संविधानाची उद्देशिका म्हणजे काय – constitution of india in marathi

Table of Contents

संविधान म्हणजे एखादा देश किंवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले नियम असतात, यावरून देशाचा राज्यकारभार ठरत असतो.29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली.26 जानेवारी 1949 रोजी अंतिम मसुदा स्वीकारला त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

संविधानाची उद्देशिका म्हणजे काय
संविधान म्हणजे काय

संविधानास राज्यघटना देखील संबोधले जाते.बदलत्या काळानुसार घटनेत बदल करता यावा, यामुळे भारतीय घटनेत दुरुस्तीसाठी तरतूद करण्यात आली आहे.

या लेखात आपण सविधान म्हणजे काय आणि संविधानाची उद्देशिका म्हणजे काय सविस्तरपणे समजावून घेऊ.स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भारतीय राज्यघटना आणि राज्य व्यवस्था या घटकांवर प्राथमिक तसेच मुख्य परीक्षेत मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात.

संविधान म्हणजे काय ?

संविधान म्हणजे एखादा देश किंवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले नियम असतात, यावरून देशाचा राज्यकारभार ठरत असतो.

इंग्रजी भाषेमध्ये 22 भाग, 444 कलमे, 118 दुरुस्त्या व 1,17,369 शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे.ह्याउलट केवळ 7 कलमे व 26 दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते.

संविधानाची उद्देशिका म्हणजे काय ?

प्रस्ताविका म्हणजे राज्यघटनेची प्रारंभिक माहिती होय ज्याला सरनामा आणि उद्देशिका असे म्हणले जाते. ज्या तत्वज्ञानावर संविधान आधारित आहे तेच तत्वज्ञान प्रस्ताव इकेत सामाविष्ट आहे.

अमेरिकन राज्यघटना ही पहिली प्रस्ताविका असलेली राज्यघटना आहे. अमेरिकेत प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असे तेथील घटनेत स्पष्ट सांगितले आहे.

13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने संमत केला. प्रस्ताविका नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांवर आधारित आहे. उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोरचा दिशादर्शक होता. मात्र मूळ प्रस्ताविका संविधान संमत केल्यावर स्वीकारले.

महत्वाचे – भारतीय राज्यघटना उद्देश्य आणि तत्वांची थोडक्यात माहिती देणारी प्रस्ताविका एखाद्या कवितेप्रमाणे आहे. 1919 चा कायदा ला प्रस्ताविका होती मात्र 1935 कायद्याला प्रस्ताविका नव्हती.

प्रस्ताविकेचे घटक

1. घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत – भारतीय जनता

2. राज्याचे स्वरूप – सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य

3. घटनेचे उद्देश – न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता

4. 26 नोव्हेंबर 1949 लाख संविधान सभेने घटना स्वीकारली हा दिनांक प्रास्ताविकात नमूद आहे याच्या दोन महिन्यांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी घटना अमलात आली.

5. प्रस्ताविकेत फक्त एकदा बदल झालेला आहे हा बदल 42 वी घटनादुरुस्ती 1976 यावेळी करण्यात आला.

या घटनादुरुस्तीने प्रास्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता म्हणजेच अखंडता या तीन तत्वांचा समावेश केला आहे.

महत्वाचे – 1976 साली काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या सरदार स्वर्णसिंग समितीने केलेल्या शिफारसीवर आधारित प्रस्ताविकेत 42 व्या घटना दुरुस्ती चे बदल केले.

भारतीय संविधान प्रस्तावना मराठी

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याचा सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जा व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
‘प्रवर्धित करण्याचाा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधानसभेत
आज
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रस्ताविकेचे तत्वज्ञान प्रदर्शित करणारे काही तत्वे

• सार्वभौम – देशावर कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव तसेच परकीय सत्ता नसणे. यामध्ये परकीय प्रदेश मिळवणे आणि परकीय यांना आपला प्रदेश देणे असे दोन्ही अधिकार आहेत. राष्ट्रकुल तसेच संयुक्त राष्ट्र यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सदस्यत्व स्वीकारणे म्हणजेच सार्वभौमत्व लोप पावत नाही. विशेष म्हणजे फक्त संघराज्य सार्वभौम आहे. घटक राज्य सार्वभौम नाहीत. भारताने मे 1949 राष्ट्रकुल चे सदस्यत्व स्वीकारले.

