाठी
अस्तित्वात5,000 ख्रिस्तपूर्व

पैशाचे मूल्य पैशाच्या खरेदीशक्तीवर अवलंबून असते. वस्तू महाग झाल्या म्हणजे पैशाची खरेदी शक्ती कमी झाली.

पैशाचे व्यवहार करण्यासाठी माध्यम म्हणून प्रत्येक देश चलनी नोटा किंवा नाणे तयार केले जाते. प्रत्येक देशाचे वेगवेगळे चलन असले तरीदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पैश्याचे समतुल्य किंमत राहावी म्हणून प्रमाप नाणे बनवले जाते.

चलन म्हणजे मध्यवर्ती बँकेने निर्गमित व नियंत्रीत केलेला सामान्य स्वीकृती असलेला पैसा होय. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकेकडे आहे. कागदी चलन विषयक कायदा इसवी सन 1861 मध्ये करण्यात आला.

हा लेख जरूर वाचाई-कॉमर्स माहिती मराठी (ecommerce information in marathi)

पैश्याची व्याख्या माहिती मराठी (money definition in marathi)

money definition in marathi – पैशाची व्याख्या आणि अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. त्यापैकी आपण प्राध्यापक डब्ल्यू.टी. न्यूलयन आणि क्राऊथर यांनी पैशाविषयी केलेल्या व्याख्या पाहणार आहोत.

विनिमयाचे माध्यम म्हणून काम करणारी सर्वमान्य असणारी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय.

– प्राध्यापक डब्ल्यू.टी. न्यूलयन

विनिमयाचे माध्यम म्हणून त्याचबरोबर संपत्ती साठवण्याचे साधन म्हणून जी कोणती वस्तू स्विकारली जात असेल ती वस्तू म्हणजे पैसा होय.

– क्राऊथर

पैशाचे प्रकार माहिती मराठी (types of money in marathi)

प्रत्येक देशाचे स्वतंत्र असे एक चलन असते. या चलनानुसार देशातील व्यवहार सुरळीतपणे चालू असतात. आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी डॉलर या अमेरिकन चलनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

कागदी चलन (currency notes), नाणे (coin) आणि आभासी चलन (cryptocurrency or virtual currency) असे पैश्याचे प्रमुख प्रकार पडतात.

कागदी पैसाधातूची नाणी
कागद यापासून तयार केलेल्या नोटा असतात. सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल अश्या धातूंपासून हे नाणी तयार केले जातात.
हा तुलनेने अधिक वहनीय व कमी टिकाऊ आहे.हा तुलनेने कमी वहनीय व जास्त टिकाऊ आहे.
उदाहरणार्थ. शंभर रुपयांची भारतीय नोटउदाहरणार्थ. भारतीय दहा रुपयांचे नाणे
कागदी पैसा आणि धातूची नाणी फरक (difference between paper money and coins)

पैशाची कार्य माहिती मराठी (functions of money in economics marathi mahiti)

what are the functions of money information in marathi – दैनंदिन जीवन जगत असताना मूलभूत गरजा पासून अगदी चैनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैश्याची आपल्याला गरज भासते. त्यामुळे पैसा देखील मानवी गरजामध्ये मूलभूत गरज म्हणून बनत चालली आहे.

पैशाची प्राथमिक कार्य व्यवहारात मध्यस्त, वस्तूचे मूल्यमापन, परिमाण आणि संपत्ती साठवणूक करणे हे आहेत.

विनिमय (medium of exchange in marathi) – पैशाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याला सर्व लोक स्वीकारत असतात. कोणतीही वस्तू किंवा सेवा पैसे देऊन मिळवता येते. अर्थात की पैसा हा विनिमय माध्यम म्हणून काम करतो. पूर्वी विनिमयाचे माध्यम म्हणून लोक आपल्याजवळ असलेली वस्तू देऊन हवी ती वस्तू मिळवत असे. उदाहरणार्थ. एका शेतकऱ्याने गहू केले आणि दुसऱ्या शेतकऱ्याने बाजरी केली. पहिल्या शेतकऱ्याला जर बाजरी हवी असेल तर तो दुसऱ्या शेतकऱ्याला गहू देऊन त्याबदल्यात बाजरी मिळवत असे.

