महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे – Tourist places in Maharashtra

Table of Contents

महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे - Tourist places in Maharashtra
महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे – Tourist places in Maharashtra

पूर्वेला छत्तीसगड, पश्चिमेला अरबी समुद्र किनारा, त्याला लागून असलेला पश्चिमी घाट, दक्षिणेला कर्नाटक आणि उत्तरेला मध्य प्रदेश अश्या या सह्याद्रीच्या कुशीत असणारे आपले राज्य महाराष्ट्र.

भारत देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्याचबरोबर देशात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचे २५% योगदान आहे.देशात सर्वाधिक रस्त्याचे जाळे असून ४२% पर्यंत शहरीकरण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे आहेत.

या लेखात आपण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे – Tourist places in Maharashtra याबत माहिती घेणार आहोत.महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती मराठी मिळवण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे – Tourist places in Maharashtra

पर्यटन स्थळजिल्हाप्रसिध्द
अजिंठा लेणीऔरंगाबादबौद्ध लेणी
वेरूळची लेणीऔरंगाबादबौद्ध, हिंदू, जैन लेणी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबईअद्भुत आणि देखणे रेल्वे स्थानक
घारापुरी लेणीमुंबईहिंदू आणि बौद्ध कल्पना आणि मूर्तिशास्त्र यांचे समक्रमण.
कास पठारसाताराजैवविविधता – रानफुले आणि फुलपाखरे
महाराष्ट्र राज्यात जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे

United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) या संस्थेने पाच ऐतिहासिक ठिकाण, लेणी, वास्तू आणि निसर्ग रमणीय ठिकाणला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्र राज्याला घोषित केले आहे.

शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

अजिंठा लेणी – पर्यटन स्थळाविषयी माहिती

अजिंठा लेणी - पर्यटन स्थळाविषयी माहिती
अजिंठा लेणी – पर्यटन स्थळाविषयी माहिती

चित्रकलेसाठी प्रसिद्ध असणारी अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे.औरंगाबाद शहरापासून १०० किलोमीटरवर वाघूर नदीच्या परिसरात या लेण्या आहेत.UNESCO या संस्थेने १९८३ साली जागतिक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा दिला.

बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायीन पंथीयांची लेणी साहित्य येथे आहे.ही लेणी पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून तसेच इतर ठिकाणावरून असंख्य पर्यटक येत असतात.

वैशिष्ट्य

इसवी सन दुसरे ते इसवी सन चौथे शतक या काळात वाघूर नदीच्या ४० ते १०० फूट उंचीवर २९ लेण्या ची निर्मिती केली आहे.लेणीच्या अवतीभवती घनदाट जंगल आहेत.

गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा आणि बौद्ध तत्वज्ञान शिल्पकलेतून मांडला आहे.विहार आणि चैत्य अश्या दोन प्रकारातून अजिंठा निर्मिती केली आहे.चैत्यगृह म्हणजे स्तूप असलेलं मंदिर.

गौतम बुद्धांचे जीवनप्रसंग, सांस्कृतिक दुवे आणि नीतिमूल्ये या लेण्यांच्या माध्यमातून साकारले आहेत.भिंतीवर जातकाच्या बोधपर चित्रे लावली आहेत.

अजिंठा येथे २९ लेण्यांपैकी हीनयान कालखंडातील लेण्यामध्ये नवव्या आणि दहाव्या क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहे.तर १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणी हे विहार आहे.महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकांची लेणी विहार आहेत.

या लेण्यांचे क्रमांक त्यांच्या निर्मिती नुसार दिलेले नसून एकापाठोपाठ एक येणाऱ्या लेण्याच्या क्रमानुसार दिले आहेत.