• समाजवादी – हे तत्व 42 व्या घटनादुरुस्तीने सामाविष्ट करण्यात आले. प्रस्ताविका वगळता घटनेत कोठेही समाजवादी तत्त्वांचा उल्लेख नसून अर्थ सुद्धा दिलेला नाही. भारताने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात सह अस्तित्व असणाऱ्या लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला आहे. भारतीय समाजवाद गांधीवादी समाजाकडे झुकलेला आहे. 1955 साली काँग्रेसच्या आवडी येथील अधिवेशनात समाजवादाचा स्वीकार केला.

• धर्मनिरपेक्ष – हे तत्व 42 व्या घटनादुरुस्तीने सामाविष्ट केले गेले. घटनेच्या कलम 25 ते 28 दरम्यान धर्मनिरपेक्ष राज्याबाबत तरतुदी आहेत. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्यव्यवस्था धर्माच्या मुद्द्यावर ठाम असते. विशिष्ट धर्माला राज्याचा धर्म असे म्हटले जाणार नाही. अमेरीकेत सुद्धा हेच तत्त्व आहे. सर्व धर्मांना समान दर्जा असेल आणि भारतामध्ये सकारात्मक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना अस्तित्वात आहे.

• लोकशाही – ग्रीक भाषेतील demos म्हणजे लोक आणि cratia म्हणजे सत्ता या दोन शब्दावरून democracy म्हणजे लोकशाही हा शब्द तयार झाला आहे. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता.

लोकशाहीहुकूमशाही
सर्वांनी वारंवार एकत्रित येऊन चर्चेद्वारे समस्या सोडवणे.प्रबळ गटाची सरशी व त्यांच्या हाती सत्ता
शाही चे प्रकार

प्रत्यक्ष लोकशाही मध्ये प्रत्यक्ष लोकांचा सहभाग असतो. उदाहरणार्थ प्राचीन ग्रीक नगर राज्य जसे की अथेन्स आणि स्विझर्लांड.

अप्रत्यक्ष लोकशाही मध्ये लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो. उदाहरणार्थ भारत, अमेरिका, इंग्लंड.

अप्रत्यक्ष लोकशाहीचे दोन प्रकार पडतात त्यातला पहिला म्हणजे अध्यक्षीय लोकशाही त्यामध्ये प्रामुख्याने कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ यामध्ये सत्तेचे विभाजन असते तर एक प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतो. राष्ट्राध्यक्षांना मुदतीपूर्वी काढून टाकता येत नाही.उदाहरणार्थ अमेरिका आणि फ्रान्स.

आणि दुसरा म्हणजे ज्यामध्ये संसदेच्या हातात सत्ता असते. तर संसदीय लोकशाहीमध्ये दोन कार्यकारी प्रमुख असतात. पहिला – भारतातील राष्ट्रपती किंवा इंग्लंड इंग्लंड चा राजा की राणी तर दुसरा पंतप्रधान – पंतप्रधानांवर अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकाल पूर्ण होण्या अगोदर काढून टाकता येते. उदाहरणार्थ भारत आणि इंग्लंड.

गणराज्य

15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून 26 जानेवारी 1950 पर्यंत भारत वसाहती स्वातंत्र अंतर्गत होत्या. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक बनला.

गणराज्य म्हणजे

• सर्वोच्च जनता

• राष्ट्रप्रमुख वंशपरंपरेने नसून लोकांकडून ठराविक काळाने अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातील.

• सार्वजनिक कार्यालय सर्वांना विना भेदभाव खुली राहतील.

• कोणताही विषय संपन्न वर्ग नाही.

न्याय – भारतीय संविधानात न्यायाची तत्वे रशियाच्याा घटनेतून घेतली आहे ज्यामध्ये नागरिकांत जात-धर्म आणि लिंग यामधून भेदभाव केला जात नाही म्हणजेच सामाजिक विषमता कमीी केली जाते. शासनाने सर्वांच्या कल्याणासाठी विशेषता दुर्बल लोकांसाठी काम केले पाहिजे त्यामुळे न्यायाचे तीन प्रकार प्रस्तावित आहेत. ते पुढील प्रमाणे.