पैशाच्या वापरामुळे व्यवहार लवकर आणि सुरळीतपणे पूर्ण होतात. तसेच पैसा लहान घटकात विभागात येतो येतो, त्यामुळेदेखील व्यवहार सहजतेने पूर्ण होतात.

वस्तूचे मूल्यमापन (evaluation of goods and services in marathi) कोणत्याही वस्तूचे मूल्यमापन पैश्यात करता येते, त्यामुळे व्यवहार जलद रित्या पूर्ण होतात. जर पैसे अस्तित्वात नसते तर पूर्वीप्रमाणेच प्रत्येक वस्तूची किंमत इतर वस्तू मधेच करावी लागली असती. व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी किंमत ठरवण्याचे काम पैशामुळे चांगल्या प्रकारे होते.

संपत्तीचे साठवण (Asset storage in marathi) पूर्वी पैसा अस्तित्वात नसताना वस्तू साठवून ठेवावे लागत असे. बहुतेक वस्तू नाशवंत असल्याने त्याची किंमत कमी होत असे. साठवलेल्या वस्तुंचे रक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी लागत असे. पैशाच्या वापराने संपत्तीचे साठवणूक करणे सोपे झाले आहे. पैसा नाशवंत नाही तसेच चलनी नोटा, बँकेच्या ठेवी किंवा इतर स्वरूपात पैसा साठवता येतो. पतसंस्था आणि बँक पैसे साठवण्यासाठी व्याज देतात त्यामुळे संपत्ती वाढवण्यास मदत होते.

पैसा नसेल तर कोणताही व्यवसाय करताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे भांडवल (money capital) स्वरूपात मोलाची कामगिरी बजावतो.

पैशाच्या वापराने खरेदी-विक्रीचे व्यवहार (buy and sell transaction) जलद आणि सहज होत आहे. पैशांच्या मदतीने सर्व प्रकारच्या मालमत्तेचे पैशात रूपांतर करणे सोपे झाले आहे. पैशाच्या बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत करणे सोपे झाले आहे.

हा लेख जरूर वाचाअर्थशास्त्राची व्याख्या मराठी (economics definition in marathi)

सारांश

आपण या लेखामध्ये पैसा म्हणजे काय माहिती मराठी (money information in marathi) जाणून घेतली आहे. यात आपण पैश्याचे प्रकार आणि पैश्याचे महत्व जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पैशाबद्दल माहिती मराठी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पतपैसा म्हणजे काय ?

पतपैसा याला इंग्रजीमध्ये क्रेडिट मनी म्हणतात. क्रेडिट मनी याला आपण क्रेडिट कार्ड म्हणून ओळखतो. आपल्या गरजेनुसार कर्जाच्या स्वरूपात व्यक्तीला अथवा संस्थेला क्रेडिट मनी द्वारे पैसे दिले जाते. यानंतर ठराविक कालावधीत क्रेडिट मनीद्वारे दिलेले पैसे परत जमा करावे लागतात.

वस्तू पैसा म्हणजे काय ?

वस्तू पैसा हा पैशाचा घटक मानला जातो. कोणत्याही वस्तूचे पैशाच्या स्वरूपात मूल्यमापन करता येते. वस्तू पैसा यालाच संपत्ती सुद्धा म्हटले जाते.

विनिमय म्हणजे काय ?

वस्तूंची अथवा सेवांची आर्थिक स्वरूपाची देवाणघेवाण करणे म्हणजे विनिमय होय.

वस्तुविनिमय म्हणजे काय ?

वस्तू आणि सेवा मिळवण्यासाठी इतर वस्तूंची केलेली देवाणघेवाण म्हणजे वस्तुविनिमय होय.

जे एम केन्स यांनी कोणता सिद्धांत मांडला ?

उत्पन्न जसजसे वाढत जाते, तसतशी उपभोग प्रवृत्ती कमी होत जाते. असा सिद्धांत जे एम केन्स यांनी मांडला.

Leave a Comment