नागपंचमी व्रत कथा मराठी

Nag Panchami Vrat Katha In Marathi – नमस्कार मित्रांनो, श्रावण हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून याचे नाव श्रावण असे पडले आहे. हिंदू धर्मानुसार श्रावण हा अतिशय महत्वाचा महिना आहे.

या महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौरी, रक्षाबंधन, पोळा असे प्रमुख सण असून नारळी पौर्णिमा, नरहरी सोनार जयंती, कल्की जयंती साजरी केली जाते. नागाला भगवान शिवाच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. तसेच नागास श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.

मुळात श्रावण महिन्याला मराठी सणांचा राजा म्हणून ओळखले जाते. या महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी होय. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, म्हणून हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो.

चला तर मग, आपण या लेखातून नागपंचमी व्रत कथा (Nag Panchami Vrat Katha In Marathi) जाणून घेऊयात.

आपण नागपंचमी का साजरी करतो (why we celebrate nag panchami in marathi)

why we celebrate nag panchami in marathi

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील महत्वाचा सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. हिंदू परंपरेनुसार, श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते. म्हणून हा दिवस नागपंचमी म्हणून संपूर्ण भारतात साजरी केली जाते.

या दिवशी महिला घराची स्वच्छता करून अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढून त्याची पूजा केली जाते. भारताच्या काही राज्यात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करून त्याला दूध- लाह्या दिल्या जातात. तर काही ठिकाणी नागाच्या वारुळाची पूजा केली जाते.

नागपंचमीच्या निमित्ताने स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोका खेळतात. ज्या मुलीचे लग्न झाले असेल ती या सणाच्या निमित्ताने माहेरी येते. सर्व जणी एकत्र जमून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळतात.

याव्यतिरिक्त दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर येऊन स्नान करतात.

या नागपंचमी सणाच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत, यापैकी मला माहिती असलेली नागपंचमीची आख्यायिका मराठीत (Nag Panchami Vrat Katha In Marathi) मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.

Related – महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी

नागपंचमी व्रत कथा माहिती मराठी (Nag Panchami Vrat Katha In Marathi)

एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते. एके दिवशी तो शेतकरी जमीन नांगरत होता. त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसल्याने त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. यावेळी त्यांची आई म्हणजे नागीण बिळाबाहेर गेली होती. काही वेळात ती बिळाकडे आली. तर तिने पाहिले की, या नांगराचा फाळ लागून तिची पिल्ले मरण पावली आहेत.

मृत पिल्ले पाहून त्या नगिणीला खूप राग आला. रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला दंश केले, यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी शेजारच्या गावात असल्याची माहिती नगिणीला समजताच नागीण तिच्या घरी पोहोचली.

घरी गेल्यावर नगिणीने पाहिले की, त्या शेतकऱ्याची मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करत, दूधलाह्यांचा नैवेद्य चित्रातील नागाला अर्पण करत आहे.

हे पाहताच त्या नागिणीचा राग शांत झाला. यानंतर ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

मित्रहो, नागपंचमीच्या या कथेला फार पूर्वीपासून मान्यता आहे. याव्यतिरिक्त श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला म्हणून देखील हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो.

काही जण या कथेला मानत नसले, तरीही वैज्ञानिक आधार देत पर्यावरण समतोल राखण्यासाठी सापांचे रक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. याचे समाजप्रबोधन व्हावे, म्हणून नागपंचमी साजरी करतात. या दिवशी हे लोक नागाला दूध अपायकारक ठरते म्हणून त्याला दूध पाहत नाहीत.

सारांश

नागपंचमीला हिंदू संस्कृतीनुसार आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभले आहे. या दिवशी शेषनाग, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा आठ नागांची पूजा केली जाते.

भारतातील सर्व राज्यात हा सण साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि राजस्थान या ठिकाणी मोठ्या संख्येने नागाची पुजा केली जाते. सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेला बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.

आशा करतो की, तुम्हाला नागपंचमी व्रत कथा माहिती मराठी (Nag Panchami Vrat Katha In Marathi) हा लेख नक्कीच आवडला असेल.

तुम्हाला आवडतील असे काही लेख –

  1. श्रावण सोमवार व्रत कथा मराठी
  2. श्रावण महिन्यातील बैलपोळा सणाची माहिती
  3. रक्षाबंधन सणाची माहिती मराठी
  4. कामिका एकादशी व्रत कथा मराठी

Leave a Comment