माउंट एव्हरेस्ट माहिती मराठी

Mount Everest Trekking Marathi – स्वर्गाचे शिखर म्हणून माउंट एव्हरेस्ट पर्वताला संबोधिले जाते. हा पर्वत नेपाळ व चीन या देशाच्या सीमेवर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा तर तिबेट चीनमध्ये चोमो लुंग्मा असे म्हणतात.

माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे ट्रेकिंग करणाऱ्या प्रत्येकाचे माउंट एव्हरेस्ट पर्वत पार करण्याचे स्वप्न असते.

या लेखातून आपण माउंट एव्हरेस्ट माहिती मराठी (mount everest trekking marathi) जाणून घेणार आहोत.

माउंट एव्हरेस्ट माहिती मराठी (mount everest information in marathi)

mount everest trekking marathi
नावमाउंट एव्हरेस्ट
प्रकारपर्वतशिखर
ठिकाणनेपाळ व चीन या देशाच्या सीमेवर
पर्वतरांगहिमालय
उंची8,848.86 मीटर
प्रसिध्दीजगातील सर्वात उंच पर्वत

नेपाळ आणि चीन या देशाच्या सीमेवर माउंट एव्हरेस्ट हे पर्वतशिखर आहे. याला नेपाळी भाषेत नाव सागरमाथा (sagarmatha) असे म्हणतात. सागरमाथा हा शब्द स्वर्गमाथा या संस्कृत शब्दापासून तयार झाला असून याचा अर्थ स्वर्गाचे शिखर असा होतो.

चीनमधील तिबेटी भाषेत माऊंट एव्हरेस्टला चोमोलुंग्मा (Chomolungma) असे म्हणतात. याचा अर्थ पर्वतांची राणी आणि विश्वाची माता असा होतो.

इसवी सन 1841 मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी त्रिमितीय सर्वेक्षणात माउंट एव्हरेस्टला अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट केले. यावेळी याचे नाव पीक बी असे होते, ते 1865 साली बदलून माउंट एव्हरेस्ट असे ठेवण्यात आले.

माउंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर इतकी आहे. जगातील सर्वात उंच शिखर असल्याने ट्रेकिंग करणाऱ्या प्रत्येकाचे माउंट एव्हरेस्ट पर्वत पार करण्याचे स्वप्न असते.

माउंट एव्हरेस्ट माहिती मराठी (mount everest trekking marathi)

ways to climb mount everest marathi – माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग आणि दुसरा तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग होय. या व्यतिरिक्त चढाईसाठी अजूनही मार्ग आहेत पण सहसा त्याचा वापर होत नाही.

या दोन्ही मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्त सोपा आणि सोईस्कर असल्याने हा मार्ग ट्रेकिंग करणाऱ्यांचा आवडीचा आहे. या मार्गाने सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये पहिली चढाई केली होती.

पर्वत चढाईसाठी सर्वोत्तम मे महिना सर्वोत्तम आहे. कारण हिवाळ्यानंतर थंडी कमी होऊन चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडची होते. त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होऊन चढाई करणे सोपे होते.

इसवी सन 1885 मध्ये क्लिंटन थॉमस डेंट यांनी त्यांच्या अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे, असे लिहिले.

इसवी सन 1921 जॉर्ज मॅलरी यांनी उत्तर दिशेकडून एव्हरेस्टवर जाण्याचा मार्ग शोधला तसेच त्यांनी 7,007 मीटर इतके अंतर गाठले.

इसवी सन 1922 मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट पर्वत काबीज करण्याची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी 8,000 मीटर चढण करून एव्हरेस्टवर चढणारे पाहिले ठरले.

इसवी सन 1952 मध्ये स्विस एडवर्ड डुनॉं यांनी खूंबू हिमनदीमधून साउथ कोलवरून एव्हरेस्टवर 7,986 मीटर उंचीवर जाण्याच्या मार्ग शोधून काढला. यावेळी रेमंड लॅंबर्ट आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी 8,595 मीटर उंची गाठून नवा विक्रम केला.

इसवी सन 1965 मध्ये कर्नल अवतार सिंह चिमा यांनी माउंट एव्हरेस्ट पार करून भारतातील पहिले माउंट एव्हरेस्ट ट्रेकर्स ठरले. यांनतर सोनम ग्यात्सो व सोनम वांग्याल यांनी एव्हरेस्ट शिखर चढाई केली.

पुढे सन 1984 मध्ये बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्टवर चढाई केली. त्यामुळे त्यांना भारतातील पहिल्या गिर्यारोहक महिला म्हणून सन्मानित करण्यात आले.

यानंतर बऱ्याच ट्रेकर्सने माउंट एव्हरेस्ट शिखरवर चढाई केली. 19 मे 1998 रोजी सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढाई केली. महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट शिखर यशस्वी चढाई करणारे सुरेंद्र चव्हाण हे पहिले ट्रेकर्स ठरले.

सुरेंद्र चव्हाण नंतर डॉ. दीपक कुलकर्णी यांनी चढाईचा प्रयत्न केला पण त्यांना यात अपयश आले. पुढे 19 मे 2016 रोजी रफीक शेख यांनी हे शिखरवर यशस्वी चढाई केली.

अशा प्रकारे अनेक गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई केली तर काहींचा चढाई करताना मृत्यू झाला. इसवी सन 1996 च्या चढाईच्या वेळी एकूण 15 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. यांनतर एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली.

सारांश

या लेखातून आपणमाउंट एव्हरेस्ट माहिती मराठी (mount everest trekking marathi) सविस्तरपणे जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीय व्यक्ती कोण आहे ?

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीय व्यक्ती सुरेंद्र चव्हाण हे आहे. त्यांनी 19 मे 1998 रोजी माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली.

माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे ?

नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ माउंट एव्हरेस्ट आहे.

माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला कोण ?

माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जंको ताबेई होय. ही एक जपानी गिर्यारोहक, लेखिका आणि शिक्षिका होती.

माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल होय.

माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे ?

माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची 8,849 मीटर इतकी आहे.

माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला कोण आहे ?

माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा ही आहे.

पुढील वाचन :

  1. महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती
  2. महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे माहिती
  3. राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा माहिती मराठी
  4. अक्साबीच मधील टॉप प्रेक्षणीय स्थळे माहिती

Leave a Comment