लेण्यांचा अनुक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वेरूळची लेणी – पर्यटन स्थळाविषयी माहिती

वेरूळची लेणी - पर्यटन स्थळाविषयी माहिती
वेरूळची लेणी – पर्यटन स्थळाविषयी माहिती

इसवी सण १९५१ रोजी भारत सरकारने वेरूळची लेणी ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले तर UNESCO या संस्थेने १९८३ साली जागतिक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा दिला.

पाचव्या ते दहाव्या शतकातील कोरलेल्या औरंगाबाद शहरापासून अगदी ३० किलोमीटरवर वेरूळची ३४ लेण्या आहेत.बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील लेणी एकाच ठिकाणी पाहण्यास मिळतात.

वैशिष्ट्य

पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात दिसून येते.बोधिसत्वची मूर्ती आणि गौतम बुद्धांचे शिल्प यांचे चित्रण आढळून येते.त्याचबरोबर बौद्ध अनुयायांची घरे, प्रार्थनास्थळ, विहार आणि स्वयंपाक घर यांचा समावेश आहे.

दहाव्या क्रमांकावर असलेली विश्वकर्माची लेणी प्रमुख मानली जाते.

पर्वतावर शिव-पार्वती बसलेले आहेत आणि रावण तो पर्वत हलवत असताना एक लेणी आहे ज्यास कैलास लेणी असे म्हणतात.ही लेणी अतिशय भव्य आहे.

जैन मंदिरांची पाच-सहा गुहामंदिर आहेत.त्यात तुम्ही इंद्रसभा, छोटा कैलास, जगन्नाथ सभा पाहू शकता.जैन तीर्थंकर पार्श्वनाथ याची भव्य मूर्ती आहे.त्याचबरोबर इंद्र, गोमटेश्वर बाहुबली, भगवान यांच्या मूर्ती आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पर्यटन स्थळाविषयी माहिती

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पर्यटन स्थळाविषयी माहिती
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पर्यटन स्थळाविषयी माहिती

भारतची आर्थिक राजधानी मध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.ज्याला व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) किंवा सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते.

व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेक सुवर्णजयंती च्या निमित्ताने इसवी सन १८८७ मध्ये याची निर्मिती झाली.UNESCO या संस्थेने २००४ साली जागतिक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा दिला.

वैशिष्ट्य

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १८ फलाट आहेत.ज्यातून १ ते ८ मध्ये मुबई उपनगर मध्ये तर उर्वरीत फलाट मधून लांब ठिकाणची रेल्वे जाते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याला महाराष्ट्र राज्यातील अद्भुत आणि देखणे ठिकाण म्हणून निवडले आहे.

घारापुरी लेणी – पर्यटन स्थळाविषयी माहिती

gharapuri leni
gharapuri leni

इसवी सन ९ ते इसवी सन १३ या कालखंडात याची निर्मिती झाली आणि UNESCO या संस्थेने १९९७ साली जागतिक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा दिला.घारापुरी लेणी ही महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरापासून सहा ते सात मैल दूर लहान बेटावरील डोंगरात आहे.

या लेणीच्या प्रवेशद्वार जवळ हत्तीच्या आकाराचे एक शिल्प होते, त्यावरून याचे नाव एलिफंटा असे पडले.हे शिल्प सध्या मुंबईत राणीच्या बागेत आहे.

वैशिष्ट्य

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे यामध्ये घारापुरी लेणीच्या सामावेश होतो.कोकणात असलेला मौर्य साम्राज्याची राजधानी घारापुरी होती.काळानुसार यावर वेगवेगळ्या राजाने राज्य केले.

या बेटावर एकूण पाच लेणी आहेत आणि सर्व शिल्पकाम शैव संप्रदाय चे आहे.शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडव नृत्य, अंधकारसूर वध अशी अनेक रमणीय शिल्प आहेत.

महाकाय गुहा, रावणानुग्रह, शिव-पार्वती विवाह मंडल याची शिल्पे कोरलेली आहेत.