1. सामाजिक

2. आर्थिक

3. राजकीय

स्वातंत्र्य – भारतीय संविधानात हे तत्व फ्रान्सच्या घटनेतून घेतले आहे. स्वातंत्र्याचे पाच प्रकार प्रस्तावित आहेत ते खालील प्रमाणे.

1. विचार – नागरिकांवर कारण नसताना बंधन घातले जाऊ नयेत म्हणजेच ते काय विचार करतात आपले विचार कसे मानतात किंवा कसे विचारांनुसार कशी कृती करतात यावर बंधन असू नयेत.

2. अभिव्यक्ती

3. विश्वास

4. श्रद्धा

5. उपासना

समानता – भारतीय संविधानात समानता हे तत्व फ्रान्सकडून घेतले आहे ज्यामध्ये दर्जा व संधी समानता दिली आहे म्हणजेच कायद्यासमोर सर्वजण समान असतात. पारंपारिक पद्धतीने चालू असलेली सामाजिक विषमता नाहीशी व्हावी म्हणून शासनाने सर्वांनाााा समान संधी दिली आहे.

1. नागरिक समानता – कलम 14 ते 18

2. राजकीय समानता – कलम 325 व 326

3. आर्थिक समानता – कलम 39 मधील मार्गदर्शक तत्वे

बंधुता हेे तत्व फ्रान्सकडून घेतले आहे याचे कारण असे सर्वांनी एका कुटुंबाचेे घटक आहोत या पद्धतीनेेेे वर्तन केले पाहिजे. कोणत्याही नागरिकास कनिष्ठची वागणूक देऊ नयेे. त्यासाठी व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकता या गोष्टी सामाविष्ट केल्या आहेत.

प्रास्ताविक बद्दल महत्वाची माहिती

1. प्रस्ताविका कायदे मंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही तसेच प्रतिबंध सुद्धा नाही.

2. प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही म्हणजेच तिच्यातील तरतुदी अमलात आणला नाही तर न्यायालयात दाद मागता येत नाही.

3. प्रस्तावित सुधारणा करता येते मात्र तिच्या मूळ रचनेत बदल करता येणार नाही.

4. धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे दोन्ही घटनेत असावेत अशी सूचना प्राध्यापक शहा यांनी केली होती मात्र त्यावेळेस घटना सभेने मान्य केले नाही आणि अखेर 1976 ला 42 व्या घटनादुरुस्तीने सामाविष्ट केली.

5. भारतीय नागरिकांना घटना ही प्रस्ताविका यातून आर्थिक न्यायाची खात्री देते.

6. भारतीय घटनेची प्रस्ताविका ही जगातील सर्वात मोठी प्रस्तावना आहे.

7. राज्यघटनेतील असं काही कलम 368 अंतर्गत प्रस्ताविक घटना दुरुस्ती करता येते का हा प्रश्न 1973 चाली केशवानंद भारती खटल्यामध्ये उपस्थित झाला होता तेव्हा प्रस्ताविक मधील पायाभूत वैशिष्ट्यांच्या अधीन राहून प्रस्ताविक दुरुस्ती करता येते.

8. राज्यघटनेतील इतर तरतुदी प्रमाणेच रस्ता व काही सुद्धा घटना सभेने तयार केलेले आहे. प्रस्ताविकेवर घटना सभेत मतदान घेताना घटना सभेच्या अध्यक्षांनी प्रस्तविका राज्यघटनेचा भाग आहे हा प्रश्न मांडला होता तेव्हा घटना सभेने राज्यघटने चा भाग आहे याला मान्यता मिळाली.

9. अर्नेस्ट बार्कर यांनी सामाजिक आणि राजकीय सिद्धांत तत्वे या त्यांच्या पुस्तकाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेची उद्देशिका दिली असून सरनामा हे राज्यघटनेतील मुख्य तत्त्व आहे असे म्हटले आहे.

10. प्रस्ताविकातून सत्तेचा स्रोत, शासनाचा प्रकार आणि सामाजिक न्याय तसेच घटनेच्या दिनांक स्पष्ट होतात.

