नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे काय आहेत?

Nachani information in marathi – आपल्याला चांगले आरोग्य लाभण्यासाठी सकस आहाराची गरज असते. सकस आहार म्हणजे आरोग्य राखण्यास किंवा सुधारण्यास मदत करणारा अन्न पदार्थ. या अन्नातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रथिने, खनिज द्रव्ये, जीवनसत्वे तसेच कार्बनी संयुग मिळत असते.

आपल्या अन्नाचा प्राथमिक स्रोत वनस्पती आहे. या वनस्पतीपासून मिळणाऱ्या पालेभाज्या , फळभाज्या व तृणधान्य शरीराला जास्त पोषक असतात.

तृणधान्यात जास्त प्रमाणात स्टार्च आणि प्रथिने असतात, ज्यातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. नाचणी ही तृणधान्याचाच एक प्रकार आहे. यातून आपल्याला पौष्टिक असणारे घटक मिळतात.

या लेखातून आपण नाचणीची विषयीची माहिती (Nachani information in marathi) मराठीत जाणून घेणार आहोत. तसेच आपण नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे (Benefits Of Nachani Mahiti) जाणून घेणार आहोत.

नाचणी पिकाची माहिती मराठी (Nachani Information In Marathi)

Nachani information in marathi
नावनाचणी
वैज्ञानिक नावएल्युसिन कोराकाना
इतर नावेनागली, रागी किंवा फिंगर मिलेट
प्रकारतृणधान्य
उपयोगअन्न म्हणून
लागवडभारतभर
रंगगडद विटकरी

आपण रोजच्या आहारात धान्याचा समावेश करत असतो, जसे की, गव्हाची चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी तशीच नाचणीपासून देखील भाकरी बनविली जाते. नाचणी गडद विटकरी रंगाची असल्याने तिची भाकरी देखील गडद विटकरी रंगाची होते.

महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेतले जाते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते.

विशेषतः कोकणात नाचणीचे उत्पादन जास्त प्रमाणावर घेतले जाते. नाचणीचा उपयोग भाकरी व आंबील बनवण्यासाठी होतो. पण गडद विटकरी रंगामुळे त्यापासून बनविलेल्या पदार्थांना आकर्षक रंग येत नाही. म्हणून गहू बाजरी, ज्वारी या धान्यापेक्षा नाचणीचा आहारात कमी प्रमाणात समावेश केला जातो.

Related – भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती

नाचणी भाकरी खाण्याचे फायदे मराठी (Benefits Of Nachani Mahiti)

1. एक कप नाचणीच्या पिठात 10.3 ग्रॅम प्रथिने असतात. प्रथिने हे एक आपल्या शरीरासाठी पोषक असतात. यामुळे पेशींच्या पुनरुत्पादनात तसेच संपूर्ण शरीरात रक्त वाहून नेण्यास मदत मिळते.

2. नाचणीमध्येही भरपूर फायबर असते. फायबरमुळे जास्त वेळ भूक लागत नाही. यातून जंकफूड खाणे आणि अतिरिक्त खाण्यापासून सुटका मिळते.

3. नाचणीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, हे आपल्या शरीरातील संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

4. गव्हाच्या तुलनेने नाचणीच्या पिठातील घटक रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी करते. नाचणीमध्ये मॅग्नेशियम देखील जास्त प्रमाणात असते. यामुळे इंसुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत मिळते.

5. नाचणी एक पौष्टिक अन्न आहे. ज्यामुळे लहान मुलांसाठी केवळ आवश्यक पोषकच पुरवते व सोबतच तर त्यांचे पोट जास्त काळ भरलेले ठेवते.

6. नाचणीत मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. आपल्या शरीराच्या मज्जातंतूंचे कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी मॅग्नेशियम मदत करते. ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत मिळते.

7. नाचणीत फायबर व प्रथिने जास्त असल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. या सर्वांमुळे अधिक लाल रक्तपेशी निर्माण होतात ज्यामुळे आपल्याला अधिक ऊर्जा मिळते.

8. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. कॅल्शियम हे एक पोषक तत्व आहे जे हाडे आणि दातांच्या विकासास मदत करते.

9. नाचणीमध्ये व्हिटॅमिन बी3 असते. हे जीवनसत्व त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करते तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचा रोग यापासून आपला बचाव करते.

10. मधुमेह /साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणी खूप उपयोगी ठरते. आपले वजन संतुलित राखण्यास व कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी नाचणी महत्वाची आहे.

Related – केळी खाण्याचे फायदे काय आहेत

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण नाचणी पिकाची माहिती मराठी (Nachani Information In Marathi) जाणून घेतली. तसेच नाचणी भाकरी खाण्याचे फायदे (Benefits Of Nachani Mahiti) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

नाचणी पासून काय बनते ?

नाचणीपासून भाकरी व आंबील बनविले जाते. यासोबतच पापड, बिस्किटे, केक, चकली, लाडू, ढोकळा, उपमा यासारखे पदार्थ देखील बनविले जातात.

नाचणी थंड आहे की उष्ण ?

नाचणी थंड की उष्ण हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर मित्रांनो नाचणी ही थंड पदार्थ असून उन्हाळ्यात खाल्यास आरोग्यासाठी गुणकारी ठरते.

नागलीच्या एका सुधारित वाणाचे नाव सांगा.

नागली म्हणजे नाचणी.
1. गोदावरी
2. बी 11
3. पीईएस 110 इंडाफ 8
4. दापोली 1
5. व्ही एल 149
असे कितीतरी नाचणीचे वाण आहेत. पण नाचणीच्या तांबूस व पांढऱ्या प्रकारांचे दाणे जास्त पौष्टिक असतात.

नाचणीमध्ये कोणते पोषक द्रव्ये असतात ?

नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. यासोबतच 6 ते 11% प्रथिने व स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात.