साळुंकी पक्षी माहिती मराठी

Categorized as Blog

myna bird information in marathi – मैना जिला आपण साळुंकी किंवा शाळू असे म्हणतो. हा पक्षी साधारणपणे खेडे गावात जास्त प्रमाणात आढळतो. मैना पक्षी दिसायला अतिशय सुंदर असतो, त्यामुळे आपल्या बहुतांश वेळा सुंदर दिसणाऱ्या मुलीला मैनेची उपमा दिली जाते. या लेखातून आपण मैना पक्षी माहिती मराठी (myna bird information in marathi) जाणून घेणार आहोत.

साळुंकी पक्षी माहिती मराठी (salunki bird information in marathi)

नावमैना
इतर नावेसाळुंकी, शाळू
शास्त्रीय नाव ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस
प्रजातीपाच

भारतीय मैना, साळुंकी आणि शाळू हा एकच पक्षी आहे. या पक्ष्याचे मूळ निवासस्थान भारत देश असून तो भारत देशाबरोबर दक्षिण आफ्रिका, मध्यपूर्व ऑस्ट्रेलिया ईशान्य अमेरिका आणि न्यूझीलंड या ठिकाणी साळुंकी पक्षी आढळतो. हा पक्षी साधारणपणे मानवी वस्तीजवळ राहतो.

साळुंकी पक्षी 23 ते 27 सेंमी लांब असून नर व मादी दिसायला सारखेच असतात. यांचे वजन 83 ते 143 ग्रॅ. असते. संपूर्ण डोके, मान आणि छातीचा वरचा भाग काळा, शरीराचा बाकी भाग गर्द तपकिरी, पोटाचा मागचा भाग पांढरा, शेपटीचे टोक व बाहेरील पिसे पांढरे असून 120 ते 142 मिमी आकाराचे पंख असतात.

चोच आणि पाय पिवळ्या रंगाचे असतात. डोळे तांबूस तपकिरी असून त्याच्या खालचा व मागचा भाग तकतकीत पिवळ्या रंगाचा असतो व त्यावर पिसे नसतात.

साळुंक्या जोडीने फिरत असताना त्या कधी मंजूळ, तर कर्कश आवाज काढतात. हा पक्षी सर्वभक्षक असून फळे, धान्य, गांडुळे, टोळ तसेच सर्व प्रकारचे किडेही खातो. किडे व कीटक खाण्यामुळे शेतातील पिकांचे रक्षण होते. त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हंटले जाते.

मैना पक्षी माहिती मराठी (myna bird information in marathi)

मैना अतिशय आक्रमक स्वभावाची आणि निर्भय असते, त्यामुळे कावळे, गिधाड असे चतुर शिकारी पक्षीही त्यांच्याशी लढायला घाबरतात.

पूर्वी काळी मैना ग्रीस देशातील सर्वोत्कृष्ट आणि उच्चभ्रू पाळीव पक्षी म्हणून पाळली जायची. भारतात काळी मैना डोंगरदऱ्यात आढळते.

मैना पक्ष्यांच्या कळपात अधिक चांगला समन्वय असतो. असे म्हणतात की, त्या कळपातील प्रत्येकाला अन्न मिळावे म्हणून ते आपापसात अन्नाच्या स्त्रोतांबद्दल माहितीची देवाणघेवाण देखील करतात.

जर मैना पिंजऱ्यात किंवा इतर कोणत्याही प्रकारे माणसांच्या सहवासात ठेवली तर ती मानवी भाषा शिकून बोलू शकते. या कारणाने मैना पक्षी जगभरात प्रसिद्ध आहेत.

मैना समूहाने राहणारा पक्षी आहे. तो सहसा 5 ते 10 पक्ष्यांच्या गटात राहतो, जंगलात ते 500 ते 1000 मैना पक्ष्यांच्या गटात राहतात.

मैने चा एकूण पाच उपप्रजाती आहेत, यातील बाली मैना नावाची मैना अत्यंत दुर्मिळ आहे. पक्षी तज्ज्ञांच्या मते, 2018 मध्ये पृथ्वीवर बाली मैनेची संख्या 100 पेक्षा कमी आहे.

मैना पक्ष्याचे एक खास वैशिष्ट्य आहे. मैना स्वतःचे घरटे बनवते, पण ती स्वतः ची अंडी दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात ठेवते.

मैनाला आशियातील मूळ पक्षी म्हणतात. हा पक्षी पाणी असणाऱ्या भागात राहणे पसंत करतो. त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी आणि डोंगरदऱ्यात याचे वास्तव्य असते.

शाळू पक्षी माहिती मराठी (shalu bird in marathi)

गुलाबी मैना (Rosy starling) ही भारतात आढळणाऱ्या मैनाची एक प्रजात आहे, तिला मधुसारिका या नावानेही ओळखले जाते. या मैनेचा आवाज अतिशय गोड असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ती आपल्या गोड आवाजात गायन करते.

इंग्रजी साहित्यात गुलाबी मैनाचे एक वेगळे स्थान आहे. भारतीय टपाल विभागाने 24 मे 2004 रोजी गुलाबी मैनाच्या चित्र असलेले एक टपाल तिकीट जारी केले होते.

आपल्या आजूबाजूला दिसणारी भारतीय मैना (indian myna) आहे. ती सहसा गावात आणि मानवी वस्तीच्या जवळच राहते. तिला देसी मैना तसेच भारतीय सामान्य मैना असे म्हणतात.

मैनाची एक प्रजात लहान जलाशयांच्या आसपास आणि गायी, बैल आणि बकऱ्यांच्या कळपांच्या आसपास पाहायला मिळते. या प्रकारातील मैनेला गंगाई मैना किंवा हरिया मैना असे म्हणतात.

याव्यतिरिक्त अबलक मैना, ब्राह्मणी मैना किंवा पवई मैना आणि हिल मैना (common hill myna) भारतीय उपखंडात आढळतात. यातील हिल मैना छत्तीसगड आणि मेघालयचा राज्याचा राज्य पक्षी आहे.

Related – शहामृग पक्षी माहिती मराठी

मैना पक्षी माहिती मराठी (myna pakshi marathi)

मैना पक्षी सर्वभक्षी असून तो कीटक, कोळी, सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, बिया, धान्य, फळे आणि फुले खातात. यासोबतच तो मानवी अन्न देखील खाऊ शकतो.

मैना पक्षी जीवनात एकच जोडीदार निवडतात. हे पक्षी वर्षभर केव्हाही प्रजनन करू शकतात. हे पक्षी एका वेळेस पाच ते सहा अंडी घालतात. यातून बाहेर आलेल्या पिल्लांना उडण्यासाठी वीस-बावीस दिवस लागतात. तोपर्यंत नर आणि मादी मैना त्या पिल्लाची काळजी घेतात.

मैना पक्ष्याचे वय (myna age) त्यांची असणारी प्रजात आणि वातावरणावर अवलंबून असते. तरी मैना कमीतकमी 5 आणि जास्तीत जास्त 25 वर्षे जगू शकते.

सारांश

या लेखातून आपण साळुंकी पक्षी माहिती मराठी (salunki bird information in marathi) सविस्तरपणे जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास, तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

FAQs

साळुंकी किती वर्ष जगते ?

साळुंकी कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्षे जगू शकते.

मैना पक्षी काय खातो ?

मैना पक्षी सर्वभक्षी असून तो कीटक, कोळी, सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, बिया, धान्य, फळे आणि फुले खातात. यासोबतच तो मानवी अन्न देखील खातो.