11. आपल्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी सविधान स्वीकृत आणि अधिनियमन करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत शेवट केला आहे.

12. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना सभेत घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्यावेळी घटना सभेने तो एक मताने स्वीकारला होता.

“आम्ही भारताचे लोक” या शब्दाचा अर्थ

आम्ही भारताचे लोक हा शब्द भारतीय प्रस्तावनामध्ये अमेरिकन प्रस्ताविकेतून स्वीकारला आहे. याचा अर्थ असा संविधानाचे निर्माते भारतीय आहेत. संविधानाच्या शक्तीचा स्त्रोत भारतीय जनता आहे.

भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

• एच.व्ही कामत या घटना सभेच्या सदस्यांनी आम्ही भारताचे लोक या ऐवजी देवाचे नाव असावे अशी सूचना केली होती.

• शिब्बनलाल सक्सेना यांनी देव आणि महात्मा गांधी यांचे नाव सुचवले.

• रोहिणी कुमार चौधरी यांनी कामत यांच्या सूचनेत बदल करून देवी चे नाव सुचवले.

• मौलाना हसरत मोहानी यांनी USSR च्या धर्तीवर भारताला भारतीय समाजवादी प्रजासत्ताक चे युनियन बनवण्याची मागणी केली.

• संविधान सभेने 17 ऑक्टोबर 1949 रोजी प्रस्तविका स्वीकारली होती.

• 17 ऑक्टोबर 1949 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रस्ताविका ही संविधानाचा भाग वाचण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता तो प्रस्ताव स्वीकारला गेला.

• प्रस्ताविका ही व्होहार राम मनोहर सिन्हा यांनी सजवली आहे.

सारांश

संविधान म्हणजे काय तर एखादा देश किंवा राष्ट्र चालवण्यासाठी आखलेले नियम होय. या लेखात आपण संविधानाची म्हणजेच राज्यघटनेची प्रारंभिक माहिती अर्थात प्रस्ताविका याबद्दल अभ्यासले आहे. त्याच बरोबर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही या प्रास्ताविकेचे तत्वज्ञान प्रदर्शित करणारे तत्त्वांची माहिती पाहिलेले आहे.

संविधानाची उद्देशिका म्हणजे काय याबद्दल सर्व माहिती मिळाली असेल ,अशी मी आशा करतो.जर तुम्हाला काही शंका असल्यास विचारू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद हे होते.

भारताचे संविधान कोणी लिहिले ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती की भारताचे संविधान हे हस्तलिखित असावे त्यासाठी त्यांनी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्याकडून लिहून घेतले. यासाठी 303 पेन आणि 353 दौत त्याचबरोबर सहा महिन्याचा कालावधी लागला. यासाठी प्रेम बिहारी यांनी मानधन घेण्यास नकार दिला परंतुु संविधानाच्या प्रत्येक पानावर त्याचं नाव व शेवटच्या पानावर त्यांच्याया आजोबांचे नाव असावे अशा ठेवली.

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2021 ?

इसवी सन 2021 मध्ये भारतीय संविधानात 448 कलमे आहेत.

संविधान सभेत एकूण किती सदस्य होते ?

संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते आणि पाकिस्तान भारत फाळणीनंतर 299 सदस्य होते.

संविधान सभेतील महिला सदस्यांची नावे

संविधान सभेतील महिला सदस्यांची नावे
1.अम्मू स्वामीनाथन
2.दक्षिणानी वेलायुद्ध
3.बेगम एजाज रसूल
4.दुर्गाबाई देशमुख
5.हंसा जिवराज मेहता
6.कमला चौधरी
7.लीला रॉय
8.मालती चौधरी
9.पूर्णिमा बनर्जी
10.राजकुमारी अमृत कौर
11.रेनुका रे
12.सरोजिनी नायडू
13.सुचेता कृपलानी
14.विजया लक्ष्मी पंडित
15.एनी मास्कारेन

भारतीय संविधान सभा कोणत्या योजनेद्वारे स्थापन करण्यात आली ?

माउंटबेटन योजना

संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता ?

13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला.

संविधान म्हणजे काय व्याख्या मराठी ?

संविधान म्हणजे एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात.

उपयुक्त माहिती

हे देखील वाचा

Leave a Comment