कास पठार – पर्यटन स्थळाविषयी माहिती

कास पठार
कास पठार

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे कास पठाराशिवाय पूर्ण होत नाही.पावसाळ्यात या पठारावर अनेक विविधता असलेले फुल पाहायला मिळतात अगदी दुर्मिळ झालेल्या प्रजाती सुद्धा, यामुळेच UNESCO या संस्थेने २०१२ साली जागतिक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा दिला.

महाराष्ट्र राज्यातील जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणजे कास पठार होय.या ठिकाणी विविध रानफुले आणि फुलपाखरे पाहायला मिळतात.हे पठार सातारा शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर आहे.

वैशिष्ट्य

कास पठार रानफुले आणि फुलपाखरे यासाठी प्रसिद्ध असून २५० हुन अधिक फुलांच्या प्रजाती, वेली, झुडुपे अशी मिळुन सारे ८५० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात आणि ५९ जातीचे सरपटणारे प्राणी देखील आढळतात.

जगातील सर्वात मोठे पुष्प पठार कास पठार पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे त्यामुळेच येथे कास, भांबवली, महाबळेश्वर, तापोळा, पाटण यासारखा परिसर आहे.

कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे.कास तलावाच्या अवतीभोवती घनदाट जंगल आहे, ते सज्जनगड आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे.कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच भांबवली वजराई धबधबा आहे.कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे.

महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे – Tourist places in Maharashtra यामध्ये आपण अजिंठा वेरूळ लेणी, घारापुरी लेणी, कास पठार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या विषयी माहिती पाहिली. ऐतिहासिक स्थळांची माहिती घेण्यासाठी आमचा ब्लॉग ला सबस्क्राईब करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अजिंठा लेणी चा शोध कोणी लावला?

ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्या असता २८ एप्रिल, इ. स. १८१९ रोजी अजिंठा लेणी चा शोध लागला.

वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

वेरूळ मधील कैलास मंदिर कोणी कोरले?

राष्ट्रकुट राजवंश नरेश कृष्णा याने वेरूळ मधील कैलास मंदिर कोरले.

घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत

एलिफंटा धबधबा कोणत्या राज्यात आहे?

मेघालयची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणजे शिलाँग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. … शिलाँग पासून काही अंतरावर एलिफंटा धबधबा आहे.

कोणत्या भागात पर्यटन केंद्राचा विकास जास्त होतो ?

ज्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य लाभले आहे असे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करत असते. नद्या झाडेझुडपे, पक्ष्याचा किलबिलाट, प्रसिद्ध देवस्थान, अभयारण्ये अशा ठिकाणी पर्यटन केंद्राचा जास्त विकास होतो.

जनगणना अहवालात पर्यटन स्थळे यांना कोणती संज्ञा वापरली जाते ?

एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.

भारतात आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा अनुकूल कालखंड कोणता ?

भारतामध्ये जागतिक पर्यटन स्थळे 39 आहेत. दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी भारतात येतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

भारताचे पहिले परदेशी पर्यटन कार्यालय कोठे सुरू करण्यात आले ?

1 October 1966 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पहिले परदेशी पर्यटन कार्यालय तयार झाले.

वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात कोणता देश प्रमुख आहे ?

जपान, कोरिया, अमेरिका, तैवान, जर्मनी, सिंगापूर, मलेशिया, स्वीडन, थायलंड आणि भारत ही टॉप टेन वैद्यकीय पर्यटन स्थळे आहेत.

गंगेच्या काठावर कोणते पवित्र धार्मिक ठिकाण आहे ?

गंगा आणि बंगालच्या उपसागरात गंगा-सागर-संगम नावाच्या ठिकाणी प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.

भारतात आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा गर्दीचा ऋतू कोणता ?

भारताचा आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी सर्व ऋतूत गर्दी असते. त्यामधील जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक समर व्हेकेशन म्हणजेच उन्हाळा या ऋतूमध्ये येतात.

हे देखील वाचा

Leave a Comment