मुंगूस या प्राण्याची माहिती मराठी

mongoose information in marathi – प्राण्यांच्या राज्यात एकापेक्षा एक सरस प्राणी आहेत. यातील प्रत्येक प्राण्याची एक विशेषतः आहे ज्यावर तो आपला उदरनिर्वाह चालवत असतो. जसे की साप, प्राण्यांच्या साम्राज्यात असलेला सर्वोच्च भक्षक म्हणजे साप होय.

सापाची विशेषतः म्हणजे तो स्वतःचे विष भक्ष्यामध्ये सोडतो त्यामुळे काही वेळात भक्ष्य मरतो. अशा सापाच्या विषामुळे दरवर्षी हजारो लोक मरतात. माणूस आणि इतर प्राणी देखील सापाच्या वाटेला सहसा जात नाहीत. याला अपवाद म्हणजे मुंगूस.

मुंगूस एक अत्यंत चपळ प्राणी असून याची ओळख सापाचा शिकारी म्हणून केली जाते. यामुळेच तर जेथे जास्त मुंगूस असतील तिथे साप पाहायला मिळत नाहीत. भारतात तर मुंगूसाला एक शुभ प्राणी मानले जाते.

या लेखातून आपण मुंगूस या प्राण्याची माहिती मराठी (mongoose information in marathi) जाणून घेणार आहोत.

मुंगूस या प्राण्याची माहिती मराठी (mongoose information in marathi)

mongoose information in marath
नावमुंगूस (mongoose)
प्रकारसस्तन प्राणी
शास्त्रीय नावहर्पिस्टिस एडवर्डसी
भक्षक प्रकारमांसाहारी
प्रमुख भक्षकिडे, सरडे, पक्षी व अंडी, कृंतक, साप आणि मृत प्राणी
आढळदक्षिण युरेशिया व मुख्य आफ्रिका

मुंगूस हा प्राणी साधारणपणे दक्षिण युरेशिया व मुख्य आफ्रिका खंडात आढळतो. हा मुख्यतः एक मांसभक्षक प्राणी आहे. किडे, सरडे, पक्षी व अंडी, कृंतक, साप आणि मृत प्राण्यांवर तो आपली उपजीविका करत असतो.

मुंगूसाच्या प्रजातीचे अनेक प्रकार आहेत. आफ्रिका, आशिया आणि यूरोप खंडात मिळून 33 जाती आढळतात. यातील बऱ्याच जाती आफ्रिकेत आढळतात. भारतीय उपखंडात त्यांच्या सहा जाती आढळतात.

या प्रकारानुसार त्यांच्यात विविधता असली तरीदेखील सर्व प्रजातीतील मुंगूसाचे कातडे जाड असतात. चपळता आणि जाड कातडे असल्यामुळे सापाला हरविणे मुंगूसाला सहज शक्य होते. यामुळे भारतात अनेक ठिकाणी नाग आणि इतर विषारी सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून मुंगूस प्राणी पाळली जातात.

भारतातील मुंगसाच्या शरीराची लांबी 34 ते 45 सेंमी इतकी असते. याची शेपटी शरीराएवढीच लांब असते. यांच्या शरीराचा रंग पिवळसर तपकिरी असतो. तोंड निमुळते, कान लहान आणि पाय आखूड, अतिशय तीक्ष्ण असे दात आणि पंजे, अतिशय अंगावर केस असतात.

नर हा मादीपेक्षा आकाराने मोठा असतो. हा प्राणी गावातील पडक्या वास्तूत, मोकळ्या जागांत, माळरानावर, गवताळ जागी, झुडपांमध्ये किंवा रानात एकेकटे किंवा तीन-चारांच्या गटात आढळतात.

जंगली प्राणी मुंगूस माहिती मराठी (mungus in marathi)

मुंगूस या प्राण्याची माहिती मराठी

मुंगूस प्राणी स्वत: तयार केलेल्या बिळातच राहतो. अतिशय चपळ, सावध आणि धीट प्राणी म्हणून याची ओळख आहे. वेगाने पळताना तोल सांभाळून वेग कमी न करता चटकन वळण घेणे आणि शिकार करणे हे मुंगसाचे एक वैशिष्ट्य आहे.

आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या असलेल्या प्राण्यांवर मुंगुस प्राणी सहजच हल्ला करतो. भक्ष्यावर हल्ला करताना भक्ष बिळात जाऊन लपले तरी मुंगूस तीक्ष्ण नखांनी बीळ उकरून त्याला शोधून काढतो. लहान सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी व त्यांची अंडी, साप, विंचू, बेडूक व कीटक, अंड्यातील बलक, कंदमुळे व फळे हे मुंगसाचे अन्न आहे.

साप हे मुंगसाचे आवडीचे भक्ष्य आहे. अतिशय विषारी साप देखील तो सहज पकडतो. सापाचे विष मुंगसाला घातक नसते. वेग, चपळता, समयसूचकता आणि शरीरावरचे दाट केस ह्या वैशिष्ट्यांमुळे मुंगूस आणि साप यांच्या लढाईत अनेकदा मुंगूस सापाला वरचढ ठरतो .

मुंगसाचा संबंध थेट जमिनीत असल्याने जमिनीतून खजाना त्याला माहित असतो, असे मानले जाते. जर तुम्हाला पहाटे स्वप्नात मुंगुस दिसला तर, तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे असे म्हणता येईल.😀

पण दुपारी स्वप्नात मुंगुस दिसला तर अशुभ मानले जाते. मुंगुस आणि सापाची झुंज स्वप्नात दिसली की त्यालाही ज्योतिष शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. हिंदू संस्कृतीत मुंगूस भगवान विष्णूचे आणि धनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

सारांश

या लेखातून आपण मुंगूस प्राण्याची माहिती (mongoose marathi mahiti) मराठीत जाणून घेतली. हा लेख तुम्हाला कसा वाटला ? हे आम्हाला नक्की कळवा. जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

मुंगूस हा प्राणी किती वर्ष जगतो ?

साधारणपणे मुंगूस हा प्राणी सात ते तेरा वर्षे जगू शकतो.

मुंगूस प्राणी कोठे राहतात ?

मुंगूस हा प्राणी गावातील पडक्या वास्तूत, मोकळ्या जागांत, माळरानावर, गवताळ जागी, झुडपांमध्ये एकट किंवा दोन चार जणांत राहतात.

मुंगूसदिसणे शुभ की अशुभ ?

मुंगूसदिसणे हिंदू संस्कृतीत शुभ मानले जाते, मग ते स्वप्नात असो नाहीतर रस्त्यात. हिंदू संस्कृतीत मुंगूस भगवान विष्णूचे आणि धनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

पुढील वाचन :

  1. घोरपड प्राणी माहिती मराठी
  2. राष्ट्रीय प्राणी वाघ मराठी माहिती
  3. खेचर प्राणी मराठी माहिती
  4. मांजराची माहिती मराठी
  5. महाराष्ट्रातील जंगली प्राणी माहिती मराठी